1. खिस्तान देहरुप दुःख सोशिल तसच तुम्हीहि तच मनोवृत्तिरुपी शस्त्र धारण करा; कारण ज्यान देहान सोशिल आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे;
2. ह्यासाठीं कीं तुम्हीं आपले उरलेल दैहिक आयुश्य मनुश्यांच्या वासनांप्रमाण नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाण घालवाव.
3. कारण विदेशी लोकांना आवडणारीं कर्में करण्यांत म्हणजे कामासक्ति, विशयवासना, मद्यासक्ति, रंगेलपणा, बदफैली व अंमगळ मूर्तिपूजा यांत राहण्यांत जो काळ गेला तितका पुरे;
4. तुम्ही त्यांच्या दंगलाच्या भरांत त्यांजबरोबर धावत नाहीं ह्याच त्यांस नवल वाटून ते तूमची निंदा करितात;
5. जो जीवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील.
6. सुवार्ता मृतांनाहि सांगितली होती, यासाठीं कीं मनुश्यांबरोबर त्यांचा देहसंबंधान न्यायनिवाडा व्हावा, पण त्यांनीं आत्म्यान देवानुसार जगाव.
7. आतां सर्वांचा शेवट जवळ आला आहे; यास्तव मर्यादेन राहा, व प्रार्थना करण्यासाठीं सावध असा;
8. मुख्यतः एकमेकांवर एकनिश्ठेन प्रीति करा; कारण ‘प्रीति पापांची रास झाकून टाकिते.’
9. कुरकूर न करितां एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा;
10. प्रत्येकाला जस कृपादान मिळाल आहे तस देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभा-यांसारिखे त एकमेकांच्या कारणी लावा;
11. भाशण करणा-यान आपण देवाचीं वचन बोलत आहा अस बोलाव; सेवा करणा-यान, ती आपण देवान पुरविलेल्या शक्तीन करीत आहा अशी करावी; यासाठीं कीं सर्व गोश्टींत येशू खिसच्या द्वार देवाच गौरव व्हाव; गौरव व पराक्रम हीं युगानुयुग त्याचीं आहेत. आमेन.
12. प्रिय बंधंूनो, तुमच्या परीक्षणासाठींं ज तीव्र संकट तुम्हांवर आल आहे त्यावरुन आपणांस कांहीं अपूर्व झाल अस वाटून त्याच नवल मानूं नका;
13. ज्यापेक्षा तुम्ही खिस्ताच्या दुःखांचे वांटेकरी झालां आहां त्यापेक्षां आनंद करा; म्हणजे त्याच गौरव प्रकट होण्याच्या वेळेसहि तुम्ही उल्लासान आनंद कराल.
14. ‘खिस्ता’ च्या नांवामुळ ‘तुमची निंदा होत असल्यास’ तुम्ही धन्य आहां; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे ‘देवाचा आत्मा’ तुम्हावर येऊन ‘राहिला आहे.’
15. तरी खून करणारा, चोर, दुश्कर्मी, किंवा दुस-याच्या कामांत ढवळाढवळ करणारा अस होऊन कोणीं दुःख सोसूं नये;
16. खिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सहन करितो तर त्यान लाजूं नये; त्या नांवामुळ देवाच गौरव कराव.
17. देवाच्या ‘घरापासून’ न्यायनिवाड्यास ‘आरंभ होण्याची वेळ’ आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणा-यांचा परिणाम काय होईल?
18. ‘धार्मिक इसम जर कश्टान तरतो तर अनीतिमान् व पापी इसम याला ठिकाण कोठ मिळेल?’
19. यामुळच देवाच्या इच्छेप्रमाण दुःख सहन करणा-यांनी सुकृति करीत आपले जीव विश्वासू उत्पन्नकर्त्याला सोपून द्यावे.
|