Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 8

  
1. मग तो डा­गरावरुन उतरल्यावर लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामाग­ चालले.
  
2. तेव्हां पाहा, एक कुश्टरोगी त्याच्या पायां पडून म्हणाला, प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान् आहां.
  
3. त्यावर त्यान­ हात पुढ­ करुन त्याला स्पर्श केला व म्हटल­, माझी इच्छा आहे, शुद्ध हो; तेव्हांच त्याचंे कुश्ट जाऊन तो शुद्ध झाला.
  
4. मग येशून­ त्याला म्हटल­, संभाळ, कोणाला सांगू नको; तर जाऊन आपणाला ‘याजकाला दाखीव,’ आणि त्यांस प्रमाण पटाव­ म्हणून मोशान­ं ज­ अर्पण नेमिल­ आह­ त­ वाहा.
  
5. मग येशू कफर्णहूमास आल्यावर कोणाएका जमादारान­ त्याजकडे येऊन त्यास अशी विनंति केली की,
  
6. प्रभुजी, माझा चाकर पक्षघातान­ अतिशय पीडित होऊन घरांत पडला आहे.
  
7. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बर­ करीन.
  
8. तेव्हां जमादारान­ उत्तर दिल­ कीं, प्रभुजी, आपण माझ्या छपराखालीं याव­ अशी माझी योग्यता नाहीं; पण शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल.
  
9. कारण मीहि ताबेदार मनुश्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मीं एकाला जा म्हटल­ म्हणजे तो जातो, दुस-याला ये म्हटलें तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटल­ म्हणजे तो त­ करितो.
  
10. ह­ ऐकून येशूला आश्चर्य वाटल­ व आपल्यामाग­ आलेल्यांस तो म्हणाला, मी तुम्हांस खचीत सांगता­, एवढा विश्वास मला इस्त्राएलांतहि आढळला नाहीं.
  
11. मी तुम्हांस सांगता­ कीं, ‘पूर्वेकडून व पश्चिमेकडून’ बहुत लोक येतील, आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांजबरोबर स्वर्गाच्या राज्यांत बसतील;
  
12. परंतु राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधारांत टाकिले जातील, तेथ­ रडण­ व दांतखाण­ चालेल.
  
13. मग येशू जमादाराला म्हणाला, जा; तूं विश्वास धरल्याप्रमाण­ तुला प्राप्त होवो. त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.
  
14. नंतर येशू पेत्राच्या घरांत गेल्यावर त्याची सासू तापान­ पडली आहे अस­ त्यान­ पाहिल­.
  
15. तेव्हां त्यान­ तिच्या हाताला स्पर्श केल्यावर तिचा ताप निघाला; आणि ती उठून त्याची सेवा करुं लागली.
  
16. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनीं बहुत भूतग्रस्तांस त्याजकडे आणिल­; तेव्हां त्यान­ भूत­ शब्दान­च घालविलीं, व सर्व दुखणाइतांस बर­ केल­.
  
17. त्यान­ स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, अस­ ज­ यशया संदेश्ट्याच्या द्वार­ सांगितल­ होत­ त­ पूर्ण व्हाव­ म्हणून अस­ झाल­.
  
18. मग येशून­ आपल्यासभोवतीं लोकसमुदाय आहे अस­ पाहून त्यांस पलीकडे जाण्यास आज्ञा केली.
  
19. तेव्हां कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथ­ कोठ­ आपण जाल तेथ­ मी आपल्यामाग­ येईन.
  
20. येशून­ त्याला म्हटल­, खोकडांस बिळ­ व आकाशांतील पाखरांस कोटीं आहेत, परंतु मनुश्याच्या पुत्राला डोक­ टेकावयास ठिकाण नाहीं.
  
21. मग त्याच्या शिश्यांतील आणखी एक जण त्याला म्हणाला, प्रभुजी, मला पहिल्यान­ आपल्या बापाला पुरावयास जाऊं द्या.
  
22. येशून­ त्याला म्हटले, तूं माझ्यामाग­ ये; आणि मेलेल्यांस आपल्या मेलेल्यांना पुरुं दे.
  
23. मग तो तारवावर चढल्यावर त्याचे शिश्य त्याच्यामाग­ त्यांत गेले.
  
24. तेव्हां पाहा, समुद्रांत मोठ­ वादळ उठल­, त­ इतकंे कीं तारुं लाटांनीं झाकूं लागल­; तो तर झोप­त होता.
  
25. तेव्हां ते त्याच्याजवळ येऊन त्याला जाग­ करुन म्हणाले, प्रभुजी, बचाव करा, आपण बुडता­.
  
26. त्यान­ त्यांस म्हटल­, अहो अल्पविश्वासीं, तुम्ही कां घाबरलां? मग त्यान­ उठून वारा व समुद्र यांस दटाविल­; आणि अगदीं निवांत झाल­.
  
27. तेव्हां तारवांतील मनुश्यांना आश्चर्य वाटून तीं म्हणाली, हा कसा मनुश्य आहे? वारा व समुद्रहि याच­ ऐकतात!
  
28. मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशांत गेल्यावर दोन भूतग्रस्त मनुश्य­ कबरांतून निघून येत असतांना त्याला भेटलीं; तीं इतकीं उग्र होतीं कीं त्या वाटेन­ कोणाच्यान­ जाववत नसे.
  
29. तेव्हां पाहा, तीं ओरडून म्हणाली, हे देवाच्या पुत्रा, आमचा व तुझा काय संबंध? नेमलेल्या समयापूर्वी तूं आम्हांस पीडावयास येथ­ आलास काय?
  
30. तेथ­ त्यांजपासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता.
  
31. मग त्या भूतांनीं त्याला विनंति केली कीं तूं जर आम्हांस काढीत असलास तर आम्हांस त्या डुकरांच्या कळपांत पाठीव.
  
32. त्यान­ त्यांस म्हटल­, जा. मग तीं निघून डुकरांत शिरलीं; आणि पाहा, तो अवघा कळप कड्यावरुन समुदांत धडक धावत जाऊन पाण्यांत बुडून मेला.
  
33. मग चारणारे पळाले आणि त्यांनीं नगरांत जाऊन भूतग्रस्तांच्या गोश्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केल­.
  
34. तेव्हां पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाल­, आणि त्याला पाहून, आपण आमच्या सीमेबाहेर जाव­ अशी त्यांनीं त्याला विनंति केली.