1. मरीया व तिची बहीण मार्था यांच्या बेथानी गांवांतला लाजर नाम एक मनुश्य आजारी होता.
2. ज्या मरीयेन प्रभूला सुगंधी तेल लाविल व त्याचे चरण आपल्या केसांनीं पुसले तिचा, हा आजारी पडलेला लाजर, भाऊ होता.
3. यास्तव त्या बहिणींनीं त्याकडे सांगून पाठविल, प्रभुजीं ज्याच्यावर आपल प्रेम आहे तो आजारी आहे.
4. त ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे याच्यायोग देवाच्या पुत्राच गौरव व्हाव यासाठीं आहे.
5. मार्था, तिची बहीण व लाजर यांजवर येशूच प्रेम असे.
6. यास्तव तो आजारी आहे ह ऐकल तरी तो होता त्या ठिकाणींच आणखी दोन दिवस राहिला.
7. त्यानंतर त्यान शिश्यांस म्हटल, आपण पुनः यहूदीयांत जाऊं.
8. षिश्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहूदी नुक्तेच आपणाला दगडमार करावयास पाहत होते, तरी आपण पुनः तेथ जातां काय?
9. येशून उत्तर दिल, दिवसाचे बारा तास आहेत कीं नाहींत? कोणी दिवसास चालतो तर त्याला ठेच लागत नाहीं, कारण तो या पृथ्वीवरील उजेड पाहतो;
10. परंतु कोणी रात्रीस चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठायीं उजेड नाहीं.
11. ह बोलल्यावर त्यान त्यांस म्हटल, आपला मित्र लाजर निजला आहे; मी त्याला झोपतून उठवावयास जाता.
12. यावरुन शिश्य त्याला म्हणाले, प्रभुजी, त्याला झोप लागली असली तर तो पार पडेल.
13. येशू त्याच्या मरणाविशयीं अस बोलला होता; परंतु तो झोपेपासून मिळणा-या आरामाविशयीं बोलतो अस त्यांस वाटल.
14. यास्तव येशून त्यांस उघड सांगितल, लाजर मेला आहे;
15. आणि मी तेथ नव्हता म्हणून तुम्हांमुळ मला आनंद वाटतो, यासाठीं कीं तुम्हीं विश्वास धरावा; तरी आपण त्याजकडे जाऊं.
16. तेव्हां दिदुम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंस म्हणाला, आपणहि याच्याबरोबर मरावयास जाऊं.
17. येशू आला तेव्हां त्याला कळल कीं त्याला कबरत ठेवून चार दिवस झाले होते.
18. बेथानी यरुशलेमापासून सुमार पाऊण कोसावर होती;
19. तेथ मार्था व मरीया यांच भावाबद्दल सात्वंन करण्यास यहूद्यांतील पुश्कळ लोक त्यांच्याकडे आले होते.
20. येशू येत आहे ह ऐकतांच मार्था त्याला जाऊन भेटली. मरीया घरांतच बसून राहिली.
21. मार्था येशूला म्हणाली, प्रभुजी, आपण एथ असतां तर माझा भाऊ मेला नसता;
22. तरी आतांहि ज कांही आपण देवाजवळ मागाल त देव आपणाला देईल, ह मला ठाऊक आहे.
23. येशून तिला म्हटल, तुझा भाऊ पुनः उठेल.
24. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशीं पुनरुत्थासमयीं पुनः उठेल ह मला ठाऊक आहे.
25. येशून तिला म्हटल, पुनरुत्थान व जीवन मीच आह; जो मजवर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल;
26. आणि जो जीवंत असून मजवर विश्वास ठेवितो तो कधींहि मरणार नाहीं; याचा तूं विश्वास धरितेस काय?
27. ती त्याला म्हणाली, होय प्रभुजी; जो जगांत येणारा देवाचा पुत्र खिस्त तो आपण आहां असा विश्वास मीं धरिला आहे.
28. अस बोलून ती निघून गेली, व आपली बहीण मरीया इला गुप्तपण बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहेत, ते तुला बोलावीत आहे.
29. ह ऐकतांच ती त्वरेन उठून त्याजकडे गेली.
30. (येशू अद्यापि गावांत आला नव्हता, मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता)
31. जे यहूदी मरीयेच्याजवळ घरांत होते व तिचे सात्वंन करीत होते त्यांनी तिला चटकन उठून जातांना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडावयास जात आहे अस समजून ते तिच्यामाग गेले.
32. येशू होता तेथ मरीया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पायां पडली व त्याला म्हणाली, प्रभुजी, आपण एथ असतां तर माझा भाऊ मेला नसता.
33. येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूद्यांला रडतां पाहून आत्म्यांत खवळला व विव्हळ झाला,
34. आणि म्हणाला, तुम्हीं त्याला कोठ ठेविल आहे? ते त्याला म्हणाले, प्रभुजी येऊन पाहा.
36. यावरुन यहूदी म्हणाले, पाहा, याच त्याजवर किती तरी प्रेम होत!
37. परंतु त्यांच्यांतील कित्येक म्हणाले, ज्यान अंधळîाचे डोळे उघडिले त्याला, ह्यान मरुं नये, असहि करण्याची शक्ति नव्हती काय?
38. येशू पुनः मनांत खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्या ताडावर धाड ठेविलेली होती.
39. येशून म्हटल, धाड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभुजी, आतां त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला चार दिवस झाले आहेत.
40. येशून तिला म्हटल, तूं विश्वास धरशील तर देवाच गौरव पाहशील अस मीं तुला सांगतिल नव्हत काय?
41. यावरुन त्यांनीं धाड काढिली; तेव्हां येशून दृश्टि वर करुन म्हटल, हे पित्या, तूं माझ ऐकल म्हणून मी तुझे आभार मानिता;
42. मला माहीत आहे, तूं सर्वदा माझ ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवता उभा आहे त्याच्याकरितां मीं बोलला; यासाठीं कीं तूं मला पाठविल आहे असा त्यांनी विश्वास धरावा.
43. अस बोलून त्यान मोठ्यान हाक मारुन म्हटल, लाजरा, बाहेर ये.
44. तेव्हां मृत झालेला तो इसम बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनीं बांधिलेले व ताड रुमालान वेश्टिलेल होत. येशून त्यांस म्हटल, ह्याला मोकळ करुन जाऊं द्या.
45. मरीयेकडे जे यहूदी आले त्यांनी, त्यान ज केल, त पाहिल, आणि त्यांच्यापैकीं पुश्कळ जणांनीं त्याजवर विश्वास ठेविला.
46. पण कित्येकांनीं परुश्यांकडे जाऊन येशून काय केल त त्यांस सांगितल.
47. यावरुन मुख्य याजकांनीं व परुश्यांनी सभा भरवून म्हटल, आपण काय करीत आहा? कारण तो मनुश्य पुश्कळ चिन्ह करितो;
48. आपण त्याला असच सोडिल तर सर्व लोक त्याजवर विश्वास ठेवितील; आणि रोमी लोक येऊन आपल स्थान व राश्ट्रहि घेतील.
49. तेव्हां त्यांच्यापैकीं कयफा नांवाचा कोणीएक मनुश्य त्या वर्शी प्रमुख याजक होता, तो त्यांस म्हणाला, तुम्हांला कांहीच कळत नाहीं;
50. तुम्ही हहि लक्षांत आणीत नाहीं कीं प्रजेसाठीं एका मनुश्यान मराव आणि सर्व राश्ट्रांचा नाश होणे टळावे ह तुम्हांस हितावह आहे.
51. ह तर तो आपल्या मनच बोलला नाहीं; तर त्या वर्शी तो प्रमुख याजक होता म्हणून त्यान संदेश दिला कीं येशू त्या राश्ट्राकरितां मरणार आहे;
52. आणि केवळ त्या राश्ट्राकरितां अस नाहीं, तर याकरितां कीं त्यान देवाच्या पांगलेल्या मुलांसहि जमवून एक कराव.
53. यावरुन त्या दिवसापासून त्यांनीं त्याला जिव मारण्याचा निश्चय केला.
54. यामुळ येशू तेव्हांपासून यहूदी लोकांमध्य उघडपण फिरला नाहीं, तर तेथून रानाजवळच्या प्रांतांतील एफ्राईम नाम नगरांत गेला; आणि तेथ आपल्या शिश्यांसुद्धा राहिला.
55. तेव्हां यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता; आणि पुश्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणांस शुद्ध करुन घ्यावयास बाहेरगांवांहून वर यरुशलेमास गेले.
56. त्यांनीं येशूचा शोध केला आणि मंदिरांत उभे असतांना एकमेकांस म्हटल, तुम्हांस काय वाटत? तो सणास येणार नाहीं काय?
57. मुख्य याजकांनीं व परुश्यांनीं त्याला धरण्याच्या हेतून अशी ताकीद केली होती कींं तो कोठ आहे ह कोणाला कळल्यास त्यान खबर द्यावी.
|