1. ह्यानंतर प्रभून आणखीं सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणीं तो स्वतः जाणार होता तेथ दोघे दोघे अस त्यांस आपणांपुढ पाठविल.
2. तेव्हां त्यान त्यांस म्हटल, पीक फार आहे, परंतु कामकरी थोडके आहेत; यास्तव पिकाच्या धन्यान आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.
3. जा; पाहा, लांडग्यांमध्य कोकरांस पाठवाव तस मी तुम्हांस पाठविता.
4. पिशवी, झोळी किंवा वाहणा आपल्याबरोबर घेऊं नका; वाटेन कोणाला मुजरा करुं नका.
5. ज्या कोणत्या घरांत जाल तेथ, या घरास शांति असो, अस प्रथम म्हणा.
6. शांतीचा पुत्र तेथ असला तर तुमची शांति त्याजवर राहील; नसला तर तुम्हांकडे ती परत येईल.
7. त्याच घरांत वस्ती करुन ते जे देतील त खातपीत राहा; कामकरीं आपल्या मजुरीला योग्य आहे; घरोघर फिरुं नका.
8. कोणत्याहि नगरांत तुम्ही गेलां, आणि त्यांनीं तुमचा स्वीकार केला तर ते ज तुम्हांस वाढतील त खा;
9. त्यांत जे दुखणाईत असतील त्यांस बर करा, व त्यांस सांगा की देवाच राज्य तुम्हांजवळ आल आहे.
10. तुम्ही कोणत्यांहि नगरांत गेलां, आणि त्यांनीं तुम्हांस स्वीकारिल नाहीं तर त्यांच्या मार्गांत बाहेर जाऊन अस म्हणा,
11. आमच्या पायांस लागलेली तुमच्या नगराची धूळ ती देखील तुमची तुम्हांस झाडून टाकिता; तथापि ह लक्षांत ठेवा कीं देवाच राज्य जवळ आल आहे.
12. मी तुम्हांस सांगता, त्या नगरापेक्षां सदोमाला त्या दिवशीं सोपे पडेल.
13. हे खोरेजिना, तुला धिक्कार असो ! हे बेथसैदा, तुला धिक्कार असो ! कारण तुम्हांमध्य जीं पराक्रमाचीं कृत्य घडलीं ती सोर व सीदोन यांत घडलीं असतीं तर त्यांनी तरट व राख अंगावर घेऊन व बसून मागच पश्चाताप केला असता.
14. यावरुन न्यायकाळीं तुमच्यापेक्षां सोर व सीदोन यांस सोप पडेल.
15. हे कफर्णहूमा, ‘तूं आकाशापर्यंत चढविल जाशील काय तूं अधोलोकापर्यंत खालीं टाकिल जाशील.’
16. जो तुमच ऐकतो तो माझ ऐकतो; जो तुमचा नाकार करितो, तो माझा नाकार करितो तो ज्यान मला पाठविल त्याचा नाकार करितो.
17. नंतर ते सत्तर जण आनंदान माघारे येऊन म्हणाले, प्रभुजी, आपल्या नामान भूत देखील आम्हांस वश होतात.
18. तेव्हां त्यान त्यांस म्हटल, मीं सैतानाला आकाशांतून विजेसारिख पडलेल पाहिल.
19. पाहा, मीं तुम्हांस ‘साप’ व विंचू यांस ‘तुडविण्याचा’ आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे; तुम्हांस कांहीएक बाधणार नाहीं.
20. तथापि भूत तुम्हांस वश होतात याचा आनंद मानूं नका; तर तुमचीं नाव स्वर्गात लिहिलीं आहेत याचा आनंद माना.
21. त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यांत उल्लसित होऊन म्हणाला, हे बापा, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझ उपकारस्मरण करिता; कारण तूं ज्ञानी व विचारवंत यांपासून या गोश्टी गुप्त ठेवून बाळकांस प्रगट केल्या; होय, बापा, कारण तुला असच योग्य दिसल.
22. माझ्या बापान माझ्या हातीं सर्व कांहीं सोपल आहे; पुत्र कोण आहे ह बापावांचून कोणाला ठाऊक नाहीं; आणि बाप कोण आहे हे पुत्रावांचून कोणाला ठाऊक नाहीं.
23. मग शिश्यांकडे फिरुन तो एकांतीं म्हणाला, तुम्ही ज पाहतां त जे डोळे पाहतात ते धन्य;
24. मी तुम्हांस सांगतो, ज तुम्ही पाहतां त पुश्कळ संदेश्ट्यांनीं व राजांनीं पाहावयाची इच्छा बाळगली तरी पाहिल नाहीं; आणि ज तुम्ही ऐकतां त ऐकावयाची इच्छा बाळगली तरी ऐकल नाहीं.
25. मग पाहा, कोणी एक शास्त्री उभा राहून त्याची परीक्षा पाहण्याकरितां म्हणाला, गुरुजी, काय केल्यान मला सार्वकालिक जीवन ह वतन मिळेल?
26. त्यान त्याला म्हटल, नियमशास्त्रांत काय लिहिल आहे? तूं काय वाचितोस?
27. त्यान उत्तर दिल ‘तूं आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनान, पूर्ण जिवान, पूर्ण शक्तीन व पूर्ण बुद्धीन प्रीति कर;’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजा-यावर प्रीति कर.’
28. त्यान त्याला म्हटल, ठीक उत्तर केलस; ‘हच कर’ म्हणजे ‘वांचशील;’
29. परंतु स्वतःस धार्मिक ठरवून घ्याव अशी इच्छा धरुन तो येशूला म्हणाला, माझा शेजारी कोण?
30. येशून उत्तर दिल, एक मनुश्य यरुशलेमाहून खालीं यरीहोस जात असतां लुटारुंच्या हातीं सांपडला, त्यांनीं त्याची वस्त्र काढून घेऊन त्याला ठोकाहि दिला, आणि अर्धमेला टाकून ते निघून गेले.
31. मग एक याजक त्याच वाटेन सहज खालीं जात होता; तो त्याला पाहून दुस-या बाजून चालता झाला.
32. तसाच एक लेवीहि त्या ठिकाणीं येऊन त्याला पाहून दुस-या बाजून चालता झाला.
33. मग एक शोमरोनी त्या वाटेन चालला असतां, तो होता तेथ आला, आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला;
34. त्यान जवळ जाऊन त्याच्या जखमांस तेल व द्राक्षारस लावून त्या बांधिल्या, आणि त्याला आपल्या पाठाळावर बसवून उतारशाळत आणिल, व त्याचा संभाळ केला.
35. दुस-या दिवशीं निघतेवेळेस त्यान दोन पावल्या काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटल, याचा संभाळ कर; आणि यापेक्षां ज कांहीं अधिक खर्चिशील त मी माघार आल्यावर तुला देईन.
36. तर लुटारुंच्या हातीं सांपडलेल्या इसमाचा शेजारी या तिघांतून तुझ्या मत कोण झाला?
37. तो म्हणाला, त्याजवर दया करणारा तो. येशून त्याला म्हटल, तूं जाऊन तसच कर.
38. ते जात असतां तो एका गांवांत आला; तेव्हां मार्था नाम एका स्त्रीन त्याला आपल्या घरांत घेतल.
39. तिला मरीया नांवाची एक बहीण होती, ती प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे शब्द ऐकत राहिली.
40. तेव्हां मार्थेला फार खटपट पडल्यामुळ तिची तारांबळ उडाली आणि ती जवळ येऊन म्हणाली, प्रभुजी, माझ्या बहिणीन मज एकटीवर कामाचा बोजा टाकिला आहे, याची आपणाला काळजी नाहींं काय? तिला मला साहाय् य करावयास सांगा.
41. प्रभून तिला उत्तर दिल, मार्थे, मार्थे, तूं पुश्कळ गोश्टींविशयी काळजी व दगदग करत्येस;
42. परंतु थोड्याच गोश्टींच, किंबहुना एकाच गोश्टींचे अगत्य आहे; मरीयेन चांगला वांटा निवडून घेतला आहे, तो तिजपासून घेतला जाणार नाहीं.
|