Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 15

  
1. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक अस­ दुसर­ एक चिन्ह स्वर्गांत पाहिल­; ‘सात पीडा’ घेतलेले सात देवदूत दृश्टीस पडले; या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्यायोग­ देवाचा क्रोध पूर्ण झाला.
  
2. मग जसा काय अग्निमिश्रित काचेचा समुद्र असे कांही माझ्या दृश्टीस पडल­; त्या काचेच्या समुद्रावर श्वापदापासून, त्याच्या मूर्तीपासून, व त्याच्या नामसंख्येपासून जय मिळविणारे लोक हातांत देवाच्या वीणा घेऊन उभे राहिलेले दृश्टीस पडले.
  
3. ‘ते देवाचा दास मोशे याच­ गीत,’ व कोक-याच­ ‘गीत गातांना’ म्हणतातः हे ‘सर्वसत्ताधारी प्रभु देवा, तुझीं कृत्य­ थोर’ व ‘आश्चर्यकारक आहेत;’ हे ‘राश्ट्राधिपते,’ तुझे ‘मार्ग नीतीचे व सत्य’ आहेत.
  
4. ‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही ?’ ‘तुझ्या नामाचा महिमा कोण करणार नाहीं?’ कारण ‘पवित्र’ असा कायतो तूंच एक आहेस; आणि तुझी न्याय् यकृत्य­ प्रकट झालीं आहेत म्हणून ‘सर्व राश्टेªं येऊन तुझ्यासमोर नमन करितील.’
  
5. नंतर मीं पाहिल­, ता­ ‘साक्षीच्या मंडपाच­’ स्वर्गांतील मंदिर उघडल­;
  
6. आणि स्वच्छ व तेजस्वी, ‘तागाची वस्त्र­ परिधान केलेले’ व उरांवरुन सोन्याचा पट्टा बांधलेले असे, ‘सात पीडा’ घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरांतून बाहेर आले.
  
7. त्या चार प्राण्यांपैकी एकान­ युगानुयुग जीवंत असणा-या देवाच्या क्राधान­ भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांस दिल्या.
  
8. तेव्हां देवाचे ‘तेज’ व पराक्रम यांपासून निघालेल्या ‘धुरान­ मंदिर भरुन गेल­;’ आणि त्या सात देवदूतांच्या ‘सात पीडा’ संपेपर्यंत ‘कोणाच्यान­’ मंदिरांत ‘जाववल­ नाहीं.’