Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 3

  
1. त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानांत प्रगट होऊन असा उपदेश करीता झाला कीं
  
2. पश्चाताप करा, कारण स्वर्गाच­ राज्य जवळ आल­ आहे.
  
3. अरण्यांत घोशणा करणाराची वाणी झाली कीं प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा, अस­ ज्याविशयीं यशया संदेश्ट्याच्या द्वार­ सांगितल­ होत­ तो हाच.
  
4. या योहानाच­ वस्त्र उंटाच्या केसांचे होत­, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता.
  
5. तेव्हां यरुशलेम, सर्व यहूदीया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रांत त्याजकडे लोटला.
  
6. त्यांनीं आपलीं पाप­ पदरीं घेऊन यार्देन नदीत त्याजपासून बाप्तिस्मा घेतला;
  
7. परंतु परुशी व सदूकी यांच्यापैकीं बहूत जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठीं येतांना पाहून त्यानंे त्यांस म्हटल­, अहो सापांच्या पिलाना­, होणा-या क्रोधापासून पळावयास तुम्हांला कोणी सुचविल­?
  
8. यास्तव पश्चातापास योग्य अस­ फळ द्या;
  
9. आणि अब्राहाम आमचा बाप आहे, अस­ म्हणण्याची कल्पना आपल्या मनांत आणूं नका; कारण मी तुम्हांस सांगता­, देव अब्राहामासाठीं या दगडापासून मुल­ उत्पन्न करावयास समर्थ आहे;
  
10. आणि आतांच झाडाच्या मुळाशीं कु-हाड ठेवलेली आहे; ज­ ज­ झाड चांगले फळ देत नाहीं त­ त­ तोडून अग्नींत टाकिल­ जात­.
  
11. मी पाण्यान­ तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठीं करिता­; परंतु जो माझ्या मागून येतो तो मजपेक्षां समर्थ आहे, त्याच्या वाहणा घेऊन चालावयास मी योग्य नाहीं; तो पवित्र आत्म्यान­ व अग्नीन­ तुमचा बाप्तिस्मा करील.
  
12. त्याचे सूप त्याच्या हातांत आहे, तो आपल­ खळ­ अगदीं निर्मळ करील; आपले गहूं कोठारांत साठवील पण भूस न विझत्या अग्नीन­ जाळून टाकील.
  
13. तेव्हां येशू योहानापासून बाप्तिस्मा घेण्याकरितां गालीलाहून यार्देनेवर त्याजकडे आला;
  
14. परंतु योहान त्याला मना करुन म्हणाला, मीं आपणापासून बाप्तिस्मा घ्यावा, अस­ असतां आपण मजकडे येतां काय?
  
15. येशून­ त्याला उत्तर दिल­, आतां ह­ होऊं दे; कारण या प्रकार­ सर्व धर्म पूर्णपण­ पाळण­ ह­ आपणांला योग्य आहे. तेव्हां त्यान­ त्याच्या म्हणण्याप्रमाण­ होऊं दिल­.
  
16. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यांतून लागलाच वर आला आणि पाहा, आकाश उघडल­; तेव्हां त्यान­ देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणावर येतांना पाहिला;
  
17. आणि पाहा, अशी आकाशवाणी झाली कीं हा माझा पुत्र, मला परमप्रिय, याजवर मी संतुश्ट आह­.