1. आमच्या सांगण्याचा सारांश हा आहे कीं स्वर्गामध्य राजाधिराज जो ईश्वर त्याच्या राजासनाच्या ‘उजवीकडे बसलेला’ असा प्रमुख याजक आपल्याला आहे.
2. तो पवित्रस्थानाचा व मनुश्यान नव्हे तर ‘प्रभून घातलेल्या ख-या मंडपाचा’ सेवक आहे.
3. प्रत्येक प्रमुख याजक दान व यज्ञपशु हीं अर्पावयास नेमिलेला असतो; यास्तव त्याजवळहि अर्पिण्यास कांहीं तरीं असण अगत्य आहे.
4. तो जर पृथ्वीवर असता तर याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाण दान अर्पिणारे याजक आहेत;
5. ते स्वर्गीय वस्तूंची प्रतिमा व छाया यांची सेवा करितात; त्याप्रमाण मोशेहि मंडप करणार होता, तेव्हां त्याला ईश्वरी आदेश मिळाला; त्यांत, पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाण सर्व वस्तु बनविण्याची सावधगिरी ठेव, अस तो म्हणतो.
6. आतां ज्यापेक्षां अधिक चांगल्या वचनांनी स्थापिलेल्या अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ तो आहे, त्यापेक्षां तितकी अधिक श्रेश्ठ सेवा त्यास मिळाली आहे.
7. कारण तो पहिला करार निर्दोश असता, तर दुस-याकरितां ठिकाण शोधण्यांत आल नसते.
8. लोकांस दोश लावून तो म्हणतो: परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत कीं त्यंात इस्त्राएलाच घराण व यहूदाच घराण यांच्याबरोबर मी नवा करार करीन;
9. मीं त्यांच्या पूर्वजांचा हात धरुन त्यांस मिसा देशांतून बाहेर आणिल. तेव्हांच्या कराराप्रमाण हा करार व्हावयाचा नाहीं; कारण माझ्या कराराप्रमाण ते राहिले नाहींत, आणि मीं त्यांची उपेक्षा केली, अस पभु म्हणतो.
10. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्त्राएलाच्या घराण्याशीं जो करार मी करीन तो हा: मी आपले नियम त्यांच्या अंतर्यामीं ठेवीन, आणि ते त्यांच्या ह्नदयपटावर लिहीन, आणि ते मला माझे लोक असे होतील;
11. तेव्हां प्रत्येक जण आपल्या ग्रामबंधूस, प्रत्येक जण आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीं; कारण त्यांतील लहानापासून थोरापर्यत ते सर्व मला ओळखतील;
12. कारण त्यांतील अधर्माविशयीं क्षमाशील होईन, आणि त्यांची पाप मीं यापुढ स्मरणार नाहीं.
13. त्यान ‘नवा’ अस म्हटल्यान पहिल्याला जुन केल आहे; आणि ज जुन व जीर्ण होत आहे त नाहींसे होण्याच्या लागास आलें आहे.
|