1. बंधुजनहो, मासेदोनियांतील मंडळîांवर झालेली देवाची कृपा आम्ही तुम्हांस कळविता;
2. ती अशी कीं संकटाच्या मोठ्या परीक्षत त्यांच्या आनंदाचा अतिरेक व त्यांचे अत्यंत दारिद्रî, यांमध्य त्यांची औदार्यसंपत्ति विपुल झाली.
3. कारण त्यांनी शक्तीप्रमाण व शक्तीपलीकडेहि आपण होऊन दान दिल अशी मी साक्ष देता.
4. त्यांनी फार विनंति करुन आम्हांजवळ मागितल कीं पवित्र जनांची सेवा करण्यांत आम्हांस अंशभागी करण्याची कृपा व्हावी;
5. आम्हांस अपेक्षा होती तेवढच नाहीं, तर त्यांनी प्रथम आपणांस प्रभूला दिल, आणि देवाच्या इच्छन आपणांस आम्हांलाहि दिल.
6. ह्यावरुन आम्हीं तीताजवळ विनंति केली कीं जसा त्यान पूर्वीं आरंभ केला होता त्याप्रमाण तुम्हांमध्य कृपेच्या ह्या कार्याची पूर्णताहि करावी.
7. तर विश्वास, भाशण, ज्ञान, प्रत्येक गोश्टीची कळकळ, व आम्हांवरील तुमची प्रीति या सर्वाची जशी तुम्हांमध्य विपुलता आहे तशी कृपेच्या ह्या कार्याचीहि असावी.
8. ह मी आज्ञा म्हणून सांगत नाहीं, तर दुस-यांच्या ठायीं दिसून येणा-या आस्थेवरुन तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा मी पाहता.
9. आपल्या प्रभु येशू खिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान् असतां तुम्हांकरितां दरिद्री झाला, यासाठीं कीं त्याच्या दारिद्रîान तुम्हीं धनवान् व्हाव.
10. याविशयीं मी आपल मत सांगता; ह्याचा तुम्हांस उपयोग होण्यासारखा आहे; कारण तुम्ही एका वर्शामाग इतरांपूर्वी असे करण्यास आरंभ केला, इतकच नव्हे, तर अशी इच्छा बाळगण्यासहि केला.
11. तर आतां ह कार्य पूर्ण करा; ह्यासाठीं कीं जशी इच्छेची उत्सुकता तुम्हांस होती तशी तुमच्या प्राप्तीप्रमाण कार्यसिद्धि व्हावी.
12. उत्सुकता असली म्हणजे जस ज्याजवळ असेल तस ते मान्य होत; ज नसल त्याप्रमाण नाहीं.
13. दुस-यांस सुख व तुम्हांस दुःख व्हाव अस नाहीं.
14. तर ह समानतेन व्हाव, म्हणजे प्रस्तुत काळीं तुमच्या भरपूरींतून त्यांची गरज भागावी, आणि पुढ त्यांच्या भरपुरींतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी;
15. ‘ज्यान फार गोळा केल होत त्याच अधिक भरलें नाहीं; तसेंच ज्यानें थोडें गोळा केलें होतें त्यांचें कांही कमी भरल नाहीं,’ अस शास्त्रांत लिहिल आहे.
16. तीताच्या मनांत तुम्हांविशयीं तशीच कळकळ उत्पन्न करणा-या देवाची स्तुति असा.
17. त्यान आमची सूचना मान्य केली; तरी तो स्वतः फार उत्सुक असल्यामुळ आपण होऊन तुम्हांकड निघून गेला.
18. त्याच्याबरोबर आम्हीं एका बंधूला पाठविल आहे; सुवार्तेसंबंधी त्याची प्रशंसा सर्व मंडळîांतून पसरली आहे;
19. इतकच केवळ नाहीं, तर आम्हांकडून प्रभूच्या गौरवासाठीं व आमची उत्सुकता पटविण्यासाठीं चालविलेल्या कृपेच्या ह्या कार्यांत मंडळîांनीं आमच्या प्रवासांत त्याला सोबती म्हणून नेमिल;
20. आम्हांकडून चालविलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणीं आम्हांला दोश लावूं नये म्हणून तजवीज केली आहे;
21. कारण ‘प्रभूच्या दृश्टीन ज मान्य,’ इतकच नव्हे तर ‘मनुश्याच्या दृश्टीनंेहि ज मान्य’ त्याची आम्ही काळजी घेत असता.
22. त्यांच्याबरोबर आम्हीं आमच्या दुस-या एका बंधूला पाठविल आहे, त्याच्या उत्सुकतेची परीक्षा आम्हीं पुश्कळ गोश्टींत अनेक वेळां केली आहे; त्याचा आतां तुम्हांवर फार भरवसा असल्यामुळ तो अधिक उत्सुक आहे अस आम्हांस पटल आह.
23. तीताविशयीं कोणी विचारील तर तो माझा साथी व तुमच्याकरितां माझा सहकारी आहे; आमचे बंधु म्हटले तर ते मंडळîांचे प्रेशित, खिस्ताच गौरव असे आहेत.
24. यास्तव त्यांस तुम्ही आपल्या प्रीतींचे आणि तुम्हांविशयींच्या आमच्या अभिमानाच प्रमाण मंडळîांसमक्ष दाखवा.
|