1. मग अग्रिप्पान पौलाला म्हटल, तुला स्वतःच्या तर्फे बोलावयास परवानगी आहे. तेव्हां पौलान हात पुढ करुन प्रत्युत्तर केल:
2. अग्रिप्पा महाराज, यहूद्यांच्या चालीरिती, त्यांच्या वादविशयक बाबी व धर्मविचार ह्यांत आपण विशेश जाणते आहां, आणि आपणापुढ, यहूदी ज्याविशयीं मजवर दोशारोप ठेवितात त्या सर्वांविशयीं मला आज प्रत्युत्तर द्यावयाच आहे, यावरुन मी आपणाला भाग्यवान् समजता; आणि मी आपल्याला विंनति करिता कीं शांतपण माझ ऐकून घ्या.
4. तरुणपणापासून म्हणजे अगदीं पहिल्यापासून माझ्या लोकांत व यरुशलेमांत माझ वर्तन कस होत त सर्व यहूद्यांस माहीत आहे.
5. ते पहिल्यापासून मला ओळखतात; म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील कीं आमच्या धर्माच्या कडकडीत पंथाप्रमाण मी परुशी होता.
6. आतां देवान आमच्या पूर्वजांस ज वचन दिल, त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरितां मी उभा आह;
7. त वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश, देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेन करीत आहेत. हे राजा, तीच आशा बाळगल्याबद्दल मजवर यहूद्यांनीं आरेाप ठेविला आहे.
8. जर देव मेलेल्यांस उठवितो तर ह तुम्ही अविश्वसनीय कां ठरवितां?
9. 9मलाहि वाटत असे कीं नासोरी येशूच्या नामाविरुद्ध पुश्कळ कार्य कराव;
10. आणि तस मीं यरुशलेमांत केलहि; मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुश्कळ पवित्र जनांना बंदिशाळांत काेडून टाकिल, आणि त्यांचा घात करण्यास मी संमति दिली.
11. प्रत्येक सभास्थानांत त्यांस वारंवार शासन करुन त्यांस दुर्भाशण करण्यास लावण्याचा प्रयत्न मी करीत अस; त्यांजवर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरांपर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करीत अस.
12. माझा असा क्रम चालू असतां, मुख्य याजकांच्या अधिकारान व त्यांचा परवाना काढून, मी दिमिश्काकडे चालला होता;
13. तेव्हां, हे राजा, वाटेवर दोन प्रहरीं सूर्याच्या तेजापेक्षां प्रखर असा आकाशाचा प्रकाश माझ्या व मजबराबर चालणा-या इसमांच्या सभोवतीं चकाकतांना मीं पाहिला.
14. तेव्हां आम्ही सर्व भूमीवर पडला, इतक्यांत इब्री भाशत मजबरोबर बोलतांना अशी वाणी मीं ऐकली कीं, शौला, शौला, माझा छळ कां करितोस? पराणीवर लाथ मारण ह तुला कठीण.
15. मी म्हटल, प्रभो, तूं कोण आहेस? प्रभु म्हणाला, ज्या येशूचा तूं छळ करितोस तोच मी आह.
16. तर उठून उभा राहा; तूं ज मला पाहिल त्याविशयीं, आणि या लोकांपासून व विदेशी लोकांपासून तुझ रक्षण करितांना तुला ज दर्शन देईन त्याविशयीं सेवक व साक्षी नेमावे यासाठीं मीं तुला दर्शन दिल आहे;
18. त्यांकडे मी तुला पाठविता, यासाठीं कीं त्यांनीं अंधारांतून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारांतून देवाकडे वळाव, म्हणून तूं त्यांचे डोळे उघडावे, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व मजवरल्या विश्वासान पवित्र झालेल्या लोकांमध्य वतन मिळाव.
19. यास्ंतव हे राजा अग्रिप्पा, मीं तो स्वर्गीय दृश्टांत अवमानिला नाहीं;
20. तर पहिल्यान दिमिश्कांत व यरुशलेमांत, अवघ्या यहुदीया देशांत व विदेशी लोकांत उपदेश केला कीं पश्चाताप करा, आणि पश्चातापास शोभतील अशी कर्मे करुन देवाकडे वळा.
21. या कारणामुळ यहूदी मला मंदिरांत धरुन वधावयाला पाहत होते.
22. तथापि देवापासून साहाय् य प्राप्त झाल्यामंळ मी लहानमोठ्यांस आजपर्यंत याक्ष देत राहिला आह; आणि ज्या गोश्टीं होणार आहेत म्हणून संदेश्ट्यांनीं व मोशान सांगितले त्यांखेरीज मीं दुसर कांहीं सांगतिल नाहीं;
23. त्या अशा कीं खिस्तान दुःख सोसणार असाव आणि मेलेल्यांतून उठणारांपैकी पहिले असून त्यान आमच्या लोकांस व विदेशी लोकांस प्रकाश प्रकट करावा.
24. याप्रमाण तो प्रत्युत्तर करीत असतां, फेस्त मोठ्यान बोलला, पौला तूं वेडा आहेस; विद्येच अध्ययन फार झाल्यामुळ तुझ डाक फिरुं लागल आहे.
25. पौल म्हणाला, फेस्त महाराज, मी वेडा नाहीं; खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोश्टी बोलता.
26. या गोश्टी महाराजांना ठाऊक आहेत; आपणासमोर मी प्रशस्तपण बोलता; यांतले आपणापासून कांही गुप्त राहिल नाहीं अशी माझी खातरी आहे; कां तर ह कोनाकोप-यांत घडलेल नाहीं.
27. हे राजा अग्रिप्पा, संदेश्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, ह मला ठाऊक आहे.
28. तेव्हां अग्रिप्पान पौलाला म्हटल, मी खिस्ती व्हाव म्हणून तूं थोडक्यानच माझ मन वळवितोस.
29. पौल म्हणाला, थोडके अगर फार, कसहि असो; पण केवळ आपणच नव्हे, तर आज ह जे सर्व माझ ऐकत आहेत त्यांनी या बंधंनांशिवाय माझ्यासारिख व्हाव, अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.
30. तेव्हां राजा, सुभेदार, बर्णीका व त्यांजबरोबर जे बसले होते ते उठले
31. आणि एकीकडे जाऊन एकमेकांत म्हणाले, या माणसान मरणास किंवा बंधनास योग्य अस कांहीं केल नाहीं.
32. तेव्हां अग्रिप्पान फेस्ताला म्हटल, जर या माणसान कैसराजवळ न्याय मागितला नसता तर याला मोकळ करितां आल असत.
|