1. यास्तव आम्हांवर दया झाल्याप्रमाण ही सेवा आम्हांस दिली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाहीं;
2. आम्हीं लज्जेच्या गुप्त गोश्टी वर्जिल्या आहेत, आम्ही कपटान चालत नाहीं व देवाच्या वचनाविशयीं कपट करीत नाहीं; तर सत्य प्रकट करुन देवासमक्ष प्रत्येक मनुश्याच्या मनांला आपणांस पटवितो.
3. आमचीं सुर्वाता आच्छादिलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायीं ती आच्छादिलेली आहे.
4. त्यांजविशयीं या युगाच्या देवान विश्वास न ठेवणा-या लोकांचीं मन अंधळीं केलीं आहेत, यासाठीं कीं देवाची प्रतिमा जो खिस्त त्याच्या तेजाच्या सुर्वातेचा प्रकाश त्यांवर प्रकाशूं नये.
5. आम्ही आपल नव्ह, तर खिस्त येशू हा प्रभु अस त्याच घोशण करितांे, आणि येशूमुळ आम्ही तुमचे दास अस स्वतःचें घोशण करिता.
6. अंधारांतून उजेड प्रकाशित होईल अस जो देव बोलला तो, येशू खिस्ताच्या मुखावरील देवाच्या तेजाच ज्ञान प्रकाशित कराव म्हणून, आमच्या अंतःकरणांत प्रकाशला आहे.
7. हीं आमची संपत्ति मातीच्या भांड्यांत आहे, यासाठीं कीं सामर्थ्याची पराकाश्ठा देवाची आहे, आमच्या द्वारा होत नाहीं, ह समजाव.
8. आम्हांवर चोहाकडून संकटे आलीं तरी आम्ही संकुचित झाला नाहीं; घोटाळîांत पडला तरी निराश झाला नाहीं;
9. आमचा पाठलाग झाला तरी आमचा परित्याग करण्यांत आला नाहीं; आम्ही खालीं पाडलेल आहा तरी आमचा नाश झालां नाहीं;
10. आम्हीं येशूचा वध सर्वदा शरीरांत वागविता; यासाठीं कीं येशूच जीवनहि आमच्या शरीरांत प्रकट व्हाव.
11. कारण जे आम्ही जीवंत राहता ते येशूमुळ मरणाला सदासर्वदा सोपल जात आहा, यासाठीं कीं येशूच जीवनहि आमच्या मर्त्य देहांत प्रकट व्हाव.
12. आम्हांमध्य मरण, पण तुम्हांमध्य जीवन आपल कार्य चालवित.
13. ‘मीं विश्वास धरिला म्हणून बोलला.’ या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायीं असल्यामुळ आम्ही विश्वास धरिता आणि त्यामुळ बोलताहि.
14. ह आम्हांस ठाऊक आहे कीं ज्यान प्रभु येशूला उठविल तो येशूबरोबर आम्हांसहि उठवील व तुमच्याबरोबर सादर करील.
15. सर्व कांही तुम्हांकरितां आहे, यासाठीं कीं जी कृपा पुश्कळ जणांवर होऊन विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभारप्रदर्शन होण्यासाठीं साधनीभूत व्हावी.
16. यास्तव आम्ही धैर्य सोडीत नाहीं; आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसदिवस नवा होत आहे.
17. कारण आम्हांबरोबर येणार क्षणिक व अल्प संकट ह आम्हांसाठीं अत्यंत मोठ्या प्रमाणांत अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करित;
18. आम्ही दृश्य वस्तूंकडे नाहीं तर अदृश्य वस्तूंकडे लक्ष लाविता; कारण दृश्य वस्तु क्षणिक आहेत, पण अदृश्य वस्तु अनंतकालिक आहेत.
|