1. तो यरीहात प्रवेश करुन त्यांतून जात होता,
2. तेव्हां पाहा, जक्कय नांवाचा कोणीएक मनुश्य होता; तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता.
3. त्यान येशू कोणता आहे ह पाहण्याचा यत्न केला पण गर्दीमुळ त्याच कांही चालेना, कारण तो ठगणा होता.
4. तेव्हां तो पुढ धावत जाऊन त्याला पाहण्यास उंबराच्या झाडावर चढला; कारण त्याला त्या वाटेन जावयाच होत.
5. मग येशू त्या ठिकाणीं येतांच दृश्टि वर करुन त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करुन खालीं उतर; कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाच आहे.
6. तेव्हां त्यान त्वरेन खालीं उतरुन आनंदान त्याच आगतस्वागत केल.
7. ह पाहून सर्व लोक, हा पापी मनुश्याच्या एथ उतरावयास गेला आहे, अशी कुरकुर करुं लागले.
8. तेव्हां जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभुजी, पाहा, मी आपल अर्धे द्रव्य दरिद्रîांस देता; आणि कुभांडान कोणाच कांहीं घेतल असेल त चौपट परत देता.
9. येशून त्याला म्हटल, आज या घराला तारण प्राप्त झाल आहे, कारण हाहि अब्राहामाचा पुत्र आहे.
10. मनुश्याचा पुत्र ‘हरवलेल शोधावयास’ व तारावयास आला आहे.
11. ते या गोश्टी ऐकत असतां त्यान त्यांस एक दाखलाहि सांगितला; कारण तो यरुशलेमाजवळ होता, आणि देवाच राज्य एव्हांच प्रगट होणार आहे अस त्यांस वाटत होत.
12. तो म्हणाला, कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत याव म्हणून, दूर देशीं गेला.
13. त्यान आपल्या दहा दासांस बोलावून त्यांस दहा मोहरा दिल्या व त्यांस सांगितल, मी येई तापर्यंत यांवर व्यापार करा.
14. त्याच्या नगराच लोक त्याचा द्वेश करीत; त्यांनीं त्याच्यामाग वकील पाठवून सांगितल, ह्यान आम्हांवर राज्य कराव अशी आमची इच्छा नाहीं.
15. मग अस झाल कीं तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांस पैका दिला होता त्यांनीं कायकाय व्यापार केला ह पाहाव म्हणून त्यान त्यांस आपणाकडे बोलवावयास सांगितल.
16. मग पहिला त्याजसमोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेच्या आणखी दहा मोहरा झाल्या आहेत.
17. त्यान त्याला म्हटल, शाब्बास, भल्या दासा; तूं अगदीं अल्प गोश्टीविशयीं विश्वासू झालास, यास्तव दहा नगरांचा अधिकारी हो.
18. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेच्या पांच मोहरा झाल्या आहेत.
19. त्यालाहि त्यान म्हटल, तंूहि पांच नगरांचा अधिकारी हो.
20. मग आणखी एक येऊन म्हणाला, महाराज, ही पाहा आपली मोहर, मीं रुमालांत बांधून ठेविली होती.
21. आपण करडे मनुश्य असल्यामुळ मला आपली भीति वाटली; ज आपण ठेविल नाहीं त उचलून नेतां व ज आपण पेरिल नाहीं त कापितां.
22. तो त्याला म्हणाला, अरे दुश्ट दासा, मीं तुझ्याच ताडान तुझा न्यायनिवाडा करिता. मी करडा माणूस आह, ज मीं ठेविल नाहीं त उचलून नेता, व ज मीं पेरिल नाहीं त कापिता, ह तुला ठाऊक होत;
23. तर तूं माझा पैका पेढीवर कां ठेविला नाहीं? ठेविला असता तर तो मीं येऊन व्याजासह उगविला असता.
24. मग त्यान जवळ उभ राहणा-यांस सांगितल, याजपासून मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.
25. ते त्याला म्हणाले, महराज, त्याच्याजवळ दहा मोहरा आहेत.
26. मी तुम्हांस सांगता, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिल जाईल; आणि ज्याच्याजवळ नाहीं त्याच ज आहे त देखील त्याजपासून घेतल जाईल.
27. आतां ज्या माझ्या वै-यांच्या मनांत मीं त्याजवर राज्य करुं नये अस होत त्यांस एथ आणा, व माझ्यासमोर मारुन टाका.
28. या गोश्टी सांगून तो यरुशलेमाकाडे वर जात असतांना स्वतः पुढ चालत होता.
29. नंतर अस झाल कीं तो, जैतूनांचा डागर ह्या नांवाच्या डागरानजीक असलेल्या बेथफगे व बेथानी यांच्याजवळ येऊन पोहंचल्यावर त्यान शिश्यांतून दोघांना अस सांगून पाठविल,
30. तुम्ही समोरच्या गांवांत जा; म्हणजे त्यांत जातांच ज्याच्यावर कोणी कधीं बसल नाहीं अस एक शिंगरुं बांधलेल तुम्हांस आढळेल; त सोडून आणा.
31. तुम्ही त कां सोडितां अस कोणीं तुम्हांस विचारिल तर, प्रभूला त्याची गरज आहे, अस सांगा.
32. तेव्हां ज्यांना पाठविल होत ते तेथ गेल्यावर त्यांस त्यांन सांगितल्याप्रमाण आढळल.
33. ते शिंगरुं सोडीत असतां त्याचे धनी त्यांस म्हणाले, प्रभूला याची गरज आहे.
34. तेव्हां ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे.
35. मग त्यांनीं त येशूकडे आणिल आणि आपली वस्त्र शिंगरावर टाकून त्यावर येशूला बसविल;
36. आणि तो पुढ चालला तसतस ते आपली वस्त्र वाटेवर पसरीत गेले.
37. तो जैतून डागराच्या उतरणीवर पोहंचताच सर्व शिश्यसमुदाय, जीं महत्कृत्ये त्यांनी पाहिली होतीं त्या सर्वांमुळ आनंद करुन उच्च स्वरान देवाची स्तुति करुं लागलेः
38. ‘प्रभूच्या नामान येणारा’ राजा ‘धन्यवादित असो;’ स्वर्गांत शांति, आणि ऊर्ध्वलोकी गौरव.
39. तेव्हां लोकसमुदायांतील कित्येक परुश्यांनीं त्याला म्हटल, गुरुजी, आपल्या शिश्यांस दटावा.
40. त्यान म्हटल, मी तुम्हांस सांगता, हे उगे राहिल्यास धाडे ओरडतील.
41. मग तो नगराजवळ आल्यावर त पाहून त्याकरितां रडून म्हणाला,
42. जर तंूहि या दिवशीं शांतीच्या गोश्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बर होत ! परंतु आतां त्या तुझ्या दृश्टीपासून गुप्त केल्या आहेत.
43. पुढ असे दिवस तुला येतील की ज्यांत तुझे षत्रु तुझ्याभोवतीं मेढेकोट बांधून तुला वेढा देतील, तुला चहूंकडून काडितील,
44. तुला व तुझ्यांतील ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवितील,’ आणि तुझ्यांत धाड्यावर धाडा राहूं देणार नाहीत; कारण तुझा समाचार घेतल्याचा प्रसंग तूं ओळखिला नाहीं.
45. नंतर तो मंदिरांत गेला, व त्यांत जे विकीत होत त्यांस बाहेर घालवूं लागला;
46. आणि त्यांस म्हणाला, ‘माझ घर प्रार्थनेच मंदिर होईल,’ अस लिहिल आहे; परंतु तुम्ही त ‘लुटारुंची गुहा’ केल आहे.
47. तो मंदिरांत प्रतिदिवशीं शिक्षण देत असे, तेव्हां मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे मुख्य हे त्याचा घात करावयास पाहत असत;
48. तरी काय कराव ह त्यांस सुचेना; कारण सर्व लोक त्याच आसक्तीन श्रवण करीत असत.
|