1. ते लोकांबरोबर बोलत असतां त्यांजवर याजक, मंदिराचा सरदार व सदोकी हे चालून आले;
2. कारण ते लोकांस शिक्षण देऊन, येशूच्या द्वार मेलेल्यांतून पुनः उठण होईल अस प्रसिद्धपण सांगतात, ह्याच त्यांस अतिशय वाईट वाटल.
3. तेव्हां त्यांनी त्यांजवर हात टाकिले, व संध्याकाळ झाली म्हणून सकाळपर्यंत त्यांस चौकीतं ठेविल.
4. तथापि वचन ऐकणा-यांतील पुश्कळ लोकांनी विश्वास धरिला, आणि पुरुशांची संख्या सुमार पांच हजार झाली.
5. नंतर दुस-या दिवशीं अस झाल कीं त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री,
6. हे आणि मुख्य याजक हन्ना, कयफा, योहान, आलेक्सांद,्र व मुख्य याजकाच्या कुळांतील एकत्र झाले;
7. आणि त्यांनीं त्यांस मध्य उभ करुन विचारिल, ह तुम्ही कोणत्या सामर्थ्यान किंवा कोणत्या नामान केल?
8. तेव्हां पेत्र पवित्र आत्म्यान पूर्ण होऊन त्यांस म्हणाला, अहो लोकाधिका-यांनो व वडील जनांनो,
9. एका दुर्बल मनुश्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशान बरा झाला, याविशयीं आमची चौकशी आज व्हावयाची असेल,
10. तुम्हां सर्वास व सर्व इस्त्राएल लोकांस ह कळाव कीं ज्याला तुम्हीं वधस्तंभावर खिळून मारिल, ज्याला देवान मेलेल्यांमधून उठविल, त्या नासोरी येशू खिस्ताच्या नामान हा मनुश्य बरा होऊन तुमच्या पुढ उभा राहिला आहे.
11. ‘जो धांेडा तुम्ही बांधणा-यांनीं तुच्छ मानिला असतां कोनशिला झाला’ तो हाच आहे;
12. आणि तारण दुस-या कोणाकडून नाहीं; जेणेकरुन आपल तारण व्हावयाच अस दुसर नाम आकाशाखालीं मनुश्यांमध्य दिलेल नाहीं.
13. तेव्हां पेत्राच व योहानाच धैर्य पाहून, तसच हे अनाक्षर व अज्ञानी इसम आहेत अस समजून त्यांनी आश्चर्य केल; आणि हे येशूच्या सहवासांत होते असंेहि त्यांनी ओळखिल;
14. तरी त्या बर झालेल्या मनुश्यांस त्यांच्याजवळ उभे असलेल पाहून त्यांच्यान कांही विरिुद्ध बोलवेना.
15. मग त्यांनी त्यांस सभेच्या बाहेर जाण्यास आज्ञा केली, आणि ते आपसांत विचार करुन म्हणाले,
16. या माणसांस आपण काय कराव? कारण त्यांजकडून प्रसिद्ध चमत्कार घडला खरा, ह सर्व यरुशलेमकरांस ठाऊक आहे; त आपणांला नाहीं म्हणतां येत नाहीं;
17. तरी ह लोकांमध्य अधिक पसरुं नये म्हणून त्यांस अशी धमकी द्यावी कीं यापुढ त्यांनी या नामान कोणाबरोबर बोलूं नये.
18. मग त्यांनी त्यांस बेालवून अशी निक्षून ताकीद दिली कीं येशूच्या नामान अगदीं बोलूं अगर शिकवूंहि नका;
19. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांस उत्तर दिल कीं देवापेक्षां तुमच ऐकाव ह देवाच्या दृश्टीन योग्य कींं अयोग्य याचा तुम्हीच विचार करा.
20. ज आम्हीं पाहिले व ऐकल त बोलूं नये ह आमच्यान होत नाहीं.
21. तेव्हां त्यांनी त्यांस आणखी धमकावून सोडून दिल; त्यांस शिक्षा करावी ह लोकांमुळ त्यांस सुचेना; कारण घडलेल्या गोश्टीमुळ सर्व लोक देवाच गौरव करीत होते;
22. आणि बर करण्याचा हा चमत्कार ज्याच्यावर घडला होता तो मनुश्य वयान चाळीस वर्शांवर होता.
23. ते सुटल्यानंतर आपल्या मंडळाकडे गेले, आणि त्यांस मुख्य याजकांनी व वडिलांनीं ज कांहीं म्हटल होत त सर्व त्यांनी सांगितल.
24. ह ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीन म्हणाले, हे प्रभो, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्व कांही यांचा उत्पन्नकर्ता तूंच आहेस;
25. आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, याच्या मुखान पवित्र आत्म्याच्या द्वार तूं म्हटल; रार्श्टे का खवळलीं, व लोकांनी व्यर्थ कल्पना कां केल्या?
26. प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिशिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी जमले;
27. कारण खरोखरच तुझा अभिशिक्त म्हणजे तुझा पवित्र सेवक येशू याच्याविरुद्ध ह्या शहरांत विदेशी लोक व इस्त्राएल लोक यांच्यासुद्धां हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले;
28. यासाठीं कीं ज कांही घडाव म्हणून तूं स्वहस्त व स्वसंकल्पान पूर्वी नेमिल होत त त्यांनी कराव.
29. तर हे प्रभो, आतां तूं त्यांच्या धमकावण्याकडे पाहा;
30. आणि बर करण्याकरितां तूं आपला हात लांब करीत असतां, आपल्या दासांनीं पूर्ण धैर्यान तुझ वचन सांगाव अस कर; तुझा पवित्र सेवक येशू याच्या नामान चिन्ह व अöुत घडावीं असहि कर;
31. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्य ते जमले होते ती कंपित झाली; आणि ते सर्व पवित्र आत्म्यान पूर्ण होऊन देवाच वचन धैर्यान बोलूं लागले.
32. तेव्हां विश्वास धरणा-यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीहि आपल्या मालमत्ततील कांही आपल आहे अस म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ समाईक होते.
33. प्रेशित मोठ्या सामर्थ्यान प्रभु येशूच्या पुनरुत्थाविशयीं साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती.
34. त्यांच्यातील कोणालाहि उण नव्हत, कारण जमिनींचे किंवा घरांचे जितके मालक होते तितक्यांनीं ती विकून टाकून विकलेल्या वस्तूंचे मोल आणून
35. प्रेशितांच्या चरणी ठेवाव; मग जसजशी कोणाला गरज लागत असे तसतसे प्रत्येकाला वांटून देण्यांत येत असे.
36. तेव्हां कुप्र बेटांत जन्मलेला लेवी योसेफ, ज्याला प्रेशितांनीं बर्णबा म्हणजे बोधपुत्र अस नांव दिल होत, त्याची जमीन होती;
37. ती त्यान विकली व तिचे पैसे आणून प्रेशितांच्या चरणीं ठेविले.
|