1. मग मुख्य याजक म्हणाला, या गोश्टी अशाच आहेत काय?
2. तेव्हां तो म्हणाला, बंधुजनहो व वडील मंडळींनो; ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतांत जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशांत असतां गौरवी देवान त्याला दर्शन देऊन म्हटल,
3. तूं आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशांत ये.
4. तेव्हां तो खास्द्यांच्या देशांतून निघून हारानांत जाऊन राहिला; मग त्याचा बाप मेल्यावर देवान त्याला तेथून आणून सध्यां तुम्ही राहतां या देशांत ठेविल;
5. पण ह्यांत त्याला वतन दिल नाहीं, पाऊलभर जमीन देखील नाहीं; तथापि त्याला मूलबाळ नसतां देवान वचन दिल कीं हा देश तुझा व तुझ्यामाग तुझ्या संततीचा असा मी करीन.
6. देवान आणखी अस सांगितल कीं तुझी संतति परदेशांत जाऊन उपरी होईल, आणि ते लोक त्यांस दास करुन चारश वर्शे जाचतील.
7. ज्यांच दास्य ते करीत असतील त्या लोकांच पारिपात्य मी करीन, अस देवान सांगितल; आणि त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा या ठिकाणीं करितील असहि म्हटल.
8. त्यान त्यास सुंतेचा करार लावून दिला; हा करार झाल्यानंतर त्याला इसहाक झाला; त्याची त्यान आठव्या दिवशीं सुंता केली; मग इसहाकाला याकोब झाला व याकोबास बारा कुलाधिपति झाले.
9. नंतर कुलाधिपतींनीं हेव्यामुळ योसेफाला मिसर देशांत विकून टाकिल; पण देव त्यासह होता. त्यान त्यावरील सर्व संकटांतून त्याला सोडविल;
10. आणि मिसर देशाचा राजा फारो याच्या दृश्टीन ज्ञाता व त्याच्या कृपतला अस केल; यावर त्यान मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर त्याला अधिकारी केल.
11. मग सर्व मिसर देशांत व कनान देशांत दुश्काळ पडून जबर संकट आल; आणि आपल्या पूर्वजांस अन्न मिळेना.
12. तेव्हां मिसर देशांत धान्य आहे आहे ह ऐकून याकोबान तुमच्याआमच्या पूर्वजांस पहिल्यान पाठविल.
13. मग दुस-या खेपेस योसेफाची व त्याच्या भावांची ओळख झाली; आणि योसेफाच कूळ फारो राजाला कळल.
14. तेव्हां योसेफान, आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग, म्हणजे पंचाहत्तर असामी, यांस बोलावण पाठवून आणविल.
15. याप्रमाण याकोब मिसर देशांत गेला; आणि तेथ तो व आपले पूर्वज मरण पावले;
16. त्यांस शखेमांत नेल आणि जी कबर अब्राहामान शखेमांत हमोर याच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतलेली होती तींत त्यांस पुरिल.
17. मग देवान अब्राहामाला ज वचन दिल होत त्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक,
18. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत, मिसर देशांत वाढून संख्येन पुश्कळ झाले.
19. तो राजा तुमच्याआमच्या लोकांबरोबर कपटान वागला आणि त्यांची बाळक वांचूं नयेत म्हणून तीं बाहेर टाकून देण त्यान त्यांस भाग पाडिल; असा त्यान आपल्या पूर्वजांचा छळ केला.
20. त्या दिवसांत मोशे जन्मला, तो अतिशय सुंदर होता; त्याच पालनपोशण तीन महिनेपर्यंत त्याच्या बापाच्या घरीं झाल;
21. मग त्याला बाहेर टाकण्यांत आल असतां फारोच्या कन्यन त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून पाळिले.
22. मोशाला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांच शिक्षण मिळाल; आणि तो भाशणांत व कृतींत पराक्रमी होता.
23. मग त्याला चाळिसाव वर्श लागल तेव्हां त्याच्या मनांत आल कीं आपले बंधुजन म्हणजे इस्त्राएलाच संतान ह्यांची भेट घ्यावी.
24. एकदा त्यांतील कोणाएकाचा अन्याय होत आहे अस पाहून मोशान त्याचा कैवार घेतला, आणि मिस-याला मारुन त्या जाचलेल्या इसमाची दाद लाविली.
25. तेव्हां आपल्या हातान निजबांधवांची देव कशी सुटका करीत आहे ह त्यांस समजेल म्हणून त्याला वाटल होत, पण त्यांस समजले नाहीं.
26. मग दुस-या दिवशी कोणी भांडत असतां, तो त्यांच्यापुढ येऊन त्यांची समजूत करण्याकरितां म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहां; एकमेकांचा अन्याय कां करितां?
27. तेव्हां जो आपल्या शेजा-याचा अन्याय करीत होता तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, तुला आम्हांवर अधिकारी व न्यायाधीश कोणी केल?
28. काल तूं मिस-याला ठार मारिल तस मलाहि मारावयास पाहतोस कास?
29. हे शब्द ऐकतांच मोशे पळून गेला, आणि मिद्यान देशांत प्रवासी असा झाला; तेथंेे त्याला देान पुत्र झाले.
30. मग चाळीस वर्शे भरल्यावर सीनाय डागराच्या रानांत, एका झुडपांतील अग्निज्वालांत त्याच्या दृश्टीस एक देवदूत पडला.
31. ह पाहून मोशाला त्याच आश्चर्य वाटल; आणि काय त नीट पाहण्याकरितां तो जवळ गेला, तेव्हां प्रभूची वाणी अशी झाली कीं
32. मी तुझ्या पूर्वजांचा देव, म्हणजे अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे. तेव्हां मोशे कंपित होऊन त्याला पाहावयाच धैर्य झाले नाहीं.
33. नंतर प्रभून त्याला म्हटल, तूं आपल्या पायांतला जोडा काढ; कां तर ज्या जागेवर तूं उभा राहिला आहेस ती पवित्र भूमि आहे.
34. मिसर देशांतल्या माझ्या लोकांची विपत्ति मीं खचित पाहिली आहे, त्यांच कण्हणे ऐकल आहे, आणि त्यांस सोडविण्यास मीं उतरला आह; तर आतां ये, मी तुला मिसर देशांत पाठविता.
35. तुला अधिकारी किंवा न्यायाधीश कोणीं केल, अस ज्या मोशाला ते अडवून बोलले होते, त्याला झुडपांत दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्त, देवान अधिकारी व मुक्तिदाता अस करुन पाठविल.
36. त्यान मिसर देशांत, तांबड्या समुद्रांत व अरण्यांत चाळीस वर्शे अöुत व चिन्ह करुन त्या लोकांस काढून पुढ नेल.
37. तोच मोशे इस्त्राएल लोकांस म्हणाला, ‘देव तुमच्या बांधवांत माझ्यासारखा संदेश्टा तुम्हांसाठीं उत्पन्न करील.’
38. रानांतील मंडळीमध्य सीनाय पर्वतावर त्याच्याशीं बोलणा-या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच आहे; त्यालाच तुम्हांआम्हांला देण्याकरितां जिवंत वचन मिळालीं;
39. त्याच ऐकावयास आपले पूर्वज मान्य नव्हते; तर त्यांनी त्याला धिक्कारिल व आपल मन मिसर देशाकडे फिरवून
40. ते अहरोनाला म्हणाले, आमच्यापुढ चालतील असे देव आम्हांस करुन दे; कारण ज्यान आम्हांस मिसर देशांतून आणिल त्या या मोशाच काय झाल ह आम्हांस कळत नाहीं.
41. मग त्या दिवसांत त्यांनी बैलाची मूर्ति बनवून व तिला यज्ञ करुन आपल्या हातच्या कृतीबद्दल उत्साह केला.
42. तेव्हां देवान विमुख होऊन त्यांस आकाशांतील सेनागणाची सेवा करावयास सोडून दिल; याविशयीं संदेश्ट्यांच्या पुस्त्कांत लिहिल आहे: हे इस्त्राएलाच्या घराण्या, तुम्हीं चाळींस वर्शे अरण्यांत यज्ञ व बलिदान मला केलीं काय?
43. मोलखाचा मंडप व रेफान दैवत याचा तारा तुम्हीं उचलून घेतला, मीं तुम्हांला बाबेलच्या पलीकडे नऊन ठेवीन.
44. तूं जो नमुना पाहिला त्याप्रमाण आज्ञापटाचा निवासमंडप कर, अस ज्यान मोशाला सांगितल त्यान नेमल्याप्रमाण तो मंडप रानांत आपल्या पूर्वजांचा होता.
45. जीं राश्टेªं देवान त्यांच्यासमोरुन घालविलीं, त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी स्वाधीन करुन घेतला, तेव्हां हा जो मंडप आपले पूर्वज दाविदाच्या दिवसापर्यंत परंपरेन प्राप्त करुन घेत आले तो त्यांनी यहोशवाबरोबर देशांत आणिला.
46. दाविदावर देवाची कृपादृश्टि झाली, आणि त्यान याकोबाच्या देवासाठी निवासस्थन बांधण्याची विनंति केली;
47. परंतु त गृह शलमोनान त्याच्यासाठीं बांधिल.
48. तथापि जो परात्पर तो हातांनीं बांधलेल्या घरांत राहत नाहीं; संदेश्ट्यान म्हटल आहे:
49. प्रभु म्हणतो, आकाश माझ पादासन आहे; तुम्ही माझ्यासाठीं कशा प्रकारच घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याच स्थान कोणत?
50. माझ्या हातान ह्या सर्व वस्तु केल्या नाहींत काय?
51. अहो ताठ मानेच्या आणि हृदयांनीं व कानांनी बेसुंती लोकांनो, तुम्ही पवित्र आत्म्याला सर्वदा अडवितां; जसे तुमचे पूर्वज तसे तुम्हीहि.
52. ज्याचा तुमच्या पूर्वजांनीं पाठलाग केला नाहीं असा संदेश्ट्यांपैकी कोण होता बर? ज्यंानी त्या नीतिवान् पुरुशाच्या आगमनाविशयीं पूर्वी सांगतिल त्यांस त्यांनीं जिव मारिल; त्याला धरुन देणारे व जिव मारणारे असे आतां तुम्ही निघालां;
53. ज्या तुम्हांस देवदूतांच्या योग योजलेल नियमशास्त्र प्राप्त झाल त्या तुम्हीं त पाळिल नाहीं.
54. त्याच ह भाशण त्यांच्या अंतःकरणास इतकंे झाबल कीं ते त्याजवर दांतओठ खाऊ लागले;
55. परंतु पवित्र आत्म्यान पूर्ण होऊन त्यान आकाशाकड दृश्टी लाविली, तेव्हां देवाच तेज व देवाच्या उजवीकडे येशूला उभे राहिलेल त्यान पाहिल, आणि म्हटल कीं पाहा,
56. आकाश उघडल आहे, व मनुश्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा राहिला आहे अस माझ्या दृश्टीस पडत.
57. तेव्हां ते मोठी आरोळी मारुन व कान बंद करुन एकचित्तान त्याच्या अंगावर तुटून पडले.
58. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करुं लागले; आणि साक्षीदारांनीं आपली वस्त्र शौल नामक एका तरुणाच्या पायांजवळ ठेविलीं;
59. तेव्हां ते स्तेफनाला दगडमार करीत असतां तो प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.
60. मग गुडघे टेकून ता मोठ्यान ओरडला, हे प्रभू, ह पाप त्यांकडे मोजूं नको, अस बोलून तो झोपीं गेला.
|