1. त्यानंतर तिबिर्याच्या समुद्राजवळ येशू शिश्यांस पुनः प्रगट झाला; आणि तो या प्रकार प्रगट झाला.
2. शिमोन पेत्र दिदुम म्हटलेला थोमा, गालीलांतील काना एथचा नथनेल, जब्दीचे पुत्र व त्याच्या शिश्यांतील दुसरे दोघे हे एकत्र असतां,
3. शिमोन पेत्रान त्यांस म्हटल, मी मासे धरावयाला जाता. ते त्याला म्हणाले, आम्हीहि तुझ्याबरोबर येता. तेव्हां ते निघून मचव्यांत बसले; आणि त्या रात्रीं त्यांनीं कांहीं धरिल नाहीं.
4. मग पहाट होत असतां येशू समुद्राच्या तीरीं उभा राहिला; तथापि तो येशू आहे अस शिश्यांस समजल नव्हत.
5. तेव्हां येशून त्यांस म्हटल, मुलांनो, तुम्हांजवळ कांहीं खावयाला आहे काय? त्यांनीं, नाहीं, अस त्याला उत्तर दिल.
6. त्यानंे त्यांस म्हटल, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळ टाका म्हणजे तुम्हांस सांपडेल; म्हणून त्यांनीं त टाकिल; तेव्हां माशांच्या घोळक्यामुळ त त्यांस ओढवेना.
7. यावरुन ज्या शिश्यावर येशूची प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, प्रभु आहे, प्रभु आहे. ह ऐकून शिमोन पेत्रान अंगरखा घालून तो कमरेला गंुडाळिला (कारण तो उघडा होता) आणि समुद्रांत उडी टाकिली.
8. दुसरे शिश्य माशांच जाळ ओढीत ओढीत होडींतून आले, (कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमार दोनश हातांवर होते).
9. मग काठीं उतरले ता त्यांनीं कोळशांचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली.
10. येशून त्यांस म्हटल, तुम्ही आतां धरलेल्या माशांतून कांहीं आणा.
11. यास्तव शिमोन पेत्रान मचव्यावर चढून एकशत्रेपन्न मोठ्या माशांनीं भरलेल जाळ काठीं ओढून आणिल; तितके असतांही जाळ फाटल नाहीं.
12. येशू त्यांस म्हणाला, या, जेवा. तेव्हां तो प्रभु आहे अस त्यांस समजल, म्हणून तूं कोण आहेस ह त्याला विचारावयास षिश्यांतील कोणी धजला नाहीं.
13. येशून येऊन भाकर घेतली व त्यांस दिली; तशीच मासळीहि दिली.
14. येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिश्यांस प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ.
15. ते जेवल्यानंतर येशून षिमोन पेत्राला म्हटलें, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षां तूं मजवर अधिक प्रीति करितोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मीं प्रेम करिता, ह आपल्याला ठाऊक आहे, त्यान त्याला म्हटल, माझ्या कोकरांस चार.
16. पुनः दुस-यान तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, मजवर प्रीति करितोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करिता, ह आपल्याला ठाऊक आहे. त्यान त्याला म्हटल, माझ्या मढरांस पाळ.
17. तिस-यान तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, मजवर प्रेम करितोस काय, अस तिस-यान त्याला म्हटल, म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करिता ह आपण ओळखिल आहे. येशून त्याला म्हटल, माझ्या मढरांस चार.
18. मी तुला खचीत खचीत सांगता, तूं तरुण होतास तेव्हां स्वतः कमर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथ जात असस; परंतु तूं म्हातारा होशील तेव्हां हात लांब करिशील आणि दुसरा इसम तुझी कमर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाहीं तेथ तुला नेईल.
19. तो कोणत्या प्रकारच्या मरणान देवाच गौरव करील ह सुचविण्याकरितां तो ह बोलला; आणि अस बोलल्यावर त्यान त्याला म्हटल, माझ्यामाग ये.
20. मग पेत्र वळला आणि ज्या शिश्यावर येशूची प्रीति होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशीं टेकला असतां माग लवून, प्रभो, तुला धरुन देणारा तो कोण आहे, अस म्हणाला होता, त्याला त्यान माग चालतांना पाहिल.
21. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभुजी, यांचे काय?
22. येशून त्याला म्हटल, मी येई तोपर्यंत त्यान राहाव अशी माझी इच्छा असली तर त्याच तुला काय? तूं माझ्यामाग ये.
23. यावरुन तो शिश्य मरणार नाहीं अशी वंदता बंधुवर्गांमध्य पसरली; तरी तो मरणार नाहीं अस येशून त्याला म्हटल नव्हते, तर मी येई तोपर्यंत त्यान राहाव अशी माझी इच्छा असली तर त्याच तुला काय, अस म्हटल.
24. जो शिश्य या गोश्टींविशयीं साक्ष देतो व ज्यान या गोश्टी लिहिल्या तोच हा आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे ह आम्हांला माहीत आहे.
25. येशून केलेली दुसरींहि बहुत कृत्य आहेत, तीं सर्व एकेक लिहिलीं तर लिहिलेलीं पुस्तक या जगांत मावणार नाहींत, अस मला वाटत.
|