1. बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यांत तुम्ही स्थिरहि राहत आहां,
2. जिच्या द्वार तुम्हांला तारण मिळाले आहे तीच सुवार्ता मी तुम्हांस कळविता. ज्यावचनान तुम्हांस ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरिली असेल; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
3. मला ज सांगण्यांत आल त मीं तुम्हांस सांगून दिल, त्यापैकीं मुख्य ह कीं धर्मशास्त्राप्रमाण खिस्त तुमच्याआमच्या पापाबंद्दल मरण पावला;
4. तो पुरला गेला; धर्मशास्त्राप्रमाण तिस-या दिवशी उठविला गेला;
5. आणि तो केफाला, मग बारा जणांला दिसला;
6. त्यानंतर तो एकदम पांचशांपेक्षां अधिक बंधूंना दिसला; त्यांतील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येकांनीं महानिद्रा घेतली आहे;
7. त्यानंतर याकोबाला, मग सर्व प्रेशितांस दिसला;
8. आणि जणू काय अकाळी जन्मलेला जो मी त्या मलाहि सर्वांच्या शेवटीं दिसला.
9. कारण प्रेशितांत मी कनिश्ठ आह; मी प्रेशित म्हणावयास योग्य नाहीं, कारण मीं देवाच्या मंडळीचा छळ केला.
10. तरी जो कांही मी आह तो देवाच्या कृपेन आह; आणि मजवर त्याची जी कृपा ती व्यर्थ झाली नाहीं; कारण त्या सर्वांपेक्षां मी अतिशय श्रम केले. ते मीं केले अस नाही, तर मजबरोबर असणा-या देवाच्या कृपेने केले.
11. सारांश, मी असो किंवा ते असोत, अशीच आम्ही घोशणा करिता, आणि तुम्ही असाच विश्वास धरिला.
12. आतां खिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी त्याविशयीं घोशणा होत आहे, तर मेलेल्यांचंे पुनरुत्थान नाहीं, अस तुम्हांतील कित्येक जण कस म्हणतात?
13. मेलेल्यांचे पुनरुत्थान नाहीं तर खिस्तहि उठविला गेला नाहीं;
14. आणि खिस्त उठविला गेला नाही, तर आमची घोशणा व्यर्थ व तुमचा विश्वासहि व्यर्थ;
15. आणि आम्ही देवाविशयीं खोटे साक्षी असे ठरला; कारण देवाविशयीं आम्ही अशी साक्ष दिली कीं त्यान खिस्ताला उठविल; पण मेलेले उठविले जात नाहींत तर त्यान त्याला उठविल नाही.
16. मेलेले उठविले जात नाहींत तर खिस्तहि उठविला गेला नाहीं.
17. खिस्त उठविला गेला नाहीं तर तुमचा विश्वास निश्फळ; तुम्ही अजून आपल्या पापांत आहां;
18. आणि खिस्तामध्य ज्यांनी महानिद्रा घेतली आहे त्यांचा नाश झाला.
19. या आयुश्यांत आपण खिस्तावर आशा ठेवणारे असे केवळ आहा तर मग सर्व मनुश्यांपेक्षा आपण लाचार आहा.
20. तरी पण खिस्त महानिद्रा घेतलेल्यांतल प्रथम फळ असा मेलेल्यांतून उठविला गेला आहेत.
21. मनुश्याच्या द्वार मरण आल, म्हणून मनुश्याच्या द्वार मेलेल्यांचंे पुनरुत्थ्यानहि आहे.
22. जसे आदामामध्य सर्व मरतात तसे खिस्तामध्य सर्व जीवंत केले जातील;
23. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाण; प्रथम फळ खिस्त; मग खिस्ताया आगमनकाळीं ज त्याचे होणार ते लोक.
24. नंतर शेवट होईल, तेव्हां सर्व आधिपत्य, सर्व अधिकार, व सामर्थ्य हीं नाहींतशी केल्यावर देवपित्याला तो राज्य सोपून देईल.
25. कारण आपल्या ‘पायांखली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्ये केलंे पाहिजे.
26. शेवटला शत्रु जो मृत्यू तो नाहींसा केला जाईल.
27. ‘त्यान सर्व वश करुन याच्या पायांखालीं ठेविलें;’ परंतु सर्व वष केलें आहे असें जेव्हां म्हटलें तेव्हां, ज्यानें त्याला सर्व वष करुन दिलें, तो अर्थातच बाहेर राहिला.
28. त्याला सर्व कांहीं वष झालें असें जेव्हां होईल तेव्हां, ज्यान त्याला सर्व वश करुन दिल त्याला, पुत्रहि स्वतः वश होईल; यासाठीं कीं देवान सर्वांत सर्व अस व्हाव.
29. अस नसल्यास मेलेल्यांबद्दल ज बाप्तिस्मा घेतात ते काय करितील? जर मेलेले मुळींच उठविले जात नाहींत तर त्यांच्याबद्दल ते बाप्तिस्मा कां घेतात?
30. आम्हीहि घडोघडी प्राणसंकटांत कां पडता?
31. बंधुजनहो, तुम्हांविशयीं जो अभिमान मला खिस्त येशू आपला प्रभु ह्याच्या ठायीं आहे त्याची शपथ घेऊन मी म्हणता कीं मी रोज रोज मरता;
32. इफिसांत मीं श्वापदांबरेाबर लढाई केली ती मनुश्यांच्या साधारण हेतूंन केली असती तर मला काय लाभ? मेलेले उठविले जात नाहीत, ‘तर चला, आपण खाऊं, पिऊं, कारण उद्यां मरावयाच आहे.’
33. फसूं नका, कुसंगतीनें नीति बिघडते.
34. धार्मिकतेसंबंधान शुद्धीवर या, आणि पाप करुं नका; कारण कित्येकांस देवासंबधान ज्ञान नाहीं; ह मी तुम्हांस लाजविण्यासाठीं बोलता.
35. आतां कोणी म्हणेल, मेलेले कसे उठविले जातात, व ते कोणत्या प्रकारच्या शरीरानं येतात?
36. हे निर्बुद्धि मनुश्या, ज तूं स्वतः पेरितोस त न मेल तर त जीवंत होत नाहीं;
37. आणि तूं पेरीतोस त्यांचे भावी अंग तूं पेरीत नाहींस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुस-या कशाचा असेल;
38. देव आपल्या संकल्पाप्रमाण त्याला अंग देतो. म्हणजे बीजांतल्या प्रत्येकाला ज्याचें त्याचें अंग देतो.
39. सर्व देह सारखेच नाहींत; तर मनुश्यांचा देह हा एक प्रकार, पक्ष्यांचा देह हा एक प्रकार व माशांचा देह हा एक प्रकार.
40. तशींच स्वर्गीय शरीर व पार्थिव शरीर आहेत; पण स्वर्गीयांचे तेज एक, आणि पार्थिवांचंे एक.
41. सूर्याच तेज वेगळ; चंद्राच तेज वेगळ; ता-यांच तेज वेगळ; ता-यांता-यांच्या तेजांत भेद आहे;
42. तस मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. विनाशीपणांत पेतल जात; अविनाशीपणांत उठविल जात;
43. अपमानंात पेरल जात; गौरवांत उठविल जात; अशक्तपणांत पेरल जात; सामर्थ्यात उठविल जात;
44. प्राणमय शरीर अस पेरल जात; आध्यात्मिक शरीर अस उठविल जात. जर प्राणमय शरीर आहे तर आध्यात्मिक शरीरहि आहे.
45. त्याप्रमाण शास्त्रलेख आहे कीं ‘पहिला मनुश्य आदाम जीवंत प्राण्ी असा झाला,’ शेवटला आदाम जीवंत करणारा आत्मा असा झाला.
46. तथापि ज आध्यात्मिक त प्रथम नाहीं; प्राणमय त प्रथम आहे, मग ज आध्यात्मिक त.
47. ‘पहिला मनुश्य भूमिपासून मातीचा आहे,’ दुसरा मनुश्य स्वर्गापासून आहे.
48. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेहि आहेत; आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेहि आहेत;
49. आणि जो मातीचा त्याच प्रतिरुप जस आपण धारण केल, तस जो स्वर्गातला त्याचहि प्रतिरुप धारण करुं.
50. बंधुजनहो, मी अस म्हणता कीं मासं व रक्त ह्यांना देवाच्या राज्याच वतन मिळूं शकत नाहीं; आणि विनाशीपणाला अविनाशीपणाच वतन मिळत नाहीं.
51. पाहा, मी तुम्हांस एक गूढ गोश्ट सांगता; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाहीं, तरी आपण सर्व बदलून जाऊं,
52. क्षणांत, निमिशांत, शेवटल्या करण्याच्या वेळेस; कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊं. कारण ह ज विनाशी त्यान अविनाशीपण परिधान कराव,
53. आणि ह ज मर्त्य त्यान अमरत्व परिधान कराव हे आवश्यक आहे.
54. हे ज विनाशी त्यान अविनाशीपण परिधान केल, आणि हें जें मर्त्य त्यानें अमरत्व परिधान केलें, अस जेव्हां होईल, तेव्हां ‘मरण विजयांत ग्रासिल गेल आहे,’ असा जो शास्त्रलेख तो पूर्ण होईल.
55. ‘अरे मरणा, तुझा विजय कोठ? अरे मरणा, तुझी नांगी कोठ?’
56. मरणाची नांगी पाप; आणि पापाच बळ नियमशास्त्र आहे;
57. तरी जो देव आपल्या प्रभु येशू खिस्ताच्या द्वार आपणांला जय देतो त्याचीं स्तुति असो.
58. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्य तुमचे श्रम व्यर्थ नाहींत ह तुम्ही जाणून आहां; म्हणून तुम्ही स्थिर, अढळ व प्रभूच्या कामांत सर्वदा अति तत्पर असा.
|