1. यानंतर येशू गालीलांत फिरला; यहूदी त्याला जिव मारावयास पाहत होते, म्हणून त्याला यहूदीयांत फिरावस वाटल नाहीं.
2. यहूद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता;
3. यास्तव त्याचे भाऊ त्याला म्हणाले, तूं एथून निघून यहूदीयांत जा, म्हणजे जीं काम तूं करितोस तीं तुझ्या शिश्यांनीहि पाहावीं.
4. जो कोणी प्रसिद्ध होऊं पाहतो तो गुप्तपण कांही करीत नाहीं; तूं हीं काम करितोस तर स्वतः जगाला प्रगट हो.
5. त्याच्या भावांनींहि त्याजवर विश्वास ठेविला नव्हता.
6. त्यावरुन येशू त्यांस म्हणाला, माझा समय अजून आला नाहीं, तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे.
7. जगान तुमचा द्वेश करावा अस होत नाहीं; त माझा द्वेश करत, कारण त्याचीं काम वाईट आहेत अशी मी त्याविशयीं साक्ष देता.
8. तुम्ही सणास वर जा; माझा समय अजून पूर्ण झाला नाहीं, म्हणून मी आतांच या सणास जात नाहीं.
9. अस त्यांस सांगून तो गालीलांत राहिला.
10. त्याचे भाऊ सणास गेल्यानंतर तोहि प्रसिद्धपण नाहीं, तर गुप्तपण वर गेला.
11. यावरुन तो कोठ आहे, अस म्हणत यहूदी त्याचा त्या सणांत शोध करुं लागले.
12. लोकसमुदायांतहि त्याजविशयीं फार कुजबूज चालू झाली; कोणी म्हणाले, तो चांगला मनुश्य आहे; कोणी म्हणाले, नाहीं तो लोकांस फसवितो;
13. तरी यहुद्यांच्या भीतीमुळ त्याजविशयीं कोणी उघडपण बोलल नाहीं.
14. मग सण अर्धा झाल्यावर येशू वर मंदिरांत जाऊन शिक्षण देऊं लागला.
15. यावरुन यहूदी आश्चर्य करुन म्हणाले, शिकल्यावांचून याला विद्या कशी आली?
16. येशून त्यांस उत्तर दिल, माझी शिकवण माझी नाहीं, तर ज्यान मला पाठविल त्याची आहे.
17. त्याच्या इच्छेप्रमाण करावयास कोणी मनांत आणिल्यास ह्या शिकविणीविशयीं त्याला समजेल कीं ही देवापासून आहे किंवा मी आपल्या मनच बोलता.
18. जो आपल्या मनच बोलतो, तो स्वतःचच गौरव पाहतो; परंतु आपणाला ज्यान पाठविल त्याच गौरव जो पाहतो तो खरा आहे, व त्यामध्य कांही अधर्म नाही.
19. मोशान तुम्हांस नियमशास्त्र दिले कीं नाही? तरी तुम्हांतून कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला जिव मारावयास कां पाहतां?
20. लोकसमुदयान उत्तर दिल, तुला भूत लागल आहे; तुला जिव मारावयास कोण पाहतो?
21. येशून त्यांस उत्तर दिल, मी एक कृत्य केल. त्यामुळ तुम्ही सर्व आश्चर्य करितां.
22. सुंता मोशापासून नाही तर पूर्वजांपासून आहे, म्हणून मोशान ती तुम्हांस लावून दिली, आणि तुम्ही शब्बाथ दिवशी ती करितां.
23. मोशाच नियमशास्त्र मोडूं नये म्हणून मनुश्याची संुता शब्बाथ दिवशी होते, तर मी शब्बाथ दिवशीं एका मनुश्याला सर्वांगीं बर केल यामुळ तुम्ही मजवर रागावतां काय?
24. ताडदेखला न्याय करुं नका तर यथार्थ न्याय करा.
25. यावरुन यरुशलेकरांतून कित्येकांनी म्हटल, ज्याला जिव मारावयास पाहता तो हाच आहेना?
26. पाहा, तो उघड बोलतो व ते त्याला कांही म्हणत नाहींत. हा खिस्त आहे, अस अधिका-यांनीं खरोखर जाणिल आहे काय?
27. तरी हा कोठचा आहे ह आम्हांस ठाऊक आहे; पण खिस्त येईल तेव्हां तेव्हां तो कोठचा आहे ह कोणास कळणार नाहीं.
28. यावरुन येशू मंदिरांत शिक्षण देत असतां मोठ्यान म्हणाला, तुम्ही मला जाणतां व मी कोठचा आह याचीहि तुम्हांला जाणीव आहे. तरी मी आपण होऊन आला नाहीं; ज्यान मला पाठविल तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखीत नाहीं.
29. मी तर त्याला ओळखता; कारण मी त्याजपासून आह व त्यान मला पाठविल आहे.
30. यावरुन त्यांनी त्याला धरावयास पाहिल; तरी त्याची वेळ तावर आली नव्हती.
31. तेव्हां लोकसमुदायांतील बहुत जणांनीं त्याजवर विश्वास ठेविला व म्हटल, खिस्त येईल तेव्हां तो यान केलेल्या चिन्हांपेक्षां अधिक चिन्ह करील काय?
32. लोकसमुदाय त्याजविशयीं अशी कुजबूज करीत आहेत ह परुश्यांनीं ऐकल; आणि मुख्य याजक व परुशी यांनीं त्याला धरावयास कामदार पाठविले.
33. यावरुन येशून त्यांस म्हटल, मी आणखी थोडा वेळ तुम्हांबरोबर आह, मग ज्यान मला पाठविल त्याजकडे मी निघून जाईन.
34. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांस सांपडणार नाहींं; आणि जेथें मी असेन तेथें तुमच्यानें येववणार नाहीं.
35. यामुळ यहूदी आपसांत म्हणाले, हा असा कोठ जाणार कीं तो आम्हांस सांपडणार नाहीं? तो हेल्लेणी लोकांत पांगलेल्यांकडे जाणार आणि हेल्लेण्यासं शिकविणार काय?
36. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांस सांपडणार नाहीं, आणि जेथ मी असेन तेथ तुमच्यान येववणार नाही, ह ज विधान त्यान केलंे त काय आहे?
37. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे मोठ्या दिवशीं येशू उभा राहून मोठ्यान म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्यान मजकडे येऊन प्याव.
38. जो मजवर विश्वास ठेवितो, त्याच्यांतून, शास्त्रांत सांगितल्याप्रमाण, जीवंत पाण्याच्या नद्या वाहतील.
39. ज्यांनीं त्याजवर विश्वास ठेविला त्यांस आत्मा मिळणार होता, त्याविशयीं त्यान ह म्हटल; तोपर्यंत आत्म्याच दान झाल नव्हत; कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता.
40. यास्तव लोकसमुदायांतील कित्येकांनीं हे शब्द ऐकून म्हटल, हा खरोखर तो संदेश्टा आहे.
41. कित्येकांनी म्हटल, हा खिस्त आहे; काहींनीं म्हटल, खिस्त गालीलांतून येतो काय?
42. खिस्त ‘दावीदाच्या वंशाचा’ व ज्या ‘बेथलहेमांत’ दावीद होता, त्या गांवचा असा ‘येणार; अस धर्मशास्त्रांत सांगितल नाहीं काय?
43. यावरुन त्याजविशयीं लोकसमुदायांत फूट पडली.
44. त्यांतील कित्येक जण त्याला धरावयास पाहत होते; तरी कोणीं त्याजवर हात टाकिला नाहीं.
45. यास्तव मुख्य याजक व परुशी यांजकडे कामदार आले; त्यांस ते म्हणाले, तुम्हीं त्याला कां आणिल नाहीं?
46. कामदारांनीं उत्तर दिल, कोणी मनुश्य त्याच्यासारिखा कधी बोलला नाहीं.
47. यावरुन परुश्यांनीं त्यांस म्हटल, तुम्हीहि फसलां आहां काय?
48. अधिका-यांपैकीं किंवा परुश्यांपैकीं कोणी तरी त्याजवर विश्वास ठेविला आहे काय?
49. जो हा लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाहीं तो शापित आहे.
50. त्याजकडे पूर्वी आलेला निकदेम त्यांच्यापैकीं एक होता, तो त्यांस म्हणाला:
51. कोणाच ऐकून घेतल्यावांचून व तो काय करितो ह्याची माहिती करुन घेतल्यावांचून आपल नियमशास्त्र त्याचा न्याय करित काय?
52. त्यांनीं त्याला उत्तर दिल, तूंहि गालीलांतला आहेस काय? शोध करुन पाहा कीं गालीलांत कोणी संदेश्टा उत्पन्न होत नाहीं.
53. मग ते सर्व आपापल्या घरीं निघून गेले;
|