1. आत्मा स्पश्ट म्हणतो कीं पुढील काळी विश्वासापासून कितीएक लोक भ्रश्ट होतील, लबाड बोलणा-या मनुश्यांच्या ढागान ते फुसलाविणा-या आम्त्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादीं लागतील;
2. त्या मनुश्यांचा सदसद्विवेक डागलेला असा होईल;
3. लग्न करावयाला ते मना करतील, आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे यांनी ईशोपकारस्मरण करुन ज्यांचा उपभोग घ्यावयाचा अशीं देवान उत्पन्न केलेलीं भक्ष्य वर्ज करण्यास सांगतील.
4. देवान उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे, आणि ईशोपकारस्मरण करुन घेतलेल कांहीं वर्ज्य नाहीं;
5. कारण देवाच वचन व प्रार्थना ह्यांनी त शुद्ध होत.
6. या गोश्टींची बंधवर्गाला आठवण करुन दे, म्हणजे विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तूं अनुसरलास त्या वचनांनी व पोशण करुन घेणारा असा तूं खिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
7. अधर्माच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविशयीं कसरत कर;
8. कारण शारीरिक कसरत थोडीच दपयोगी आहे; सुभक्ती तर सर्वांविशयी उपयोगी आहे; तिला आतांच्या व पुढच्याहि जीवनाची भाक मिळाली आहे.
9. ह वचन विश्वसनीय व सर्वथा स्वीकारास योग्य आहे.
10. याचकरितां आम्ही श्रम व खटपट करितांे; कारण जो सर्व मनुश्यांचा व विशेशंेकरुन विश्वास ठेवणा-यांचा तारणारा, त्या सदाजीवी देवावर आम्हीं आशा ठेविली आहे.
11. या गोश्टी आज्ञारुपान सांगून शिकीव.
12. कोणीं तुझ्या तारुण्याला तुच्छ मानूं नये; तर भाशण, वर्तन, प्रीति, विश्वास व शुद्धता यांविशयीं विश्वास ठेवणा-या लोकांचा कित्ता हो.
13. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण यांकडे लक्ष ठेव.
14. तुजवर वडीलवर्ग हात ठेवीत असतांना संदेशाच्या द्वार दिलेले अस ज कृपादान तुझ्यांमध्य आहे त्याची उपेक्षा करुं नकां.
15. तुझी प्रगति सर्वांस दिसून यावी म्हणून तूं या गोश्टींचा अभ्यास ठेव; यांत गढून जा.
16. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यांतच टिकून राहा; कारण अस केल्यान तूं स्वतःच व तुझंे ऐकणा-यांचेहि तारण करशील.
|