1. पांचव्या देवदूतान करणा वाजविला, ता एक तारा आकाशांतून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृश्टीस पडला; त्याच्याजवळ अगाधकूपाची किल्ली दिली होती.
2. त्यान अगाधकूप उघडिला, तो मोठ्या ‘भट्टीच्या धुरासारिखा धूर बाहेर येऊन वर चढला;’ आणि कूपाच्या धुरान ‘सूर्य’ व अंतराळ हीं ‘अंधकारमय’ झालीं.
3. त्या धुरांतून टोळ निघून पृथ्वीवर उतरले; त्यांस पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ति दिली होती.
4. त्यांस अस सांगितल होत कीं, ‘पृथ्वीवरील गवताला, कोणत्याहि हिरवळीला व कोणत्याहि झाडाला’ उपद्रव करुं नये; तर ज्या मनुश्यांच्या ‘कपाळांवर’ देवाचा ‘शिक्का’ नाहीं त्यांस मात्र करावा.
5. त्यांस जिवे मारण्याच त्यांजकडे सोपविल नव्हत तर मात्र पांच महिने पीडा देण्याच सोपविल होत; त्यांपासून होणारी पीडा, विंचू मनुश्याला नांगी मारितो तेव्हां होणा-या पीडेसारखी होती.
6. त्या दिवसांत मनुश्य ‘मरणाचा प्रसंग पाहतील तरी तो त्यांस मिळणार नाहीं;’ मरावयाची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांजपासून दूर पळेल.
7. त्या टोळांचा ‘आकार लढाईसाठीं’ सज्ज केलेल्या ‘घोड्यांच्या आकारासारखा’ होता; त्यांच्या डोक्यांवर सोन्यासारिखे दिसणारे मुगूट होते आणि त्यांचे ताडवळे माणसांच्या ताडवळîांसारिखे होते.
8. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारिखे आणि त्यांचे दांत सिंहांच्या ‘दांतांसारिखे’ होेते.
9. त्यांस उरस्त्राण होतीं तीं लोखंडी उरस्त्राणांसारिखी दिसत होतीं; आणि त्यांच्या पंखांचा आवाज ‘लढाईत धावणा-या’ पुश्कळ घोड्यांच्या ‘रथांच्या आवाजासारिखा’ होता;
10. त्यास विंचवांसारखीं शेपट व नांग्या आहेत आणि मनुश्यांस पांच महिने उपद्रव करण्याची शक्ति त्याच्या शेपटांत आहे.
11. अगाधकूपाचा दूत हा त्यांजवर राजा आहे; इब्री भाशतल त्याच नांव अबद्दोन, आणि हेल्लेणी भाशतल त्याच नांव अपल्लूओन आहे.
12. पहिला अनर्थ होऊन गेला; पाहा, यानंतर आणखी दोन अनर्थ येणार आहेत.
13. नंतर सहाव्या देवदूतान करणा वाजविला, ता देवासमोरील सुवर्ण वेदीच्या शिंगांमधून झालेली एक वाणी मीं ऐकली;
14. करणा असलेल्या सहाव्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेविलेल्या चार देवदूतांला मोकळे कर.
15. तेव्हां मनुश्यांपैकीं तृतीयांश मनुश्य जिव मारण्याकरितां नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्श यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे झाले.
16. स्वारांच्या सैन्यांची संख्या वीस कोटि होती; ही त्यांची संख्या मीं ऐकली.
17. त्या दृश्टांतांत घोडे व त्यांवर बसलेले स्वार मीं पाहिले; त्यांस अग्नि, नीळ व गंधक यांच्या रंगांची उरस्त्राण होतीं. त्या घोड्यांची डोेकी सिंहांच्या डोक्यांसारखीं होतीं; आणि त्यांच्या ताडातून अग्नि, धूर व गंधक हीं निघत होतीं.
18. त्यांच्या ताडातून निघणारे अग्नि, धूर व गंधक या तीन पीडांमुळे तृतीयांश मनुश्ये जिव मारलीं गेलीं.
19. त्या घोड्यांची शक्ति त्यांच्या ताडात व त्यांच्या शेपटांत आहे; त्यांची शेपट सापांसारिखीं असून त्यांस डोकीं आहेत, आणि त्यांनी ते उपद्रव करितात.
20. त्या पीडांनी जिव न मारिल्या गेलेल्या अशा बाकीच्या ‘मनुश्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविशयीं’ पश्चाताप केला नाहीं; म्हणजे ‘भूत व ज्यांस पाहतां, ऐकतां व चालतां येत नाहीं अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्ति’ यांची पूजा करण त्यांनीं सोडिल नाहीं;
21. आणि त्यांनीं केलेल्या नरहत्या, ‘चेटक, जारकर्मे’’व चो-या यांबद्दलहि पश्चाताप केला नाहीं.