1. माझ्या बंधूंनो, तुम्ही बहुत शिक्षक होऊं नका, कारण तुम्हांस माहीत आहे कीं आपणांस अधिक दंड होईल.
2. आपण सगळेच पुश्कळ गोश्टींविशयीं चुकता. जर कोणी बोलण्यांत चुकत नाहीं तर तो पूर्ण मनुश्य, तो सर्व शरीरहि कह्यांत ठेवण्यास शक्तिमान् आहे.
3. घोड्यांनी आपल्या ताब्यांत राहाव म्हणून आपण त्यांच्या ताडांत लगाम घातला, तर त्यांच सर्व शरीर आपल्याला फिरवितां येत.
4. तारवहि पाहा, तीं एवढीं मोठीं आहेत, व प्रचंड वा-यान लोटून जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे तीं अगदी लहानशा सुकाणान फिरतात.
5. तशीच जीभहि लहानस अंग असून मोठ्या गोश्टींची फुशारकी मारिते, पाहा, किती थोडका विस्तव केवढ्या मोठ्या रानाला पेटवितो!
6. जीभ ही आग आहे; ती अनितींच भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर मलीन करणारा अवयव जीभ आहे; ती भवचक्राला आग लावणारी आणि नरकान पेटविलेली अशी आहे.
7. श्वापद, पक्षी, सरपटणारे प्राणी, व समुद्रांतील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुश्यस्वभावाला वश झाला आहे, आणि होत आहे;
8. परंतु मनुश्यांपैकीं कोणीहि जिभेला वश करावयास समर्थ नाहीं; ती शांतिरहित असून दुश्ट आहे व प्राणघातक विशान भरलेली आहे.
9. तिच्या योग प्रभु पिता याची आपण स्तुति करिता; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाण’ केलेल्या मनुश्यांस तिच्याच योग शापहि देता;
10. एकाच ताडांतून स्तुति व शाप निघतात. माझ्या बंधंूनो, अशी गोश्ट व्हावीं हे उचित नाहीं.
11. झ-याच्या एकाच छिद्रांतून गोड पाणी व कडू पाणी निघत काय?
12. माझ्या बंधंूनो, अंजिराला जैतुनाचीं फळ आणि द्राक्षवेलाला अंजीर येतील काय? तसच खा-या पाण्यांतून गोड पाणी निघणार नाहीं.
13. तुम्हांमध्य ज्ञानी व समजंस कोण आहे! त्यान ज्ञानजन्य लीनतेन सदाचरणाच्या योग आपलीं कृत्य दाखवावीं;
14. पण तुमच्या मनांत तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर सत्याविरुद्ध ताठा मिरवूं नका, व लबाडी करुं नका.
15. हंे ज्ञान वरुन उतरत नाहीं; तर त ऐहिक, इंद्रियजन्य, पैशाचिक अस आहे.
16. कारण जेथ मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथ अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.
17. वरुन येणार ज्ञान ह मुळांत शुद्ध असत; शिवाय त शांतिर्पिय, सौम्य, समजूत होण्याजोग, दया व सत्फल यांनीं पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ अस आह;
18. आणि शांतता करणा-यांसाठीं धार्मिकतारुपी फळ देणार बीं शांतीन पेरिल जात.
|