Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans, Chapter 14

  
1. जो विश्वासान­ दुर्बल त्याचा स्वीकार करा, तरी विकल्पांच्या निर्णयांकरितां नका.
  
2. कोणाएकाचा विश्वास असा आहे कींं त्याला कोणत­हि खाण­ निशिद्ध नाहीं, परंतु जो दुर्बळ तो शाकभाजीच खातो.
  
3. जो खतो त्यान­ न खाणा-याला तुच्छ मानूं नये, जो खात नाहीं त्यान­ खाण-याला दोशी ठरवूं नये; कारण देवान­ त्याचा स्वीकार केला आहे.
  
4. दुस-याच्या चाकराला दोशी ठरविणार तूं कोण आहेस? त्याच­ स्थिर राहण­ किंवा पतन होण­ ह­ त्याच्या धन्याच­ पाहण­ आहे, त्याला स्थिर करण्यांत येईल; कारण प्रभु त्याला स्थिर करण्यास समर्थ आहे.
  
5. कोणी मनुश्य एकादा दिवस दुस-या दिवसापेक्षां अधिक मानितो; कोणी सर्व दिवस सारखे मानितो. तर प्रत्येकान­ आपल्या मनाची पूर्ण खातरी करुन घ्यावी.
  
6. जो दिवस पाळितो तो प्रभुकरितां खातो; कारण तो देवाच­ उपकारस्मरण करितो; जो खात नाहीं तो प्रभूकरितां खात नाहीं आणि तोहि देवाच­ उपकारस्मरण करितो.
  
7. कारण आपल्यांतील कोणी स्वतःकरतां जगत नाही, आणि कोणी स्वतःकरितां मरत नाहीं.
  
8. आपण जगता­ ते प्रभूकरितां जगता­; आणि आपण मरता­ ते प्रभूकरितां मरता­; म्हणून आपण जगला­ किंवा मेला­, तरी प्रभूचे आहा­;
  
9. खिस्त यासाठी मृत्यु पावला व पुनः जीवंत झाला कीं त्यान­ मेलेल्यांचा व जीवतांचाहि प्रभु असाव­.
  
10. तर तूं आपल्या भावाला दोशी कां ठरवितोस? किंवा तूं आपल्या भावाला तुच्छ कां मानितोस? आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहा­.
  
11. कारण प्रभु म्हणतो, जर मी जीवंत आह­ तर मजपुढ­ प्रत्येक जण गुडघा टेकील, व प्रत्येक जिव्हा देवाच­ स्त्वन करील, असा शास्त्रलेख आहे.
  
12. तर मग आपणांतील प्रत्येक जण स्वतःचा हिशेब देवाला देईल.
  
13. ह्याकरितां आपण यापुढ­ एकमेकांला दोशी ठरवूं नये; तर अस­ ठरवून टाकाव­ कीं कोणी आपल्या भावापुढ­ कांही ठेचाड किंवा अडखळण ठेवूं नये.
  
14. मला ठाऊक आहे, आणि प्रभु येशूमध्य­ माझी खातरी आहे, कीं कोणताहि पदार्थ मूळचा निशिद्ध नाहीं; तथापि अमुक पदार्थ निशिद्ध आहे, अस­ समजणा-याला तो निशिद्धच आहे.
  
15. तुझ्या भावाला अन्नामुळ­ दुःख झाल­ तर तूं प्रीतींन­ वागतनासा झाला आहेस. ज्यासाठीं खिस्त मरण पावला त्याचा नाश आपल्या अन्नान­ करुं नको.
  
16. ज­ तुम्हांमध्य­ उत्तम आहे त्याची निंदा होऊं नये.
  
17. खाणे व पिण­ यांत देवाच­ राज्य नाहीं, तर नीतिमत्त्व, शांति व पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद ह्यांत आहे.
  
18. अशा प्रकार­ जो खिस्ताची सेवा करितो तो देवाला प्रिय व मनुश्यांस पसंत आहे.
  
19. तर मग जेण­करुन शांति व परस्परांची अभिवृद्धि होईल अशा गोश्टींच्या माग­ आपण लागाव­.
  
20. अन्नामुळ­ देवाच्या कामाचा मोड करुं नका. सर्व पदार्थ शुद्धच आहेत; परंतु जो खाण्यामुळ­ अडखळतो त्याला त­ पाप आहे.
  
21. मांस न खाण­, द्राक्षारस न पिण­, आणि जेण­करुन तुझा भाऊ ठेचाळतो (किंवा अडखळतो अगर अशक्त होतो) त­ न करण­ ह­ चांगल­.
  
22. तुझ्या ठायीं जो विश्वास आहे तो तूं देवासमक्ष आपणाजवळ ठेव. आपणाला ज­ कांही पसंत आहे त्याविशयीं ज्याला स्वतःचा न्यायनिवाडा करावा लागत नाहीं तो धन्य;
  
23. पण संशय धरुन जो खातो तो दोशी ठरतो, कारण त्याच­ खाण­ विश्वासान­ होत नाहीं; आणि ज­ कांहीं विश्वासान­ नाहीं त­ पाप आहे.