1. एकदा पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस तिस-या प्रहरीं मंदिरांत जात होते.
2. तेव्हां जन्मतः पांगळा असा कोणीएक माणूस होता; त्याला उचलून नेऊन मंदिरांत जाणा-यांजवळ भीक मागण्यासाठीं प्रतिविशीं मंदिराच्या सुंदर नाम दरवाजाजवळ ठेवीत असत.
3. पेत्र व योहान ह मंदिरांत जाणार आहेत अस पाहून त्यान भीक मागितली.
4. तेव्हां पेत्र व योहान त्याला निरखून पाहून म्हणाले, आम्हांकडे पाहा.
5. तेव्हां त्यांजपासून कांही मिळेल अशी आशा धरुन त्यान त्यांजकडे लक्ष लाविल.
6. पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोनरुप कांही नाहीं; ज आह त तुला देता; नासोरी येशू खिस्ताच्या नामान चालूं लाग;
7. आणि त्यान त्याचा उजवा हात धरुन त्याला उठविल, तेव्हां त्याचीं पावल व घोटे यांत तत्काळ बळ आल;
8. तो उडी मारुन उभा राहिला व चालूं लागला; आणि तो चालत, उड्या मारीत व देवाची स्तुति करीत त्यांच्याबरोबर मंदिरांत गेला.
9. त्याला सर्व लोकांनी चालतांना व देवाची स्तुति करितांना पाहिल;
10. आणि जो मंदिराच्या सुंदर दरवाजाजवळ भीक मागण्यासाठीं बसत असे तो हाच अस त्यांनी ओळखिल. तेव्हां त्याला ज घडल होत त्यावरुन ते आश्चर्यान व विस्मयान व्याप्त झाले.
11. मग तो पेत्र व योहान यांस बिलगून राहिला असतां, सर्व लोक फार विस्मित होऊन त्यांजकडे शलमोनाची देवडी म्हटलेल्या ठिकाणीं धावत आले.
12. ह पाहून पेत्रान लोकांस म्हटल, अहो, इस्त्राएल लोकांनो, याच आश्चर्य कां करितां? अथवा आम्हीं आपल्या सामर्थ्यान अगर सुभक्तीन याला चालावयास लाविल अस समजून आम्हांकडे कां न्याहाळून पाहतां?
13. अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, यान आपला सेवक येशू याच गौरव केल; त्याला तुम्हीं धरिल व पिलातान त्याला सोडावयाचा निश्चय केला असतांहि त्याच्यासमक्ष त्याला नाकारिल.
14. जो पवित्र व धार्मिक पुरुश त्याला तुम्हीं नाकारिल आणि घातकी पुरुश आम्हांस द्या अस मागितल.
15. तुम्हीं जीवनाच्या अधिका-याला जिव मारिल; त्याला देवान मेलेल्यांमधून उठविल याचे आम्ही साक्षी आहा.
16. ज्याला तुम्ही पाहतां व ओळखिता त्या या मनुश्याला त्याच्या नामावरील विश्वासावरुन, त्याच्या नामान, शक्तिमान् केल; त्याजवरील विश्वासान याला तुम्हां सर्वासमक्ष ही शरीरसंपत्ति प्राप्त झाली.
17. बंधुजनहो, मी ह जाणून आह कीं तुम्हीं हे अज्ञानामुळ केल, तसच तुमच्या अधिका-यांनींहि केल;
18. परंतु आपल्या खिस्तान दुःख सहन कराव म्हणून देवान सर्व संदेश्ट्यांच्या मुखान पूर्वी सांगितल त त्यान त्याप्रमाण पूर्ण केल.
19. यास्तव तुमचीं पाप पुसून टाकिली जावीं म्हणून पश्चाताप करा व माग वळा, अशासाठीं कीं विश्रांति मिळण्याचे समय प्रभूजवळून यावे;
20. आणि तुम्हांकरितां पूर्वी नेमिलेला येशू खिस्त याला त्यान पाठवाव;
21. ज्याविशयीं आरंभापासून देवान आपल्या पवित्र संदेश्ट्यांच्या मुखान सांगितल, त्या सर्वांचे यथास्थित होण्याच्या काळापर्यंत त्याला स्वर्गांत राहण प्राप्त आहे.
22. मोशानहि म्हटल, ‘प्रभु देव माझ्यासारिखा संदेश्टा तुम्हांसाठीं तुमच्या भावांमधून उठवील; तो ज कांही तुम्हांला सांगेल त सर्व त्याच ऐका;
23. आणि अस होईल कीं जो कोणी त्या संदेश्ट्यांचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदीं नश्ट केला जाईल.’
24. आणखी शमुवेलापासून, आणि परंपरेन जे संदेश्टे झाले त्यांजपासून, जितके बोलत आले त्या सर्वांनीं ह्या दिवसाविशयीं सांगितल.
25. तुम्ही संदेश्ट्यांच पुत्र आहां, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वार पृथ्वींतील सर्व कुळ आशिर्वादित होतील,’ अस अब्राहामाला बोलून देवान तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेहि पुत्र तुम्ही आहां.
26. देवान आपल्या सेवकाला उठवून प्रथम तुम्हांकडे पाठविल, यासाठीं कीं त्यान तुम्हां प्रत्येकाला तुमच्या दुश्कर्मांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.
|