Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 7

  
1. त्यानंतर मीं चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनांवर’ उभे राहिलेले पाहिले; ते पृथ्वीवरुन व समुद्रावरुन वारा वाहूं नये व कोणत्याहि झाडाला लागूं नये म्हणून पृथ्वीच्या ‘चार वा-यांस’ धरुन ठेवीत होते.
  
2. मीं दुसरा एक देवदूत सूर्याच्या उगवतीपासून वर चढतांना पाहिला, त्याच्याजवळ सदाजीवी देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याच­ सोपविल­ होत­ त्यांस तो मोठ्या वाणीन­ म्हणालाः
  
3. आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या ‘कपाळांवर’ आम्ही ‘शिक्का मारीपर्यंत’ पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करुं नका.
  
4. ज्यांच्यावर शिक्का करण्यांत आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्त्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकीं एकश­ चवेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यांत आला,
  
5. यहूदा वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यांत आला; रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर; गाद वंशापैकी बारा हजारांवर;
  
6. आशेर वंशापैकी बारा हजारांवर; नफताली वंशापैकी बारा हजारांवर; मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर;
  
7. शिमोन वंशापैकी बारा हजारांवर; लेवी वंशापैकी बारा हजारांवर; इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर;
  
8. जबुलून वंशापैकी बारा हजारांवर; योसेफ वंशापैकी बारा हजारांवर; बन्यामीन वंशापैकी बारा हजारांवर शिक्का झाला.
  
9. त्यानंतर मी पाहिल­ ता­ सर्व राश्ट­ª, वंश, लोक व भाशा यांपैकी कोणाच्यान­ मोजवला नाहीं असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातीं झावळîा असलेला, मोठा लोक समुदाय राजासनासमोर व कोक-यासमोर उभा राहिलेला माझ्या दृश्टीस पडला.
  
10. ते उच्च वाणीन­ म्हणत होतेः ‘राजासनावर बसलेल्या’ आमच्या देवाचा व कोक-याचा तारणाबद्दल महिमा होवो.
  
11. तेव्हां राजासन, वडीलमंडळ व चार प्राणी यांच्या भोवते सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमस्कार घालून म्हणालेः
  
12. आमेन; धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्मरण, सन्मान, सामर्थ्य व बळ हीं युगानुयुग आमच्या देवाचीं आहेत; आमेन.
  
13. तेव्हां वडीलमंडळापैकीं एकान­ मला म्हटल­, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?
  
14. मीं त्याला म्हटल­, प्रभो, ह­ तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटांतून येतात ते हे आहेत; ह्यांनीं ‘आपले झगे’ कोक-याच्या ‘रक्तांत धुऊन’ शुभ्र केले आहेत.
  
15. यामुळ­ ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरांत त्याची सेवा करितात; आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांजवर आपला मंडप करील.
  
16. ते यापुढ­ ‘भुकेले असे होणार नाहींत; व तान्हेलेहि होणार नाहींत;’ त्यांस सूर्य किंवा कोणतीहि ‘उश्णता बाधणार नाहीं;’
  
17. कारण राजासनापुढ­ मध्यभागीं असलेला कोकरा त्यांचा ‘म­ढपाळ’ होईल व जीवनी पाण्याच्या झ-यांजवळ त्यांस नेईल; आणि देव त्यांच्या ‘डोळîांचे सर्व अश्रु पुसून टाकील.’