1. तेव्हां लोकसमुदयांस पाहून तो डागरावर गेला, व खालीं बसल्यावर त्याचे शिश्य त्याच्याजवळ आले.
2. मग तो ताड उघडून त्यांस शिकवूं लागला कीं,
3. जे आत्म्यान ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाच राज्य त्यांच आहे.
4. ‘जे शोक करितात’ ते धन्य, कारण ‘त्यांस सांत्वन प्राप्त होईल.’
5. ‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘त्यांस पृथ्वीच वतन मिळेल.’
6. जे धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
7. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांजवर दया करण्यांत येईल.
8. ‘जे अंतःकरणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
9. जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांस देवाचे पुत्र म्हणतील.
10. धार्र्मिकतेकरितां ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाच राज्य त्यांचे आहे.
11. जेव्हां माझ्यामुळ लोक तुमची निंदा व छळ करिताील आणि तुम्हांविरुद्ध सर्व प्रकारच वाईट व लबाडीन बोलतील तेव्हां तुम्ही धन्य.
12. आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमच प्रतिफळ मोठ; तुम्हांपूर्वी जे संदेश्टे होऊन गेले त्यांचा त्यांनीं तसाच छळ केला.
13. तुम्ही पृथ्वीच मीठ आहां; जर मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला खारटपणा कशान येईल? त बाहेर टाकण्यांत येऊन माणसांच्या पायांखाली तुडविल जाव याशिवाय कोणत्याहि उपयोगाच नाहीं.
14. तुम्ही जगाचा प्रकाश आहां; डागरावर वसलेलें नगर लपत नाहीं;
15. दिवा लावून मापाखालीं ठेवीत नाहींत, दिवठणीवर ठेवितात, म्हणजे तो घरांतील सर्वांवर उजेड पाडितो;
16. त्याप्रमाण तुमचा उजेड लोकांपुढ पडो, यासाठीं कीं त्यांनीं तुमचीं चांगलीं काम पाहावी, आणि तुमच्या स्वर्गातील पित्याच गौरव कराव.
17. नियमशास्त्र व संदेश्ट्यांचे ग्रंथ हीं रद्द करावयास मी आला अस समजूं नका; रद्द करावयास नाहीं, तर पूर्ण करावयास आला आह.
18. मी तुम्हांस खचीत सांगता, आकाश व पृथ्वी नाहींतशीं होतपर्यंत सर्व गोश्टी पूर्ण झाल्यावांचून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदू नाहींसा होणार नाहीं.
19. यास्तव जो कोणी या अगदीं लहान आज्ञांतील एक रद्द करील व तदनुसार लोकांस शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यांत अगदी लहान म्हणतील; आणि जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यांत मोठा म्हणतील.
20. मी तुम्हांस सांगता, शास्त्री व परुशी यांच्यापेक्षां तुमची धार्मिकता अधिक झाल्यावांचून स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाहीं.
21. ‘मनुश्यहत्त्या करुं नको,’ आणि जो कोणी मनुश्यहत्त्या करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, अस प्राचीन लोकांस सांगितल होत ह तुम्ही ऐकल आहे.
22. मी तर तुम्हांस सांगता, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, अरे वेडगळा, असें म्हणेल तो वरिश्ठ सभेच्या दंडास पात्र होईल; आणि जो कोणी त्याला, अरे मूर्खा, अस म्हणेल, तो अग्निनरकाच्या दंडास पात्र होईल.
23. यास्तव तूं आपल दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असतां, आपण आपल्या भावाचे अपराधी आहा अस तेथ तुला स्मरण झाल,
24. तर तेथच वेदीपुढ आपल दान तसच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपल दान अर्पण कर.
25. तूं आपल्या वाद्याबरोबर वाटत आहेस ताच त्याबरोबर लवकर समेट कर; नाहींतर कदाचित् वादी तुला न्यायाधीशच्या हातीं देईल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हातीं देईल, आणि तूं बंदिशाळत पडशील.
26. मी तुला खचीत सांगता, तूं दमडीन्दमडी फेडशील तोपर्यंत तिच्यांतून सुटणारच नाहींस.
27. ‘व्यभिचार करुं नको’ म्हणून सांगितल होत, हे तुम्हीं ऐकल आहे.
28. मी तर तुम्हांस सांगता, जो कोणी स्त्रीकडे कामदृश्टीन पाहतो त्यान आपल्या अंतःकरणान तिजबरेाबर व्यभिचार केलाच आहे.
29. तुझा उजवा डोळा तुला अडखळवितो तर तो उपटून टाकून दे; कारण तुझ संपूर्ण शरीर नरकांत टाकल जाव यापेक्षां तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा यांत तुझ बर आहे.
30. तुझा उजवा हात तुला अडखळवितो तर तो तोडून टाकून दे; कारण तुझ संपूर्ण शरीर नरकांत पडाव यापेक्षां तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा यांत तुझ बर आहे.
31. ‘कोणीं आपली बायको टाकिली तर त्यान तिला सूटपत्र द्याव,’ हहि सांगितल होत.
32. मी तर तुम्हांस सांगता कीं जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावांचून टाकितो तो तिला व्यभिचारिणी करितो; आणि जो कोणी अशा टाकिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करितो तो व्यभिचार करितो.
33. ‘खोटी शपथ वाहूं नको,’ तर ‘आपल्या शपथा प्रभूपुढ ख-या कर’ म्हणून प्राचीन लोकांस सांगितल होत, हहि तुम्ही ऐकल आहे.
34. मी तर तुम्हांस सांगता, शपथ म्हणून वाहूंच नका; ‘स्वर्गाची’ नका, कारण ‘तो देवाच सिंहासन आहे;’
35. ‘पृथ्वीचीहि’ नका, कारण ‘ती त्याच पादासन आहे;’ यरुशलेमाचीहि नका, कारण त ‘थोर राजाच नगर’ आहे.
36. आपल्या मस्तकाचीहि शपथ वाहूं नको, कारण तुझ्यान एकहि केस पांढरा किंवा काळा करवत नाहीं.
37. तर तुमच बोलण होय तर होय, किंवा नाहीं तर नाहीं, एवढच असाव; याहून ज अधिक त वाइटापासून आहे.
38. ‘डोळîांबद्दल डोळा’ व ‘दातांबद्दल दांत’ अस सांगितल होत ह तुम्हीं ऐकल आहे.
39. मी तर तुम्हांस सांगता, दुश्टाला अडवूं नका; जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारील त्याजकडे दुसरा गाल कर.
40. जो तुजवर फिर्याद करुन तुझी बंडी घेऊं पाहतो, त्याला तुझा अंगरखाहि घेऊं दे;
41. आणि जो कोणी तुला वेठीस धरुन एक कोस नेईल त्याजबरोबर दोन कोस जा.
42. जो तुजजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुजपासून उसन घेऊं पाहतो त्याला पाठमोरा होऊं नको.
43. ‘आपल्या शेजा-यावर प्रीति कर’ व आपल्या वै-याचा द्वेश कर, अस सांगितल होत त तुम्ही ऐकल आहे.
44. मी तर तुम्हांस सांगता, तुम्ही आपल्या वै-यांवर प्रीति करा, आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठीं प्रार्थना करा;
45. म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याच पुत्र व्हाल; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो, आणि धार्मिकांवर व अधार्मिकांवरहि पाऊस पाडितो.
46. जे तुम्हांवर प्रीति करितात त्यांजवर तुम्ही प्रीति करितां तर तुम्हांला काय प्रतिफळ? जकातदारहि तसच करितात कीं नाहीं?
47. आणि तुम्ही आपल्या भाऊबंदांस मात्र सलाम करितां तर त्यांत विशेश काय करितां? विदेशीहि तसच करितात कीं नाहीं?
48. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’