1. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरुपी मेघान वेढिलेला आहा म्हणून आपणहि सर्व दडपण व सहज गुंतविणार पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरुन धीरान धावाव;
2. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याजकडे पाहत असाव; त्याजपुढ जो आनंद ठेविलेला होता त्याकरितां त्यान लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.
3. ज्यान ‘आपणांविरुद्ध पाप करणा-यांनी’ केलेला इतका विरोध सहन केला त्याची तुलना करा, म्हणजे तुमची मन खचून धीर सुटणार नाहीं.
4. तुम्ही पापाबरोबर युद्ध करीत असतां रक्तपात होण्याइतका प्रतिकार अजून केला नाहीं;
5. जो बोध पुत्रांला करावयाचा तसा तुम्हांला केला तो तुम्ही विसरलां आहां काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करुं नको, आणि त्याजकडून दोश पदरी पडला असतां तूं खचूं नको;
6. कारण ज्याच्यावर प्रभु प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करितो आणि ज्या पुत्रांना स्वीकारितो त्या प्रत्येकाला फटके मारिता.
7. ‘शिक्षणासाठीं’ तुम्ही सहन करीत आहां; देव पुत्रांबरोबर तसा तुम्हांबरोबर वागतो; ज्याला बाप शिक्षा करीत नाहीं असा कोण पुत्र आहे?
8. ज्या शिक्षेचे भागीदार सर्व झाले आहेत अशा शिक्षेविरहित तुम्ही जर आहां तर तुम्ही पुत्र नव्हां, दासीपुत्र आहां.
9. शिवाय शिक्षा करणारे असे आपल्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरिली; तर आपण विशेशकरुन जो जीवाम्त्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जीवंत राहूं नये काय?
10. कारण त्यांनी मनास वाटली तशी थोडे दिवस शिक्षा केली; पण त्यान केली ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हाव म्हणून केली.
11. कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाहीं, खेदाची वाटते; तरी ज्यांस तिचा अभ्यास झाला त्यांस ती पुढ धार्मिकता ह शांतिकारक फळ देते.
12. यास्तव ‘गलितहस्त व लटपटणारे गुडघे नीट करा,’
13. आणि ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा,’ यासाठी कीं लंगड्याचा संधिभंग होऊं नये तर तो उलट बरा व्हावा.
14. सर्वांबरोबर ‘शांतींन राहण’ व ज्यावाचूंन कोणास प्रभूच दर्शन होत नाहीं अस पवित्रीकरण, ‘यांच्या पाठीस लागा;’
15. देवाच्या कृपेला कोणी अंतरुं नये, ‘ कोणीं कडूपणाच्या मुळान अंकुरित होऊन उपद्रव देऊं नये’ व त्यामुळ पुश्कळांस विटाळ होईल तो होऊं नये; कोणीं जारकर्मी असूं नये, किंवा ज्यान एका जेवणासाठीं ‘आपले ज्येश्ठपण विकल’ त्या ‘एसावा’ सारखे कोणीं ऐहिक बुद्धीच असूं नये, याकडे लक्ष द्या.
17. तुम्हांला माहीत आहे कीं त्यानंतर तो वारशान आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करीत असतां त्याचा नाकार झाला; त्यान जरी अश्रु आणून फार प्रयत्न केला तरी (बापाच) मन वळविण्याच त्याला साधल नाहीं.
18. स्पर्शज्ञेय व ‘पेटलेला अग्नि, घनांधकार, निबिड काळोख, वादळ,
19. करण्याचा नरद व शब्दध्वनि,’ यांजजवळ तुम्ही आलां नाहीं; ती वाणी एकणा-यांनीं विनंति केली कीं तिच्यायोग आम्हाबरोबर अधिक बोलण होऊं नये;
20. कारण ‘पशु देखील डागराला शिवला तर त्यास धाड्यांनी माराव,’ अशी जी आज्ञा ती त्याच्यान सोसवली नाहीं;
21. आणि ज दिसल त इतक भयंकर होेत कींं मोशे म्हणाला, ‘मी अति भयभीत व कंपित झाला आह;’
22. पण तुम्ही सीयोन डागर, सदाजीवी देवाच नगर स्वर्गीय यरुशलेम, लाखा देवदूत,
23. स्वर्गांतील यादींतल्या ज्येश्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमान् लोकांचे आत्मे,
24. नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याच रक्त यांजवळ आलां आहां; त्या रक्ताच बोलण हाबेलापेक्षां उत्तम आहे.
25. जो बोलत आहे त्याचा अवमान करुं नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणा-याचा अवमान करणारे जर निभावले नाहींत, तर स्वर्गांतून आज्ञा सांगणा-याचा अवमान करणारे आपण विशेशकरुन निभावणार नाहीं.
26. त्या वेळेस त्याच्या वाणीन पृथ्वी हालविली; आणि आतांच्याविशयीं त्यान अस वचन दिल आहे कीं ‘आणखी एकदा मी’ केवळ ‘पृथ्वी’ नव्हे तर ‘आकाशहि कांपविन.’
27. ‘आणखी एकदा’ या शब्दांनी असा बोध होतो कीं घडविलेल्या वस्तूंप्रमाण हालविलेल्या वस्तूंचे निःसारण होईल, म्हणजे न हालविलेल्या वस्तु राहाव्या.
28. यास्तव न हालणार राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानूं; तेणकरुन देवाला प्रिय होईल अशी त्याची सेवा सöक्तीन व सöयान करुं;
29. कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्निहि आहे.’
|