1. बंधुजनहो, तुम्हीं आत्मिक दानांविशयीं अजाण असाव अशी माझी इच्छा नाहीं.
2. तुम्ही विदेशी होतां तेव्हां जसजस वळण तुम्हांला मिळाल तसतस तुम्ही त्या मुक्या मूर्तीकडे बहकत गेलां ह तुम्हांस ठाऊक आहे.
3. यास्तव मी तुम्हांस कळविता कीं देवाच्या आत्म्याच्या योग बोलणारा कोणीहि इसम येशू शापित आहे अस म्हणत नाहीं; आणि पवित्र आत्म्याच्या योग बोलल्यावांचून कोणालाहि येश हा प्रभु आहे अस म्हणतां येत नाहीं.
4. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे;
5. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभु एकच;
6. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्ये करणारा देव एकच आहे;
7. तरी आत्म्याच प्रकटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठीं मिळत.
8. एकाला आत्म्याच्या द्वार ज्ञानाची उक्ति; एकाला त्याच आत्म्यानुसार विद्येची उक्ति;
9. एकाला त्याच आत्म्यांत विश्वास; एकाला त्याच एका आत्म्यांत निरोगी करण्याचीं कृपादानें;
10. एकाला अöुतकार्ये करावयाची शक्ति; एकाला संदेशशक्ति; एकाला आत्मे ओळखण्याची शक्ति; एकाला विशेश प्रकारच्या भाशा बोलण्याची शक्ति; व एकाला भाशांचा अर्थ सांगण्याची शक्ति मिळते;
11. तरी हीं सर्व कार्ये तोच एक आत्मा करितो, तो आपल्या इच्छेप्रमाण एकेकाला तीं वाटून देतो.
12. जस शरीर एक असून त्याला अवयव पुश्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुश्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनत, तसा खिस्तहि आहे.
13. कारण आपण यहूदी असूं किंवा हेल्लेणी असूं, दास असूं किंवा स्वतंत्र असूं, आपणां सर्वांना एका आत्म्यांत एक शरीर होण्यासाठीं बाप्तिस्मा मिळाला आहे, आणि आपण सर्व एकाच आत्म्यानं संचरित झाला आहा.
14. कारण शरीर म्हणजे एक अवयव अस नव्हे, तर बहुत अवयव अस आहे.
15. जर पाय म्हणेल, मी हात नाहीं म्हणून मी शरीराचा नाहीं, तर त्यावरुन तो शरीराचा नाहीं अस होत नाहीं.
16. जर कान म्हणेल, मी डोळा नाहीं म्हणून मी शरीराचा नाहीं, तर त्यावरुन तो शरीराचा नाहीं अस होत नाहीं.
17. सगळ शरीर डोळा असत तर ऐकण कोठ असते? सगळ ऐकणे असत तर हुंगणे कोठ असत?
18. तर देवान आपल्या इच्छेप्रमाणंे शरीराला वेगवेगळे सर्व अवयव लाविले आहेत.
19. ते सर्व अवयव मिळून एक असते तर शरीर कोठ असत?
20. तर मग अवयव पुश्कळ असून शरीर एक अस आहे.
21. डोळîाला हातास म्हणता येत नाहीं कीं मला तुझी गरज नाही; तसच मस्तकांला पायांस म्हणतां येत नाहीं कीं मला तुमची गरज नाहीं.
22. इतकच नव्ह तर शरीराचे जे अवयव विशेश अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत;
23. शरीराचीं जीं अंग कमी योग्यतेची अशीं आपण मानिता त्यांस आपण पांघरुण घालून विशेश मान देता, आणि आपल्या कुरुप अंगांस सुरुपता मिळते;
24. आपल्या सुरुप अंगांस अशी गरज नाहीं; ज उण त्यांस विशेश मान मिळावा अशा रीतींन देवान शरीर जुळविल आहे;
25. यासाठीं कीं शरीरांत फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखी काळजी घ्यावी.
26. एक अवयव दुःखित झाला तर त्याबरोबर सर्व अवयव दुःखित होतात; एका अवयवाची वाहवा झाली तर त्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.
27. तुम्ही खिस्ताच शरीर असून प्रत्येक जण आपापल्या कार्याप्रमाण त्याचे अवयव आहां.
28. तस देवान मंडळींत कित्येकांना नेमिल आहे; प्रथम प्रेशित, दुसरे संदेश्टे, तिसर शिक्षक; शिवाय अöुत कार्ये करणारे, निरोगी करण्याचीं कृपादान मिळालेले, समाचार घेणारे, व्यवस्था करणारे, भिन्न्ाभिन्न भाशा बोलणारे असे नेमिले आहेत.
29. सर्वच प्रेशित आहेत काय? सर्वच संदेश्टे आहेत काय? सर्वच शिक्षक आहेत काय? सर्वच अöुत कार्ये करणारे आहेत काय?
30. सर्वांसच निरोगी करण्याचीं कृपादान आहेत काय? सर्वच भिन्नभिन्न भाशा बोलतात काय? भाशांचा अर्थ सर्वच सांगतात काय?
31. श्रेश्ठ कृपादानांची सबळ इच्छा बाळगा; शिवाय एक सर्वोत्कृश्ट मार्ग मी तुम्हांस दाखविता.
|