1. त्या काळीं शिश्यांची संख्या वाढत चालली असतां हेल्लेणी यहूद्यांनीं इब्री लोकांसंबधान कुरकूर केली; कारण रोजच्या वांटणींत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.
2. तेव्हां बारा जणांनीं शिश्यगणाला बोलावून म्हटले, आम्हीं देवाच वचन सांगण्याची सेवा सोडून पंक्तिसेवा करावी ह आम्हांस बर वाटत नाहीं.
3. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्मयान व ज्ञानान पूर्ण अशीं सात प्रतिश्ठित मनुश्य शोधून काढा, त्यांस आम्ही या कामावर नेमूं;
4. म्हणजे आम्ही प्रार्थनेेत व वचनसेवेेत तत्पर राहूं.
5. ही गोश्ट सर्व लोकांना बरी वाटली; नंतर विश्वासान व पवित्र आत्म्यान पूर्ण असा स्तेफन, आणि फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व यहूदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर यांस त्यांनीं निवडिल;
6. त्यांस त्यांनीं प्रेशितांसमोर उभ केल; आणि त्यांनी प्रार्थना करुन त्यांजवर हात ठेविले.
7. मग देवाच्या वचनाचा प्रसार झाला; यरुशलेमांत शिश्यांची संख्या फार वाढली; याजकवर्गातील पुश्कळ लोकांनीं या विश्वासाला मान्यता दिली.
8. स्तेफन कृपा व सामर्थ्य यांहिं पूर्ण होत असता लोकांत मोठीं अöुत व चिन्ह करीत असे.
9. तेव्हां लीबिर्तिन नामक लोकांची सभा, कुरेनेकर, आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आसिया यांतील लोकांपैकीं कितीएक इसम उठून स्तेफनाबरोबर वादविवाद करुं लागले;
10. पण तो ज्या ज्ञानान व ज्या आत्म्यान बोलला त्यांस त्यांच्यान ताड देववेना.
11. तेव्हां त्यांनीं कांही लोकांस भर देऊन, आम्हीं याला मोशे व देव यांजविरुद्ध दुर्भाशण करितां ऐकल असे म्हणण्यास लाविल;
12. आणि त्यांनीं लोकांस, वडिलांस व शास्न्न्यांस चेतविल. त्यांनीं त्याजवर चाल करुन त्याला धरुन धर्मसभत नेल;
13. आणि त्यांनीं पुढ उभे केलेले खोटे साक्षी म्हणाले, हा माणूस या पवित्रस्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याच सोडीत नाहीं;
14. आम्हीं त्याला अस बोलतांना ऐकल कीं हा नासोरी येशू ह स्थान मोडून टाकील आणि मोशान आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.
15. तेव्हां धर्मसभत बसलेले सर्व त्याजकडे निरखून पाहत असतां त्यांस त्याच मुख देवदूताच्या मुखासारिख दिसल.
|