1. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकूं नये, याविशयीं त्यान त्यांस एक दाखला सांगितला, तो असा:
2. कोणाएका नगरांत एक न्यायाधीश होता, तो देवाच भय धरीत नसे व मनुश्याची पर्वा करीत नसे;
3. आणि त्याच नगरांत एक विधवा होती, ती त्याजकडे वारंवार येऊन म्हणत असे कीं माझा न्याय करुन मला आपल्या प्रतिवाद्यापासून सोडवा.
4. तरी बराच काळपर्यंत तो त करीना; परंतु शेवटीं त्यान आपल्या मनंात म्हटल, जरी मीं देवाच भय धरीत नाहीं व मनुश्याची पर्वा करीत नाहीं,
5. तरी हीं विधवा मला त्रास देते म्हणूनच मी तिचा न्याय करीन, नाहींतर ती नेहमीं नेहमीं येऊन मला अगदीं रंजीस करुन टाकील.
6. तेव्हां प्रभून म्हटल, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो त ऐका.
7. तर देवाचे जे निवडिलेले रात्रंदिवस त्याला हाका मारितात त्यांचा तो न्याय करणार नाहीं काय? आणि त्यांजविशयीं तो विलंब लावील काय?
8. मी तुम्हांस सांगता, तो त्यांचा न्याय लवकर करील; तरी मनुश्याचा पुत्र येईल तेव्हां त्याला पृथ्वीवर विश्वास सांपडेल काय?
9. आपण धार्मिक आहा असा जे कित्येक स्वतःविशयीं भरवसा धरुन इतर सर्वास तुच्छ मानीत होते त्यांसहि त्यान हा दाखला सांगितला:
10. एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास मंदिरांत वर गेले;
11. परुश्यान उभ राहून आपल्या मनांत अशी प्रार्थना केली: हे देवा, इतर मनुश्य अपहारी, अधर्मी, व्याभिचारी अशीं आहेत, त्यांसारिखा किंवा या जकातदारासारिखाहि मी नाहीं, म्हणून मी तुझे आभार मानिता.
12. मी आठवड्यांतून दोनदा उपास करिता; ज मला मिळत त्या सर्वांचा दशांश देता.
13. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृश्टि लावावयासहि न धजतां आपल्या उरावर मारुन घेऊन म्हणला, हे देवा, मज पापी मनुश्यावर दया कर.
14. मी तुम्हांस सांगता, हा त्या दुस-यापेक्षां निर्दोशी ठरुन खालीं आपल्या घरीं गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करितो तो नीच केला जाईल; आणि जो आपणाला नीच करितो तो उंच केला जाईल.
15. नंतर लोकांनीं आपलीं तान्हीं बाळकहि त्यान त्यांस स्पर्श करावा म्हणून त्याजकडे आणिलीं; परंतु शिश्यांनीं ह पाहून त्यांस दटाविल.
16. येशून तर बाळकांस जवळ बोलाविल आणि म्हटल, बाळकांस मजजवळ येऊं द्या, त्यांस मना करुं नका; कारण देवाच राज्य असल्यांचच आहे.
17. मी तुम्हांस खचीत सांगता, जो कोणी बाळकासारिखा होऊन देवाच राज्य स्वीकारणार नाहीं त्याचा त्यांत प्रवेश होणारच नाहीं.
18. कोणाएका अधिका-यान त्याला विचारिल, अहो उत्तम गुरुजी, मी काय केल असतां मला सार्वकालिक जीवन ह वतन मिळेल?
19. येशू त्याला म्हणाला, मला उत्तम कां म्हणतोस? एक म्हणजे देव त्यावांचून कोणी उत्तम नाहीं.
20. तुला आज्ञा ठाऊक आहेत; ‘व्यभिचार करुं नको, मनुश्यहत्या करुं नको, चोरी करुं नको, खोटी साक्ष देऊं नको, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर.
21. तो म्हणाला, मी आपल्या बाळपणापासून या सर्व पाळीत आला आह.
22. ह ऐकून येशून त्याला म्हटल, अद्यापि तुझ्यांत एक गोश्ट उणी आहे; तुझ ज कांहीं आहे त विकून दरिद्रîांस वांटून दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; चल, माझ्या माग ये.
23. ह ऐकून तो अति दुःखित झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
24. त्याला पाहून येशू म्हणाला, ज्यांच्याजवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यांत प्रवेश होण किती कठीण आहे !
25. श्रीमतांन देवाच्या राज्यांत प्रवेश करण यापेक्षां उंटान सुईच्या नेड्यांतून जाण सोपे आहे.
26. ज्यांनीं ह ऐकल ते म्हणाले, तर मग कोणाच तारण होण शक्य आहे?
27. तो म्हणाला, ज्या गोश्टी मनुश्याला अशक्य त्या देवाला शक्य आहेत.
28. तेव्हां पेत्र म्हणाला, पाहा, आम्ही आपल घरदार सोडून आपल्याला अनुसरला आहा.
29. त्यान त्यांस म्हटल, मी तुम्हांस खचीत सांगता, देवाच्या राज्याकरितां ज्यान घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलबाळ सोडिलीं आहेत,
30. त्याला ह्या काळीं पुश्कळपट व पुढल्या युगांत सार्वकालिक जीवन मिळणार नाहीं असा कोणी नाहीं.
31. तेव्हां त्यान बारा जणांस जवळ घेऊन त्यांस म्हटल, पाहा, आपण यरुशलेमास वर चालला आहा, आणि मनुश्याच्या पुत्राविशयीं ज्या गोश्टी संदेश्ट्यांच्या द्वार लिहिण्यांत आल्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील;
32. म्हणजे त्याला विदेश्यांच्या स्वाधीन करण्यांत येईल, त्याची थट्टा व विटबंना होईल, त्यांजवर थंुकतील;
33. त्याला फटके मारितील, त्याचा जीव घेतील, आणि तो तिस-या दिवशीं पुनः उठेल.
34. त्यांस ह्या गोश्टींपैकीं कांहीच कळल नाहीं; ह वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यांत आल, आणि सांगितलेल्या गोश्टी त्यांच्या लक्षांत आल्या नाहींत.
35. तो यरीहोजवळ आला तेव्हां अस झाल कीं एक अंधळा वाटेवर भीक मागत बसला होता;
36. त्यान जवळून जाणा-या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारिल, ह काय आहे?
37. त्यांनीं त्याला सांगितल, येशू नासरेथकर जवळून जात आहे.
38. तेव्हां तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, मजवर दया करा.
39. तेव्हां त्यान उग राहाव म्हणून पुढ चालणा-यांनीं त्याला दटाविल, तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाच पुत्र, मजवर दया करा.
40. येशून उभ राहून त्याला आपणाकडे आणण्यास आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्यान त्याला विचारिल,
41. मीं तुजसाठीं काय कराव म्हणून तुझ मागण आहे? तो महणाला, प्रभूजी, मला दृश्टी यावी.
42. येशू त्याला म्हणाला, तुला दृश्टि यावी; तुझ्या विश्वासान तुला बर केल आहे.
43. तत्क्षणीं त्याला दृश्टि आली आणि तो देवाचा महिमा वर्णींत त्याच्यामाग चालला; तेव्हां सर्व लोकांनीं ह पाहून देवाच स्तवन केल.
|