Home / Marathi / Marathi New Testament / Web / Titus

 

Titus, Chapter 3

  
1. त्यांनीं सत्ता व अधिकार यांच्या अधीन राहाव­, आज्ञा मानाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असाव­;
  
2. कोणाची निंदा करुं नये, भांडखारेपणा न करितां सौम्य व सर्व मनुश्यांबरोबर सर्व प्रकारंे नम्रतेन­ वागणारे असाव­, अशी त्यांस आठवण द­.
  
3. कारण आपणहि पूर्वी निर्बुद्धि, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुश्टपणा व हेवा यांत आयुश्य घालविणारे, द्वेशपात्र व एकमेकांचा द्वेश करणार, असे होता­;
  
4. परंतु जेव्हां आपला तारणारा देव याची दया व मनुश्यांवरील प्रीति प्रकट झाली,
  
5. तेव्हां आपण केलेल्या नीतीच्या कर्मांनी नव्हे, तर नव्या जन्माच­ स्नान व पवित्र आत्म्यान­ केलेल­ नवीकरण यांच्या द्वार­ त्यान­ आपल्या दयेनुसार आपल्याला तारिल­.
  
6. त्यान­ तो आत्मा आपला तारणारा येशू खिस्त याच्याद्वार­ आपल्यावर विपुल ओतिला;
  
7. यासाठीं कीं आपण त्याच्या कृपेन­ नीतीमान् ठरुन आशा धरल्याप्रमाण­ युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हाव­.
  
8. हे वचन विश्वसनीय आहे, आणि तूं या गोश्टींविशयीं खात्रीन­ सांगत असाव­ अशी माझी इच्छा आहे, यासाठीं कीं ज्यांनीं देवावर विष्वास ठेविला आहे त्यांनीं चांगली कर्मे आचरण्याच­ मनावर घ्याव­. या गोश्टी मनुश्यांस चांगल्या व हितकारक आहेत.
  
9. मूर्खपणाचे वाद, वंशावळया, कलह व नियमशास्त्राविशयी भांडण­, यांपासून दूर राहा; कारण तीं निरुपयोगी व व्यर्थ आहेत.
  
10. तट पाडणा-या मनुश्याला एकदा दोनदा बोध करुन मग वर्ज कर;
  
11. असा मनुश्य बिघडला आहे, आणि त्यान­ स्वतःसच दोशी ठरविल­ असून तो पाप करितो, ह­ तुला ठाऊक आहे.
  
12. मीं अर्तमाला किंवा तुखिकाला तुजकडे पाठविल­ म्हणजे होईल तितकें करुन मजकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथ­ हिंवाळा घालविण्याचा मीं निश्चय केला आहे.
  
13. जेना शास्त्री व अपुल्लो यांस कांहीं उण­ पडूं नये म्हणून होईल तितक्या तयारींन­ त्यांस रवाना कर.
  
14. आपल्या लोकांनीं अगत्याच्या बाबीसंबंधी गरजा पुरविणारीं चांगलीं कर्मे आचरण्यास शिकाव­, म्हणजे ते निश्फळ होणार नाहींत.
  
15. माझ्याबरोबरचे सर्व तुला सलाम सांगतात. विश्वासामधील जे लोक आम्हांवर प्रीति करितात त्यांस सलाम सांग. तुम्हां सर्वांबरोबर कृपा असो.