1. तेव्हां सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्यान त्याला रानांत नेल.
2. मग तो चाळीस दिवस व चाळीस रात्री उपाशीं राहिल्यानंतर त्याला भूक लागली.
3. तेव्हां परीक्षक त्याजजवळ येऊन म्हणाला, तूं देवाचा पुत्र असलास तर या धाड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर;
4. परंतु त्यान अस उत्तर दिल कीं, मनुश्य केवळ भाकरीन नाहीं, तर देवाच्या मुखांतून निघणा-या प्रत्येक वचनान वांचेल, अस लिहिल आहे.
5. मग सैतानान त्याला पवित्र नगरांत नेऊन मंदिराच्या कंगो-यावर उभ केल,
6. आणि त्याला म्हटल, तूं देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण अस लिहिल आहे, तो आपल्या दूतांस तुजविशयी आज्ञा करील, आणि तुझ्या पायांला धाड्यांची ठच लागूं नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.
7. येशून त्याला म्हटल, आणखी अस लिहिल आहे कीं, ‘प्रभू जो तुझा देव त्याची परीक्षा पाहूं नको.’
8. नंतर सैतानान त्याला एका मोठ्या उंच डागरावर नेऊन जगांतील सर्व राज्य व त्यांचंे वैभव त्याला दाखविल;
9. आणि त्याला म्हटल, तूं पायां पडून मला नमन करिशील तर मी ह सर्व तुला देईन.
10. तेव्हां येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, निघून जा, कारण प्रभु तुझा देव याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर, अस लिहिल आहे.
11. मग सैतान त्याला सोडून गेला; आणि पाहा, देवदूतांनीं येऊन त्याची सेवा केली.
12. नंतर योहान बंदीत पडला आहे ह ऐकून येशू गालीलांत निघून गेला;
13. आणि नासरेथ सोडून जबुलून व नफताली यांच्या हद्दींत असलेल्या समुद्रतीरावरील कफर्णहूमास जाऊन राहिला;
14. यासाठीं कीं यशया संदेश्ट्याच्या द्वार ज सांगितल होत त पूर्ण व्हाव; त अस कीं,
15. जबुलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रतीरींचा, यार्देनेच्या पलीकडचा देश, विदेशी लोकांचा गालील,
16. अशा अंधकारांत बसलेल्या लोकांनीं मोठा प्रकाश पाहिला, आणि मृत्यूच्या प्रदेशांत व छायत बसलेल्यांवर ज्योति उगवली आहे.
17. तेव्हांपासून येशू उपदेश करीत बोलूं लागला कीं पश्चाताप करा, कारण स्वर्गाच राज्य जवळ आल आहे.
18. नंतर गालील समुद्राच्या काठीं चालत असतां, त्यान पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघां भावांस समुद्रांत पांग टाकितांना पाहिल; ते मासे धरणारे होते.
19. त्यान त्यांस म्हटल, माझ्यामाग चला, म्हणजे मी तुम्हांस मनुश्य धरणारे करीन.
20. मग ते लागलच जाळीं सोडून देऊन त्याच्यामाग चालले.
21. तेथून पुढ गेल्यावर त्यान दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान यांस आपला बाप जब्दी याच्याबरोबर तारवांत आपलीं जाळीं नीट करितांना पाहिल, आणि त्यान त्यांस बोलाविल.
22. मग ते तारुं व आपला बाप यांस लागलच सोडून त्याच्यामाग चालले.
23. नंतर येशू सभास्थानांत शिक्षण देत, राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांतले सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचीं दुखणीं बरी करीत सर्व गालीलभर फिरला;
24. आणि त्याची कीर्ति सूरिया देशभर पसरली; तेव्हां ज्यांस नाना प्रकारच रोग व वेदना लागल्या होत्या, जे भूतग्रस्त, फपरेकरी व पक्षघाती होते अशा सर्व दुखणेक-यांस त्याजकडे आणिल, आणि त्यान त्यांस बर केल.
25. मग गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा देश यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामाग चालले.