Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans, Chapter 6

  
1. तर आतां काय म्हणवे? कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहाव­ काय?
  
2. अस­ न होवो. जे आपण पापाला मेला­ त्या आपण यापुढ­ त्यांत राहाव­ ह­ कस­?
  
3. आपण जितक्यांनी खिस्त येशूमध्य­ बाप्तिस्मा घेतला, तितक्यांनी त्याच्या मरणांत बाप्तिस्मा घेतला, याविशयीं तुम्ही अजाण आहां काय?
  
4. तर मग आपण त्या मरणांतील बाप्तिस्म्यान­ त्याबरोबर पुरले गेला­; यासाठीं कीं ज्याप्रमाण­ खिस्त पित्याच्या गौरवान­ मेलेल्यांतून उठविला गेला त्याप्रमाण­च आपणहि जीवनाच्या नाविन्यांत वागणूक करावी.
  
5. जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरुपान­ त्याच्याबरेाबर संयुक्त झाला­ आहा­, तर त्याच्या उठण्याच्याहि प्रतिरुपान­ त्याच्याबरेाबर संयुक्त होऊं;
  
6. आपल्याला अस­ समजत­ कीं आपले जुन­ मनुश्यपण त्याजबरेाबर वधस्तंभावर खिळल­ गेल­, अस­ कीं ह­ पापमय शरीर नश्ट होऊन आपण पुढ­ पापाच­ दास्य करुं नये;
  
7. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोशापासून मुक्त झाला आहे.
  
8. आपण खिस्ताबरोबर मेला­, तर याजबरेाबर जीवंत होऊनहि राहूं असा आपला विश्वास आहे;
  
9. आपणांस ठाऊक आहे कीं मेलेल्यांतून उठविलेला खिस्त पुढ­ मरत नाही; त्याजवर मरणाची सत्ता नाहीं.
  
10. कारण तो मेला, तो पापाला एकदांच मेला; तो जगतो, तो देवाला जगतो.
  
11. तसे तुम्हीहि स्वतःस पापाला मेलेले आणि खिस्त येशूमध्य­ देवाला जीवंत झालेले, अस­ माना.
  
12. यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हाव­ म्हणून आपल्या मर्त्य शरीरांत पापसत्ता चालूं देऊं नका;
  
13. आणि तुम्ही आपले अवयव अनीतीचीं शस्त्र­ होण्यांकरितां पापाला समर्पण करुं नका; तर आपण मेलेल्यांतून जीवंत झालेले अस­ स्वतःस देवाला समर्पण करा, आणि आपले अवयव नीतींची शस्त्र­ होण्याकरितां देवाला समर्पण करा.
  
14. पापाची सत्ता तुम्हांवर चालणार नाहीं; कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीं, तर कृपाधीन आहां.
  
15. तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपाधीन आहा­ म्हणून पाप कराव­ काय? अस­ न होवो.
  
16. आज्ञापालनाकरितां ज्याला तुम्ही स्वतःस दास असे समर्पण करितां, ज्याची आज्ञा तुम्ही मानितां, त्याचे दास तुम्ही आहां; ज्यांचा परिणाम मरण असे पापाचे दास, किंवा ज्यांचा परिणाम नीतिमत्त्व आज्ञापालनाच­ दास तुम्ही आहां, ह­ तुम्हांस ठाऊक नाहीं काय?
  
17. तुम्ही पापाचे दास होतां, तरी ज्या शिकवणीच्या पदरी तुम्हांस बांधिल­ तिच्याप्रमाण­ तुम्ही मनापासून वागणूक केली,
  
18. आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे दास झालां, म्हणून देवाची स्तुति असो.
  
19. तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळ­ मनुश्यव्यहाराप्रमाण­ मी बोलता­; जसे तुम्ही आपले अवयव अधर्म करण्याकरितां अमंगळपण व अधर्म यांस दास असे समर्पण केले होते, तसे आतां आपले अवयव पवित्रीकरणाकरितां नीतिमत्त्वाला समर्पण करा.
  
20. तुम्ही पापाचे दास न होतां तेव्हां नीतिमत्त्वसंबंधन­ अलग होतां;
  
21. तर ज्या गोश्टींची तुम्हांस आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांस त्या वेळेस काय फळ प्राप्त झाल­? त्यांचा शेवट तर मरण आहे;
  
22. परंतु आतां तुम्ही पापापासून मुक्त होऊन देवाचे दास झाल्यामुळ­ तुम्हांस पवित्रीकरणाची फलप्राप्ति झाली आहे, आणि सर्वकालच­ जीवन ह­ उद्दिश्ट मिळाल­ आहे.
  
23. पापाचे वेतन मरण आहे, पण देवाच­ कृपादान आपल्या प्रभु येशू खिस्तामध्य­ सर्वकालच­ जीवन आहे.