1. प्रत्येक प्रमुख याजक मनुश्यांपैकीं घेतलेला असल्यामुळ देवविशयक गोश्टींबाबत तो मनुश्यांकरितां नेमिलेला असतो, यासाठीं कीं त्यान पापांबद्दल दान व यज्ञपशु अर्पावे;
2. अज्ञानी व बहकणारे यांच्याबरोबर तो सौम्यतेन वागणारा असतो, कारण तोहि स्वतः अशक्तपणान व्याप्त आहे;
3. आणि या अशक्तपणामुळ त्यान जस लोकांसाठीं तस स्वतःसाठींहि पापांबद्दल अर्पणे केल पाहिजे.
4. ही पदवी कोणी आपण होऊन झोत नाहीं, तर अहरोनाप्रमाण देवान ज्याला पाचारण केल आहे त्याला मिळते.
5. तदनुसार खिस्तानहि प्रमुख याजक होण्यासाठींं आपणा स्वतःला गौरविले नाहीं तर ज्यान त्याला म्हटल कीं तूु माझा पुत्र आहेस, आज मीं तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरविल.
6. त्याप्रमाण दुस-या ठिकाणींहि तो म्हणतो, मलकीसदेकाच्या संप्रदयाप्रमाण तूं युगानुयुग याजक आहेस.
7. त्यान आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान् त्याजवळ मोठ्या आक्रोशान व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सुभक्तीमुळ ऐकण्यांत आली;
8. तो पुत्र असतांहि त्यान ज दुःख सोशिल तेणकरुन तो आज्ञाकिंतपणा शिकला;
9. आणि सिद्ध होऊन तो आपल्या आज्ञत राहणा-या सर्वांचा युगानुयुगाचा तारणकर्ता झाला.
10. त्याला ‘मलकीसदेकाच्या संप्रदयाप्रमाण’ प्रमुख याजक असे नांव देवाकडून देण्यांत आल.
11. याविशयीं आम्हांस पुश्क्ळ सांगावयाच आहे, त तुम्हांस समजवून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्याविशयी मंद झालां आहां.
12. जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होतां त्या तुम्हांस देवाच्या वचनांचीं मूळाक्षर पुनः कोणीं तरी शिकवावीं याची गरज आहे, आणि ज्यांस जड अन्न्ा सोसत नाहीं, दूधच पाहिजे, असे तुम्ही झालां आहां.
13. दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाविशयीं अपरिचित असतो; कारण तो बाळक आहे.
14. ज्यांच्या इंद्रियांस वहिवाटींन पथ्यापथ्य समजण्याचा अभ्यास झाला आहे अशा प्रौढ मनुश्यांसाठी जडान्न्ा आहे.
|