1. तुम्ही आपले अपराध व आपलीं पातक ह्यांमुळ मृत झालां असतां तुम्हांसहि त्यान जीवंत केल
2. त्यांत तुम्ही पूर्वी चालत असां. ह तुमच कृत्य जगाच्या रहाटीप्रमाण अंतरिक्षाचा राज्याधिपति, म्हणजे आज्ञाभंजक लोकांत आतां कार्य करणा-या आम्त्याचा अधिपति, ह्याच्या वहिवाटीप्रमाण अस.
3. त्या लोकांत आपण सर्व आपल्या दैहिक वासनांस अनुरुपस माग वागला, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाण करीत होता व निसर्गतः इतरांप्रमाण क्रोधाची प्रजा होता;
4. तरी देव दयाघन आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळ मृत झाला असतांहि त्यान आपल्यावरील स्वतःच्या परम प्रेमामुळ
5. खिस्ताबरोबर आपणांला जीवंत केल, (तुमच तारण कृपेन झाल आहे);
6. खिस्त येशूमध्य त्याच्यासह स्वर्गलोकीं बसविल;
7. यासाठींं कीं खिस्त येशूमध्य त्याची आपल्यावर जी ममता तिच्या द्वार येणा-या युगांत त्यान आपल्या कृपेची अपार संपत्ति दाखवावी;
8. तुमच तारण कृपेनच विश्वासाच्या द्वार झाल आहे, आणि ह तुमच्या हातून झाल नाहीं, तर ह देवाच दान आहे;
9. कोणीं आढ्यता बाळगूं नये म्हणून कर्मे केल्यान ह झाल नाहीं.
10. आपण चांगली कर्मे करावीं म्हणून खिस्त येशूमध्य उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातच काम आहा; तीं कर्मे आपण करावीं म्हणून देवान ती पूर्वी योजून ठेविलींं.
11. यास्तव पूर्वीची आठवण करा; तुम्ही देहान विदेशी, आणि स्वतःला सुंती म्हणविणा-या लोकांकडून बेसुंती असे म्हणविले जात होतां; त्यांची सुंता म्हणजे हातान केलेली देहाची अशी असे;
12. ते तुम्ही त्या वेळेस खिस्तविरहित, इस्त्राएलाच्या राश्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांस परके, आशाहीन व जगांत देवहीन असे होतां;
13. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होतां ते तुम्ही आतां खिस्त येशूमध्य खिस्ताच्या रक्तान जवळ झालां आहां.
14. कारण तो आपला समेट असा आहे; त्यान दोघांस एक केल, आणि मधली आडभिंत पाडिली;
15. त्यान आपल्या देहान वैर नाहीस केल, हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र; यासाठीं कीं आपण समेट घडवून आणून आपल्या ठायीं दोघांचा एक नवा मनुश्य उत्पन्न करावा;
16. आणि त्यान वधस्तंभावर वैरभाव जिव मारुन त्याच्या द्वार देवाबरोबर त्यांचे एकशरीर करुन दोघांचा समेट करावा म्हणून अस केल;
17. त्यान स्वतः येऊन जे तुम्ही दूर होतां त्या तुम्हांस व जे जवळ होते त्यांस शांतीची सुवार्ता सांगितली.
18. त्याच्या द्वार एका आत्म्यांत आपणां उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो.
19. तर यावरुन तुम्ही आतांपासून परके व परदेशीय नाहीं, तर पवित्र जनांचे एकराश्ट्र व देवाच्या घरचे आहां;
20. प्रेशित व संदेश्टे यांच्या पायावर तुम्ही रचिलेले आहां, व खिस्त येशू हाच कोनशिला आहे;
21. त्याच्यामध्य प्रत्येक इमारत जोडून रचिली असतां वाढत वाढत प्रभूच्या ठायीं पवित्र मंदिर होत;
22. त्यांत तुम्हीहि आत्म्यान देवाच्या वस्तीसाठीं एकत्र रचलेले आहां.
|