1. बंधुजनहो, आतां इतकच सांगणें आहे कीं आम्हांसाठी प्रार्थना करा; यासाठीं कीं प्रभूच्या वचनाची त्वरेन प्रगति व्हावी; जस तुम्हांमध्य तस सर्वत्रहि त्याच गौरव व्हाव.
2. आणि आम्हीं वावग्या व दुश्ट मनुश्यांपासून सुटाव; कारण सर्वांच्या ठायीं विश्वास आहे अस नाहीं.
3. प्रभु विश्वासू आहे, तो तुम्हांस स्थिर करील, व दुश्टापासून राखील.
4. तुम्हांविशयी प्रभूमध्य आतचा असा भरवसा आह कीं आम्ही तुम्हांस ज सांगता त तुम्ही करितां व पुढहि कराल.
5. प्रभून तुमची मन देवावरच्या प्रीतींत व खिस्ताच्या सहनतंेत मार्गी लावावीं.
6. बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभु येशू खिस्ताच्या नामान तुम्हांस आज्ञा करिता कीं अव्यवस्थितपण वागणा-या व आम्हांपासून मिळवून घेतलेल्या विधीप्रमाण न चालणा-या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हाव.
7. आमचें अनुकरण कोणत्या रीतींन केल पाहिजे ह तुम्हां स्वतःला ठाऊक आहे; आम्ही तुम्हांमध्य अव्यवस्थितपण वागला नाहीं;
8. आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाहीं; तुम्हांतील कोणावर भार घालूं नये म्हणून आम्हीं श्रमान व कश्टान रात्रंदिवस काम केल.
9. आम्हांस अधिकार नाहीं अस म्हणण नाही, तर आमच अनुकरण करण्यास आम्हीं आमचा कित्त तुम्हांस द्यावा म्हणून अस केल.
10. आम्ही तुम्हांजवळ होता तेव्हांहि, कोणाला काम करण्याची इच्छा नसली तर त्यान खाऊंहि नये, अशी तुम्हांस आज्ञा केली.
11. तरी तुमच्यामध्य कित्येक अव्यवस्थितपणान वागणारे, कांही एक काम न करणारे व लुडबुड्ये आहेत, अस ऐकता.
12. अशा लोकांना आम्ही प्रभु येशू खिस्ताच्या नामान आज्ञा व बोध करिता कीं त्यांनीं स्वस्थपण काम करुन आपलच अन्न खाव.
13. तुम्ही तर बंधूनो, सुकृति करण्यांत थकूं नका.
14. या पत्रांतील आमच वचन जर कोणी मानीत नसला तर त्या मनुश्यााला पाहून ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची सोबत धरुं नका,
15. तरी त्याला शत्रूप्रमाण समजूं नका, तर त्याला बंधूप्रमाण बोध करा.
16. शांतीचा प्रभु हा सर्वकाळ सर्व प्रकार तुम्हांस शांति देवो. प्रभु तुम्हां सर्वांबरोबर असो.
17. मीं पौलान स्वहस्त लिहिलेला सलाम; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे, ह माझ अक्षर आहे.
18. आपला प्रभु खिस्त याची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.
|