Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 6

  
1. मग कोक-यान­ सात शिक्क्यांपैकीं एक शिक्का फोडिला, तेव्हां मीं पाहिल­; ता­ चार प्राण्यांतील एकाला गर्जनेसारख्या वाणीन­, ये, अस­ म्हणतांना मीं ऐकल­.
  
2. मग मीं पाहिल­ ता­ ‘पांढरा घोडा,’ आणि त्याजवर बसलेला एक स्वार दृश्टीस पडला; त्याच्याजवळ धनुश्य होत­ व त्याला मुगूट देण्यांत आला; तो जिंकीत व जिंकावयाला निघाला.
  
3. त्यान­ दुसरा शिक्का फोडिला, तेव्हां मीं दुस-या प्राण्याला, ये, अस­ म्हणतांना ऐकल­.
  
4. त­व्हां दुसरा घोडा पुढ­ चालला; तो अग्निवर्ण होता आणि त्यावर बसलेल्या पुरुशाकडे पृथ्वीची शंाति हरण करण्याच­ आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याच­ काम सोपविल­ होत­; त्याला मोठी तरवार दिलेली होती.
  
5. त्यान­ तिसरा शिक्का फोडिला, तेव्हां मी तिस-या प्राण्याला, ये, अस­ म्हणतांना ऐकल­; मग मीं पाहिल­ ता­ ‘काळा घोडा,’ आणि त्यावर बसलेला एक पुरुश दृश्टीस पडला; त्याच्या हातांत तागडी होती;
  
6. आणि चार प्राण्यांच्या मधून निघालेल्या वाणीसारखी वाणी मीं ऐकली, ता अशीः पावल्याला शेरभर गहूं, आणि पावल्याला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस यांची हानि करुं नको.
  
7. त्यान­ चवथा शिक्का फोडिला, तेव्हां मीं चवथ्या प्राण्याला, ये, अस­ म्हणतांना ऐकल­.
  
8. मग मीं पाहिल­, ता­ फिक्का घोडा; आणि त्यावर बसलेला एक पुरुश दृश्टीस पडला, त्याच­ नांव ‘मृत्यु;’ त्याच्यामागून अधोलोक चालला होता. त्यांना ‘तरवारीन­, दुश्कळान­, मरणान­ व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना मारण्याचा’ अधिकार पृथ्वीच्या चवथ्या भागावर दिला होता.
  
9. त्यान­ पांचवा शिक्का फोडिला, तेव्हां मीं वेदीखालीं आत्मे पाहिले; ते आत्मे देवाच्या वचनामुळ­ व त्यांनी जी साक्ष पटविली होती तिजमुळ­ जिव­ मारिलेल्या लोकांचे होते.
  
10. ते मोठ्यान­ ओरडून म्हणाले, ‘हे प्रभो,’ जो तूं पवित्र व सत्य आहेस तो तूं ‘न्यायनिवाडा करीत’ नाहींस आणि ‘पृथ्वीवर राहणा-या जणांपासून’ आमच्या ‘रक्ताचा सूड घेत’ नाहींस; ह­ किती वेळ चालणार ?
  
11. तेव्हां त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांस अस­ सांगण्यांत आल­ कीं तुमचे सोबतीचे दास व तुमचे बंधु तुम्हांसारिखे जिव­ मारिले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ स्वस्थ राहा.
  
12. त्यान­ सहावा शिक्का फोडिला; तेव्हां मी पाहिल­, ता­ मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांच्या तरटासारिखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’ सारिखा झाला;
  
13. ‘अंजिराच­ झाड’ मोठ्या वा-यान­ हालल­ म्हणजे त्याचीं कच्ची फळ­ जशीं खालीं पडतात तसे ‘आकाशांतील तारे’ पृथ्वीवर ‘पडले.’
  
14. ‘एकाद­ पुस्तक गुंडाळाव­’ तस­ आकाश गुंडाळल­ जाऊन निघून गेल­, आणि सर्व डा­गर व बेट­ आपापल्या ठिकाणांवरुन सरुन गेलीं.
  
15. ‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी,’ सरदार, श्रीमंत व बलवान् लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसें, ‘गुहांत’ व डोंगरांतील ‘खडकांत लपली;’
  
16. ‘आणि ते डा­गरांस व खडकांस म्हणाले, आम्हांवर पडून राजासनावर बसलेल्या’ पुरुशाच्या तांेडापुढून व कोक-याच्या क्रोधापासून आम्हांस ‘लपवा;’
  
17. कारण त्यांच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि त्यापुढ­ कोण टिकेल?’