1. मग अस झाल कीं आमचात्यांचा कश्टान वियोग झाल्यानंतर आम्ही तारवांतून कोसास नीट गेला, व दुस-या दिवशीं रुदास व तेथून पात-यास गेला;
2. नंतर पलीकडे फेनिकेस जाणार तारुं मिळाल्यावर त्यांत बसून आम्ही निघाला;
3. 3मग कुप्र दृश्टीस पडल तेव्हां त डावीकडे टाकून आम्ही सूरियाकडे जाऊन सोरास उतरला, कारण तेथ तारवांतील माल उतरावयाचा होता;
4. आणि शोधांतीं आम्हांस शिश्य भेटले म्हणून आम्ही तेथे सात दिवस राहिला; त्यांनीं आत्म्याच्या द्वार पौलाला म्हटल, तूं यरुशलेमांत पाऊल टाकूं नये.
5. 5मग अस झाल कीं ते दिवस गेल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झाला; तेव्हां स्त्रिया व मुल यांच्यासुद्धां सर्वांनीं आम्हांस नगराबाहेर पोहंचविल, तेथ समुद्राच्या तीरीं आम्हीं गुडघे टेकून प्रार्थना केली;
6. एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवांत बसला, आणि ते आपल्या घरीं माघारे गेले.
7. मग सोरापासूनचा आम्हीं आपला जलप्रवास संपविला, आणि प्तलमैसास येऊन व बंधुवर्गास भेटून त्यंाच्या एथ एक दिवस राहिला.
8. दुस-या दिवशीं आम्ही निघून कैसरीयास आला, आणि सुवार्तिक फिलिप्प याच्या घरीं जाऊन राहिला; हा सातांपैकी एक होता.
9. 9त्याला चार अविवाहित कन्या असून त्या ईश्वरसंदेश देत असत.
10. तेथ आम्ही पुश्कळ दिवस राहिला असतां अगब नाम कोणीएक संदेश्टा यहूदीयाहून खालीं आला.
11. त्यान आम्हांकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटल, पवित्र आत्मा अस म्हणतो, ज्या मनुश्याचा हा कमरबंद आहे त्याला यरुशलेमांत यहूदी लोक याप्रमाण बांधून विदेशी लोकांच्या हाती देतील.
12. ह ऐकून आम्हीं व तेथल्या लोकांनांहि तूं यरुशलेमांत जाऊं नये, अशी त्याला विनंति केली.
13. तेव्हां पौलान उत्तर दिल, तुम्ही रडून माझ मन खचवितां ह काय? मी नुसता बंधांत पडण्यासच नव्हे, तर प्रभु येशूच्या नामासाठीं यरुशलेमांत मरावयास देखील तयार आह.
14. तो ऐकत नाहीं ह पाहून आम्हीं स्वस्थ राहून म्हटल, प्रभूच्या इच्छेप्रमाण होवो.
15. त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करुन यरुशलेमास वर गेला.
16. आमच्याबरोबर कैसरीयांतील कित्येक शिश्यहि आले, त्यांनी आपल्याबरोबर कुप्र एथील म्नासोन, ह्या जुन्या शिश्यांस आणिल; त्याच्या येथ आम्हांस राहावयाच होत.
17. यरुशलेमास आल्यावर बंधुजनांनीं आनंदान आगतस्वागत केल.
18. मग दुस-या दिवशी पौल आम्हांसुद्धां याकोबाच्या येथंे गेला; आणि सर्व वडीलवर्ग तेथ आला.
19. तेव्हां त्यान त्यांस भेटून आपल्या सेवेच्या योग जीं कार्ये देवान विदेशी लोकांमध्य केलीं त्यापैकीं एकेक सविस्तर सांगितल.
20. त ऐकून त्यांनी देवाच गौरव केल, व त्याला म्हटल, भाऊ, ज्यांनी विश्वास ठेविला असे यहूद्यांमध्य किती हजारा लोक आहेत ह तूं पाहतोस; ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत;
21. तुजविशयीं त्यांस अस कळविण्यांत आल आहे कीं तूं विदेशी लोकांत राहणा-या सर्व यहूद्यांस मोशाचा त्याग करावयास शिकवितोस आणि आपल्या मुलांची संुता करुं नये, व परिपाठांप्रमाण चालूं नये असहि सांगतोस.
22. तर आतां काय कराव? तूं आला आहेस ह ते खचीत ऐकतील.
23. यास्तव आम्ही तुला ज सांगता ते कर; नवस केलेले असे आमच्यांत चौघे जण आहेत;
24. त्यांस घेऊन त्यांच्यासह तूं व्रतस्थ हो, आणि त्यांनी मुंडण कराव म्हणून त्यांचा खर्च तूं कर, म्हणजे तुजविशयीं ज कळविण्यांत आल आहे त्यांत कांहीं अर्थ नसून तूं स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थेन वागतोस असंे सर्वांस समजेल;
25. परंतु ज्यांनीं विश्वास ठेविला आहे अशा विदेश्यांसंबंधान आम्हीं निर्णय करुन लिहून पाठविल आहे कीं त्यांनी मूर्तीस अर्पिलेले पदार्थ, रक्त, गुदमरुन मेलेले प्राणी व व्यभिचार यांपासून आपणांस राखाव.
26. तेव्हां पौल त्या मनुश्यांस घेऊन दुस-या दिवशीं त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरांत गेला, आणि ज्या दिवशीं त्यांच्यांतील एकेकासाठीं अर्पण करावयाच त्या दिवसापर्यंत व्रताच दिवस आपण पूर्ण करीत आहा अस त्यान दर्शविल.
27. पुढ ते सात दिवस पूर्ण होणार होते, तेव्हां आसियांतले यहूदी यांनी त्याला मंदिरांत पाहून सर्व लोक समुदायाला चेतविल, आणि त्याजवर हात टाकून
28. आरोळी मारुन म्हटल, अहो इस्त्राएल लोकांना, धावा हो धावा; आपले लोक, नियमशास्त्र व ह स्थळ यांविरुद्ध जो सर्व ठिकाणीं सर्वांस शिकवितो तो हाच आहे; शिवाय यान हेल्लेण्यांस मंदिरांत आणून ह पवित्रस्थान विटाळविल आहे.
29. यांनीं त्रफिम इफिसकर याला पूर्वी त्याच्याबरोबर नगरंत पाहिल होत; त्याला पौलान मंदिरांत आणिल असाव, अशी त्यांची कल्पना होती.
30. तेव्हां सर्व नगर गलबलून लोकांची एकच गर्दी झाली; आणि त्यांनी पौलाला धरुन मंदिरांतून बाहेर ओढून काढिल; ताच दरवाजे बंद झाले.
31. मग ते त्याला जिव मारावयाला पाहत असतां पलटणाच्या सरदारकडे बातमी लागली कीं सर्व यरुशलेमांत गडबड उडाली आहे.
32. तेव्हांव तो शिपाई व जमादार यांस घेऊन त्यांजकडे खाली धांवत गेला. सरदार व शिपाई यांस पाहून ते पौलाला मारितांना थांबले.
33. तेव्हां सरदारान जवळ त्याला धरिल आणि दोन सांखळîांनीं बांधण्यास हुकूम केला; मग हा कोण व यान काय केल अस त्यान विचारिल.
34. तेव्हां लोकांतून कोणीं कांही, कोणी कांही ओरडले; ह्या गलबल्यामुळ त्याला खात्रीलायक अस कांहीं कळेना, म्हणून त्यान त्याला गढींत नेण्याचा हुकूम केला.
35. तो पाय-यांवर आला तेव्हां अस झाल कीं लोकांच्या दांडगाव्यामुळ शिपायांनीं त्याला उचलून नोल;
36. कारण लोकांचा समुदाय माग चालत असून, याची वाट लाव, असे ओरडत होता.
37. मग पौलाला गढींत नेणार इतक्यांत त्यान सरदाराला म्हटल, मला आपल्याबरोबर कांही बोलावयाची परवानगी मिळेल का? तो म्हणाला, हेल्लेणी भाशा तुला येते काय?
38. ज्या मिस-यान थोड्या दिवसांमाग बंड उठवून त्या चार हजार मारेक-यांस रानांत नले तो तूंच आहेस कीं नाहीं?
39. तेव्हां पौलान म्हटल, मी किलिकियांतील तार्सकर यहूदी आह; हलक्या नगराचा राहणारा नव्ह; मी आपल्याला विनंति करिता कीं लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.
40. त्यान परवानगी दिल्यावर पौलान पाय-यांवर उभ राहून लोकांस हातान खुणाविल; आणि अगदीं निवांत झाल्यावर तो त्यांजबरोबर इब्री भाशत येणेप्रमाण बोलला:
|