1. तर मग तुम्ही प्रिय मुलांप्रमाण देवाच अनुकरण करणारे व्हा;
2. आणि खिस्तान तुम्हांवर प्रीति केली, आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरितां अर्पण व यज्ञ अस दिल, तदनुसार तुम्हीहि प्रीतींन चाला.
3. जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ, यांचा तुम्हांमध्य उच्चारहि न होवो; ह पवित्र जनांस शोभत.
4. तसच अमंगळपण, बाश्कळ गोश्टी व टवाळी ह्यांचाहि न होवो, तीं उचित नाहींत; तर त्यांऐवजी ईशोपकारस्मरण होवो,
5. जारकर्मी, अशुद्ध कृति करणारा किंवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे) असल्या कोणासहि खिस्ताच्या व देवाच्या राज्यंात वारसा नाहीं ह तुम्ही जाणूनच आहां.
6. पोकळ भाशणान कोणीं तुम्हांस फसवूं नये; कारण अशा पापांमुळे आज्ञाभंग करणा-या पुत्रांवर देवाचा कोप होतो.
7. यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार होऊं नका;
8. कारण जे तुम्ही पूर्वी अंधकार अस होतां ते तुम्ही आतां प्रभूमध्य प्रकाश असे आहां, प्रकाशाच्या प्रजेसारिखे चाला;
9. कारण प्रकाशाच फळ सर्व प्रकारच चांगुलपण, धार्मिकता, सत्यता यांत आहे.
10. प्रभूला काय पसंत आह ह पारखून घेत जा;
11. अंधाराच्या निश्फळ कर्मांचे भागीदार होऊं नका, इतकंेच नव्हे, तर त्यांचा प्रतिकार करा;
12. कारण त्या लोकांच्या हातून गुप्तपण जीं कर्मे होतात त्यंाचा उच्चार करण देखील लाजेचे आहे.
13. कोणताहि देाश उघडकीस आणिला म्हणजे त्यावर प्रकाश पडतो, ज कांही उघड झालेल असत त प्रकाशित होत.
14. यास्तव तो म्हणतो, ‘हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे खिस्त तुजवर प्रकाशेल.’
15. तुम्ही अज्ञान्यांसारिखे नव्हे, तर ज्ञान्यांसारिखे जपून वागण्याविशयीं खबरदारी घ्या.
16. संधि साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत.
17. तुम्ही मुर्खासारखे होऊं नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ह समजून घ्या.
18. द्राक्षारसान मस्त होऊं नका; त्यांत बेतालपणा आहे; तर आत्म्यान पूर्ण होऊन,
19. स्तोत्र, गीत व आत्मिक प्रबंध हीं एकमेकांस म्हणून दाखवा; आपल्या अंतःकरणांत प्रभूला गायनवादन करा;
20. आपल्या प्रभु येशू खिस्ताच्या नामान सर्व गोर्श्टीबद्दल सर्वदा देवपित्याच उपकारस्मरण करा;
21. खिस्ताच भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा.
22. बायकांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या नव-याच्या अधीन असा.
23. कारण जसा खिस्त मंडळीच मस्तक आहे तसा नवरा बायकाचे मस्तक आहे; तसेच खिस्त हा शरीराचा तारणारा आहे.
24. जशी मंडळी खिस्ताच्या अधीन आहे, तसे बायकांनींहि सर्व गोश्टींत आपापल्या नव-याच्या अधीन असाव.
25. नव-यांनो, जशी खिस्तान मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःच तिच्यासाठी अर्पण केल तशी तुम्हीहि आपापल्या बायकोवर प्रीति करा;
26. यासाठीं कीं तिला त्यान वचनरुपी जलस्नानान शुद्ध करुन पवित्र कराव,
27. आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशांसारख कांही नसून ती पवित्र व निर्दोश असावी.
28. त्याचप्रमाण नव-यांनीं आपापल्या बायकोला आपल शरीर अस मानून तिजवर प्रीति करावी. जो आपल्या बायकोवर प्रीति करितो तो स्वतःवर प्रीति करितो.
29. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेश करीत नाहीं; तर तो त्याच पालनपोशण करितो; तसच खिस्तहि मंडळीच करिता.
30. कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहा.
31. ‘यामुळ पुरुश आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील; आणि तीं उभयंता एक देह होतील.’
32. ह गूज मोठ आहे; ह मी खिस्ताविशयीं व मंडळीविशयीं बोलता.
33. तथापि तुम्ही प्रत्येक जणान जशी स्वतःवर तशी आपल्या बायकोवर प्रीति करावी; आणि बायकोन आपल्या नव-याची भीड राखावी.
|