1. स्त्रियांनो, तुम्ही तशाच आपापल्या नव-याच्या अधीन असा; यासाठीं कीं कोणी वचनाला अमान्य असले,
2. तरी तुमच भिडस्तपणच पवित्र वर्तन पाहून वचनावांचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनान ते मिळवून घेण्यांत यावे.
3. तुमची शोभा केसांचे गंुफण, सोन्याचे डागिने घालण, किंवा पोशाक करण यांनी बाहेरुन आणलेली नसावीं;
4. तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृश्टीन बहूमूल्य आहे त्यान, म्हणजे अंतःकरणांतील गुप्त मनुश्यपणान, जी अविनाशी शोभा ती असावी.
5. याप्रमाण पूर्वी, देवावर आशा ठेवणा-या पवित्र स्त्रियांनींहि आपापल्या नव-याच्या अधीन राहून आपणांस शोभविल;
6. तशी सारा अब्राहामाला ‘धनी’ म्हणून त्याच्या आज्ञत राहिली; तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याहि भयप्रद गोश्टीची भीति न बाळगल्यास, तिचीं आतां मुल झालां आहां.
7. नव-यांनो, तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर, त्या आधिक नाजूक पात्र आहेत म्हणून, सुज्ञतेन सहवास ठेवा; जीवनरुपी कृपादानाचे त्यांचे वतनबंधु असे तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांला व्यतय येणार नाहीं.
8. सारांश, तुम्ही सर्व एकचित्त, समदुःखी, बंधुुप्रीति करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा;
9. वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा अस करुं नका; तर उलट आशीर्वाद द्या; आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठीं तुम्हांला पाचारण करण्यांत आले आहे.
10. कारण जीवित आवडत व्हाव, व चांगले दिवस पाहावे, अशी त्याची इच्छा आहे, त्यान दुर्भाशणापासून आपली जिव्हा व कपटी भाशणापासून आपले ओठ आवरावे;
11. त्यान वाइटाचा त्याग करुन बरे त कराव; त्यान शांतिप्रात्यर्थ प्रयत्न करुन तिच अवलंबन कराव.
12. कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणा-यांवर परमेश्वराची नजर आहे.
13. जर तुम्ही चांगल्याची आस्था धरणारे आहां तर तुमच वाईट करणारा कोण?
14. आणि जरी तुम्हांला धार्मिकतेमुळ दुःख सोसाव लागल, तरी तुम्ही धन्य; ‘त्यांच्या भयान भिऊं नका व घाबरुं नका;’
15. तर खिस्त ‘प्रभु’ याला आपल्या अंतःकरणांत ‘पवित्र माना;’ आणि तुम्हांमध्य जी आशा आहे तिची विचारपूस करणा-या तुम्हांमध्य जी आशा आहे तिची विचारपूस करणा-या प्रत्येक इसमाला उत्तर ऐण्यास नेहमीं सिद्ध असा; तरी त सौम्यतेन व भिडेन द्या;
16. त सöाव धरुन द्या; यासाठीं कीं ज्याविशयीं तुमची निंदा होते, त्याविशयीं खिस्तामधील तुमच्या सद्वर्तनावर आळ घेणा-यांनी लज्जित व्हाव.
17. चांगले करुनहि दुःख सोसाव अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करुन दुःख सोसण्यापेक्षां त बर आहे.
18. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठीं खिस्तानहि पापांबद्दल, म्हणजे धार्मिक पुरुशान अधार्मिक लोकांकरितां, एकदा दुःख सोशिल; तो देहरुप जिव मारिला गेला आणि आध्यात्मिकरीत्या जीवंत केला गेला;
19. त्या आत्म्याच्या रुपान त्यान जाऊन बंदिशाळतील आत्म्यांजवळ घोशणा केली.
20. पूर्वी नोहाच्या दिवसांत, तारवांत थोडके म्हणजे आठ प्राणी पाण्यांतून वांचविण्यांत आले; त तारु तयार होत असतां देवाची सहनशीलता वाट पाहत होती, त्या दिवसांत ज्या आत्म्यांनी अवमान केला तेच हे होते;
21. त्या पाण्याचा नमुना जो बाप्तिस्मा, त्याच्यायोग देहाचा मळ दूर करण नव्हे, तर चांगल मन राखण्याचा देवाबरोबर करार करण होय; तो आतां येशू खिस्तसच्या पुनः उठण्याच्या द्वार तुम्हांस तारीत आहे.
22. तो स्वर्गात जाऊन देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेविले आहेत.
|