1. तुम्हांमध्य लढाया व भांडणे कोठून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करितात त्यांपासयून कीं नाहीं?
2. तुम्ही लोभ धरितां तरी तुम्हांस प्राप्त होत नाहीं; तुम्ही घात व हेवा करितां तरी तुम्हांस इश्ट त मिळविण्यास तुम्ही समर्थ नाहीं; तुम्ही भांडतां व लढतां; तुम्ही मागत नाहींं, यामुळ तुम्हांला प्राप्त होत नाहीं.
3. तुम्ही मागतां परंतु तुम्हांस मिळत नाहीं; कारण तुम्ही अयोग्य प्रकार मागतां, म्हणजे आपल्या चैनीकरितां खर्चाव म्हणून मागतां.
4. अहो व्यभिचारणींनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, ह तुम्हांस ठाऊक नाहीं काय? जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो तेा देवाचा वैरी ठरला आहे.
5. जो आत्मा त्यान आपल्या ठायीं, ठेविला तो परप्रेमाची ईर्श्या धरितो, ह शास्त्राच म्हणण व्यर्थ अस तुम्हांस वाटत काय?
6. तो अधिक ‘कृपादान देतो’. यांस्तव शास्त्र म्हणत, देव गर्विश्ठांचा विरोध करितो, आणि लीनांस कृपादान देतो.’
7. यास्तव देवाच्या अधीन व्हा; सैतानाविरुद्ध आडवे व्हा म्हणजे तो तुम्हांपासून पळेल.
8. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल. पापी जनहो, हात शुद्ध करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकःरण पवित्र करा.
9. कश्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक व तुमच्या आनंदाचा विशाद होवो.
10. प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांस उंच करील.
11. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलूं नका. जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोश लावितो; जर तूं नियमाला दोश लावितोस तर तूं नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस.
12. नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारावयास व नाष करावयास समर्थ आहे; आपल्या शेजा-यास दोश लावणारा तूं कोण?
13. अहा! जे तुम्ही म्हणतां कीं आपण आजउद्यां अमुक शहरीं जाऊं, तेथ एक वर्श घालवूं आणि व्यापार करुन पैसा मिळवूं,
14. त्या तुम्हांला उद्यांच समजत नाहीं. तुमच आयुश्य काय आहे? तुम्ही वाफ आहां, ती थोडा वेळ दिसते, आणि मग नाहींशी होते.
15. अस न म्हणतां प्रभूची इच्छा असेल तर आपण जगूं व अमुक करुं, अस म्हणा.
16. आतां तुम्ही आपल्याला फुशारकी मारतां येते म्हणून अभिमान बाळगतां; पण अशा प्रकारची सर्व फुशारकी वाईट आहे.
17. चांगल करण कळत असून जो त्याप्रमाण वागत नाहीं त्याला त पाप आहे.
|