Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 20

  
1. नंतर मीं एका देवदूताला स्वर्गांतून उतरतांना पाहिल­. त्याच्याजवळ अगाधकूपाची किल्ली होती व त्याच्या हातीं एक मोठा साखळदंड होता.
  
2. त्यान­ ‘दियाबल,’ जो ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे अजगर त्यास धरिले; हजार वर्शे बांधलेल­ राहण्यासाठीं त्याला बांधून अगाधकूपांत टाकिल­;
  
3. आणि हजार वर्शे पूर्ण होत ता­पर्यंत त्यान­ राश्टाªंस आणखी ठकवूं नये म्हणून वरुन बंद करुन त्यावर शिक्का मारिला; त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडिल­ पाहिजे.
  
4. नंतर मीं आसन­ पाहिलीं, त्यांवर कोणी बसले होते; त्यंास न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता; आणि येशूविशयींच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनांमुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमस्कार घातला नव्हता आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण घेतली नव्हती त्यांचे जीवात्मेहि पाहिले. ते जीवंत झाले आणि त्यांनीं खिस्ताबरोबर हजार वर्शे राज्य केल­.
  
5. मृतांपैकीं बाकीचे लोक, तीं हजार वर्शें पूर्ण होत तोपर्यंंत जीवंत झाले नाहींत; ह­च पहिल­ पुनरुत्थान.
  
6. पहिल्या पुनरुत्थानांत ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अषा लोकांवर दुस-या मरणाची सत्ता नाहीं, तर ते ‘देवाचे’ व खिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याजबरोबर हजार वर्शे राज्य करतील.
  
7. ती हजार वर्शें संपल्यावर सैतानाला आपल्या कैद­तून सोडण्यांत येईल;
  
8. आणि तो पृथ्वीच्या चार कोप-यांतील राश्टेªं, गोग व मागोग, यांस ठकवावयास, त्यांस लढाईसाठीं एकत्र करावयास बाहेर येईल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.
  
9. त्यांनी ‘पृथ्वीच्या विस्तारावर’ फिरुन पवित्र जनांची छावणी व ‘प्रिय’ नगर वेढिल­; तेव्हां देवापासून स्वर्गांतून अग्नि उतरला आणि त्यान­ त्यास ‘खाऊन टाकिल­;’
  
10. त्यांस ठकविणा-या सैतानाला ‘अग्ंनींच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरांत टाकण्यांत आल­; त्यांत ते श्वापद व तो खोटा संदेश्टा आहेत; तेथ­ त्यांस रात्रंदिवस युगानुयुगपर्यंत पीडा भोगावी लागेल.
  
11. ‘नंतर’ मोठ­ पांढर­ राजासन व त्यावर ‘बसलेला’ एक जण माझ्या दृश्टीस पडला; त्याच्या तांेडापुढून पृथ्वी व आकाश हीं ‘पळालीं; त्यांकरितां ठिकाण म्हणून सांपडले नाहीं.’
  
12. मग मृत झालेल्या लहानथोरांना मीं राजासनापुढ­ उभ­ राहिलेल­ पाहिल­. त्या वेळीं ‘पुस्तक­ उघडलीं गेलीं; तेव्हां’ दुसर­ एक ‘पुस्तक उघडल­ गेल­, ते जीवनाच­ होत­;’ आणि त्या पुस्तकांत ज­ लिहिल­ होत­ त्यावरुन मृतांचा न्याय ‘ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाण­,’ ठरविण्यांत आला.
  
13. तेव्हां जे मेलेले लोक समुद्रांत होते त्यांस समुद्रान­ दिल­; जे मेलेले लोक मरणावस्थ­त व अधोलोकांत होते त्यांस त्यांनी दिल­; आणि ज्यांच्या ‘त्यांच्या कर्माप्रमाण­’ प्रत्येकाचा न्याय ठरविण्यांत आला.
  
14. तेव्हां मरण व अधोलोक हीं अग्नीच्या सरोवरांत टाकिलीं गेलीं. अग्नीच­ सरोवर हे­ दुसर­ मरण आहे.
  
15. ज्या कोणाच­ नांव ‘जीवनाच्या पुस्तकांत लिहिलेेल­ सांपडल­ नाहीं,’ तो अग्नीच्या सरोवरांत टाकिला गेला.