Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans, Chapter 12

  
1. यास्तव बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळ­ तुम्हांस विनविता­ कीं तुम्ही आपल्या शरीरांचा जीवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
  
2. या युगाबरोबर समरुप होऊं नका; तर आपल्या मनाच्या नवीकरणान­ स्वतःच­ रुपांतर होऊं द्या, यासाठीं कीं देवाची जी उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आह­ ह­ समजून घ्याव­.
  
3. मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरुन मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगता­ कीं मानावयास योग्य त्यापेक्षां स्वतःला अधिक मानूं नका; तर देवान­ प्रत्येकाला वांटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाण­ मर्यादेन­ आपणांला माना.
  
4. कारण जस­ आपणांला एक शरीर असून त्यांत पुश्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचा व्यापार एकच नाहीं,
  
5. तस­ आपण खिस्तामध्य­ एकच शरीर आणि प्रत्येक एकमेकांचे अवयव असे आहा­,
  
6. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेच्या मानान­ निरनिराळीं कृपादान­ आहेत, म्हणून ईश्वरी संदेश देण­ तो विश्वासाच्या परिमाणान­ द्यावा;
  
7. सेवा करितांना सेव­त तत्पर असाव­; जो शिक्षक आहे त्यान­ शिक्षण देण्यांत,
  
8. बोध करणारान­ बोध करण्यांत तप्तर असाव­; दान देणारान­ निश्काम बुद्धीन­ द्याव­; अधिका-यान­ आपल­ काम आस्थेन­ कराव­; दया करणा-यान­ ती संतोशान­ करावी.
  
9. प्रीति ढा­गावांचून असावी. वाइटाचा वीट मानणारे; ब-याला चिकटून राहणारे;
  
10. ममतेन­ एकमेकांवर बंधुप्रीति करणारे; आदरसत्कार करण्यांत एकमेकांमध्य­ पुढाकार घेणारे;
  
11. आस्थेविशयीं मंद नसणारे; आत्म्यांत उत्सुक प्रभूची सेवा करणारे;
  
12. आशेन­ हर्शित; संकटांत सहनशील; प्रार्थन­त तत्पर;
  
13. पवित्र जनांच्या गरजा भागविणारे; आतिथ्य करण्यांत तत्पर; असे व्हा.
  
14. तुमचा छळ करणा-यांस आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊं नका.
  
15. आनंद करणा-याबरोबर आनंद करा; आणि रडणा-यांबरोबर रडा.
  
16. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोश्टींवर चित्त ठेवूं नका, तर लीनतेच्या गोश्टींनीं ओढले जा. आपणांला शहाणे समजूं नका.
  
17. वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करुं नका. सर्व मनुश्यांसमक्ष सात्विकपणा राखण्याकडे लक्ष ठेवा.
  
18. साधेल तर सर्व मनुश्यांबरोबर आपणांकडून शांतीन­ राहा,
  
19. प्रिय बंधूनो, सूड उगवूं नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण ‘सूड घेण­ मजकडे आहे, मी फेड करीन, अस­ प्रभु म्हणतो.
  
20. तुझा शत्रु भुकेला असल्यास त्याला प्यावयाला पाणी दे; कारण अस­ केल्यान­ तूं त्याच्या मस्तकावर निखा-यांची रास करिशील,’ असे शास्त्रलेख आहेत.
  
21. वाईटांन­ जिंकला जाऊं नको तर ब-यान­ वाइटाला जिंक.