1. आतां पवित्र जनांसाठीं जी वर्गणी तिजविशयीं मीं गलतीयांतील मंडळîांस आज्ञा दिल्याप्रमाण तुम्हीहि करा.
2. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्हीं प्रत्येकान जस आपणांस यश मिळाल असेल त्याप्रमाण आपणांजवळ द्रव्य जमा करुन ठेवाव; यासाठीं कीं मी येईन तेव्हां वर्गण्या होऊं नयेत.
3. मी येईन तेव्हां ज्या कोणांस तुम्ही पत्र देऊन मान्य कराल त्यांस तुमचा धर्मादाय यरुशलेमास पोहंचविण्याकरितां मी पाठवीन.
4. मींहि जाव अस योग्य दिसल्यास ते माझ्याबरोबर येतील.
5. मी जातांना मासेदोनियांतून तुम्हांकडे येईन; कारण मी मासेदोनियांतून नीट जाणार आह;
6. पण कदाचित् तुम्हांजवळ राहीन व हिंवाळाहि घालवीन, यासाठीं कीं मला जावयाच असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावाव.
7. कारण आतां तुम्हांस केवळ भेटून जाव अशी माझी इच्छा नाहीं; तर प्रभूची इच्छा असल्यास मी कांही दिवस तुम्हांजवळ राहीन अशी आशा आहे.
8. तरी पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस एथ राहीन;
9. कारण मोठ व कार्य साधण्याजोग द्वार मजसाठीं उघडल आहे, आणि विरोध करणारे पुश्कळच आहेत.
10. तीमथ्य आल्यास त्यान तुमच्याजवळ निर्भयपणान राहाव म्हणून खबरदारी घ्या; कारण जसा मी तसा तोहि प्रभूचंे काम करणारा आहे;
11. यास्तव कोणी त्याला तुच्छ मानूं नये, तर त्यान मजकडे याव म्हणून त्याला सुखरुपण वाटेस लावा; कारण मी त्याची बंधुजनासह येण्याची वाट पाहत आह.
12. आपला बंधु अपुल्लोस ह्यान बंधुजनांबरोबर तुम्हांकडे याव, म्हणून मीं त्याला फार विनवणी केली; तथापि आतांच याव अशी त्याची इच्छा अगदी नव्हती; सवड होईल तेव्हां तो येईल.
13. सावध असा, विश्वासांत स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा.
14. तुमच सर्व कांहीं कार्य प्रीतींन व्हाव.
15. बंधुजनहो, तुम्हांला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे; त अखयाच प्रथम फळ आहे, आणि त्यांनी आपणांस पवित्र जनांच्या सेवेला वाहून दिल आहे.
16. अशांस, आणि जो कोणी सेवत साहाय् य करितो व श्रम करितो त्यास, तुम्ही मान्य असाव अशी मी तुम्हांस विनंति करिता.
17. स्तेफना, फर्तूनात व अखायिक हे आल्यान मला आनंद झाला आहे; कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरुन काढिली आहे.
18. त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यांस विश्रांति दिली आहे; यास्तव तुम्ही अशांस मान द्या.
19. आसियांतल्या मंडळîा तुम्हांस सलाम सांगतात. अक्किला व प्रिस्का हीं व त्यांच्या घरांत जी मंडळी जमत असते तीहि तुम्हांस प्रभूमध्य फार फार सलाम सांगतात.
20. सर्व बंधु तुम्हांस सलाम सांगतात. पवित्र चुंबनान एकमेकांस सलाम करा.
21. मज पौलाचा स्वदस्तुरचा सलाम.
22. जर कोणी प्रभूवर प्रीति करीत नाहीं तर तो उत्सृश्ट असो. मारान अथा (आपला प्रभु आला).
23. प्रभु येशू खिस्ताची कृपा तुम्हांसह असो.
24. खिस्त येशूमध्य माझी प्रीति तुम्हां सर्वांसह असो. आमेन.
|