1. ही माझी तुम्हांकडे येण्याची तिसरी खेप. दोघां अगर तिघां साक्षीदारांच्या ताडान प्रत्येक गोश्ट ठरते.
2. ज्यांनीं पूर्वी पाप केल त्यांस व दुस-या सर्वांस मीं पूर्वी सांगितल होत, व दुस-यान तुम्हांजवळ असतांना सांगितल तच आतां दूर असतांनाहि अगोदर सांगतों कीं मी फिरुन आला तर गय करणार नाहीं;
3. खिस्त माझ्याद्वार बोलतो याच प्रमाण तुम्हांला पाहिजे त हच; तो तुम्हांसंबंधान शक्तिहीन नाहीं, तर तुम्हांमध्य शक्तिमान् आहे;
4. त्यास अशक्तपणांत वधस्तंभावर खिळण्यांत आल तरी तो देवाच्या सामर्थ्यान जीवंत झाला आहे. तसे आम्हीहि त्यामध्य शक्तिहीन आहा, तरी देवाच्या सामर्थ्यान त्याजबरोबर तुम्हांबाबत जीवंत असे राहूं.
5. तुम्ही विश्वासांत आहां किंवा नाहीं याविशयीं आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा. येशू खिस्त तुम्हांमध्य आहे अस तुम्ही स्वतःसंबंधान समजतां ना? नाहीं तर तुम्ही कसोटीस उतरलेले नाहीं.
6. कसोेटीस न उतरलेले असे आम्ही नाहीं ह तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे.
7. आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करिता कीं तुम्ही कांहीं वाईट करुं नये; आम्ही कसोटीस उतरलेले दिसाव म्हणून नव्हे, तर आम्ही कसोटीस न उतरलेले असे असला तरी तुम्हीं चांगल कराव म्हणून.
8. कारण सत्याविरुद्ध आम्हांस कांहीं करितां येत नाहीं, तर सत्यासाठीं करितां येत.
9. जेव्हां आम्हीं अशक्त आहा व तुम्ही शक्तिमान् आहां तेव्हां आम्ही आनंद करिता; व याबद्दल प्रार्थनाहि करिता, अशी कीं तुमची पूर्णता व्हावी.
10. यामुळ मी जवळ नसतां ह लिहिता, यासाठीं कीं प्रभून जो अधिकार उभारण्यासाठीं मला दिला, पाडण्यासाठीं नव्हे; त्या अधिकाराप्रमाण जवळ आल्यावर मीं कडकपणा चालवूं नये.
11. बंधुजनहो, इतकच आतां म्हणता, तुमच कल्याण असो; तुम्ही पूर्ण व्हा; समाधान मिळवा; एकचित्त व्हा; शांतींन राहा; म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हांसह राहील.
12. पवित्र चुंबन घेऊन एकमेकांस सलाम करा.
13. सर्व पवित्र जन तुम्हांस सलाम सांगतात.
14. प्रभु येशू खिस्ताची कृपा, देवाची प्रीति, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हां सर्वांसह असो.
|