1. आम्ही खिस्ताचे सेवक व देवाच्या गूजांचे कारभारी आहा असे आम्हांला मानाव.
2. कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे.
3. तर तुम्हांकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा. याचहि मला कांही वाटत नाही, मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करीत नाहीं;
4. कारण जरी माझ मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाहीं तरी त्यावरुन मी निर्दोश ठरता अस नाहीं; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभु आहे.
5. यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करुंच नका; तो अंधारातील गुप्त गोश्टी प्रकाशित करील, आणि अंतःकरणांतील संकल्पहि उघड करील; त्या वेळी ज्याची त्याला देवाकडून वाहवा प्राप्त होईल.
6. बंधुजनहो, मी तुम्हांकरितां या गोश्टी अन्योक्तींन स्वतःला व अपुल्लोसाला लावून घेतल्या आहेत; यासाठीं कीं शास्त्रलेखापलीकडे कोणीं जाऊं नये हा नियम आम्हांवरुन तुम्हीं शिकावा; म्हणजे तुम्हांपैकीं कोणीहि एक दुस-यावर फुगणार नाहीं.
7. तुला श्रेश्ठत्व कोणी दिल? आणि ज तुला दिलेल नाहीं अस तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेल असतां, दिलेल नाहीं अशी प्रतिश्ठा कां मिरवितोस?
8. इतक्यांतच तुम्ही तृप्त झालां आहां, इतक्यांतच धनवान् झालां आहां; तुम्ही राजे बनलां असतांच तर ठीक झाल असत, कारण आम्हांलाहि तुम्हांबरोबर राजपद प्राप्त झाल असत.
9. कारण मला वाटत, देवान आम्हां प्रेशितांस शेवटच्या जागेचे आणि मरणास नेमलेल्यांसारखे अस पुढ ठेविल आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांला व मनुश्यांला खेळ असे झाला आहों.
10. आम्ही खिस्तामुळ मूर्ख, तुम्ही खिस्तामध्यं शहाणे; आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त; तुम्ही प्रतिश्ठित, आम्ही अप्रतिश्ठित असे आहा.
11. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडे आहा; आम्ही टोले खाता, आम्हांला घरदार नाहीं;
12. आम्ही आपल्या हातांनीं काम करुन श्रम करिता; आमची निर्भर्त्सना होत असतां आशीर्वाद देता; आमची छळणूक होत असतां ती सहन करितों;
13. आमची निंदा होत असतां आम्ही मनधरणी करिता; आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहा.
14. ह मी तुम्हांस लाजविण्यासाठीं लिहीत नाहीं, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाण तुम्हांस बोध करण्यासाठीं लिहिता.
15. कारण तुम्हांस खिस्तामध्य दहा हजार गुरु असले तरी पुश्कळ बाप नाहीत; मीं तर तुम्हांस खिस्त येशूमध्य सुवार्तेच्या योगान जन्म दिला आहे.
16. यास्तव मीं तुम्हांस विनंति करिता कीं माझ अनुकरण करणारे व्हा.
17. या कारणास्तव प्रभूमध्य माझा प्रिय व विश्वासू पुत्र तीमथ्य याला मीं तुम्हांकडे पाठविल आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळींत शिकविता त्याप्रमाण खिस्तांतील माझ्या शिक्षणपद्वतीची आठवण तो तुम्हांस देईल.
18. मीं तुम्हांकडे येत नाही अस समजून कित्येक फुगले आहेत.
19. तरी प्रभूची इच्छा असली तर मीं तुम्हांकडे लवकर येईन; तेव्हां फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन.
20. कारण देवाच राज्य बोलण्यांत नाहीं, सामर्थ्यात आहे.
21. तुम्हांला कोणत पाहिजे? मी तुम्हांकडे काठी घेऊन याव किंवा प्रीतीन व सौम्यतेच्या आत्म्यान याव?
|