1. त्या दिवसांत एकदां अस झाल कीं तो मंदिरांत लोकांस शिक्षण देत व सुवार्ता सांगत असतां मुख्य याजक व शास्त्री हे वडिलांसह त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाले,
2. तुम्ही कोणत्या अधिकारान हंे करितां, आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण आहे, ह आम्हांस सांगा.
3. तेव्हां त्यान त्यांस उत्तर दिल, मीहि तुम्हांस एक प्रश्न विचारिता; मला उत्तर द्या.
4. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गांतून होता किंवा मनुश्यांतून होता?
5. तेव्हां ते आपसांत विचार करुं लागले, स्वर्गांतून अस म्हणूं तर हा म्हणेल कीं तुम्ही त्याजवर विश्वास कां ठेविला नाहींं?
6. आणि मनुश्यांतून अस म्हणूं तर सर्व लोक आपल्याला दगडमार करितील, कारण योहान संदेश्टा होता अशी त्यांची खात्री आहे.
7. तेव्हां त्यांनीं उत्तर दिल, तो कोठून आहे ह आम्हांस ठाऊक नाहीं.
8. येशून त्यांस म्हटल, तर कोणत्या अधिकारान ह मी करिता त मीहि तुम्हांस सांगत नाहीं.
9. मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला: कोणाएका मनुश्यान ‘द्राक्षमळा लाविला’ आणि तो माळîांस सोपून देऊन आपण बरेच दिवस परदेशांत जाऊन राहिला.
10. मग हंगामास माळîांनीं आपणाला द्राक्षमळîांतील कांहीं फळ द्यावीं म्हणून त्यान त्यांजकड एका दासास पाठविल; परंतु माळîांनीं त्याला ठोक देऊन रिकाम लावून दिल.
11. पुनः त्यान दुस-या एका दासास पाठविल; त्यालाहि त्यांनी ठेाक देऊन व त्याचा अपमान करुन रिकाम लावून दिल.
12. पुनः त्यान तिस-याला पाठविल; त्यालाहि त्यांनीं घायाळ करुन बाहेर घालवून दिल.
13. तेव्हां द्राक्षमळîाचा धनी म्हणाला, मी काय करुं? मी आपल्या प्रिय पुत्राला पाठविता, कदाचित् ते त्याचा मान राखतील;
14. परंतु माळी त्याला पाहून आपसांत विचार करुन म्हणाले, हा तर वारीस आहे; आपण याला जिव मारुं म्हणजे वतन आपलच होईल.
15. मग त्यांनी त्याला द्राक्षमळîाच्या बाहेर काढून जिव मारिल; तर द्राक्षमळîाचा धनीं त्यांच काय करील?
16. तो येऊन त्या माळîांचा नाश करील व द्राक्षमळा दुस-यांस देईल. ह ऐकून ते म्हणाले, अस न घडो.
17. त्यान त्यांजकडे दृश्टि लावून म्हटल, तर जो दगड बांधणा-यांनीं नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे, अस ज लिहिल आहे त काय?
18. जो कोणी त्या धाड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल; परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगाभुगा करुन टाकील.
19. तेव्हां शास्त्री व मुख्य याजक यांनीं त्याच घटकेस त्याजवर हात टाकावयास पाहिल; पण त्यांना लोकांचीं भीति वाटली; हा दाखला त्यान आपणांस उद्देशून दिला अस ते समजले.
20. ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यांत धरुन सुभेदाराच्या कह्यांत व सत्तेच्या कक्षत आणाव म्हणून त्यांनीं धार्मिक लोकांच साग घेेतलेले हेर पाठविले.
21. त्यांनीं त्याला म्हटल, गुरुजी, आपण यथार्थ बोलतां व शिक्षण देतां; पक्षपात करीत नाहीं, तर देवाचा मार्ग खरोखर शिकवितां, ह आम्ही जाणून आहा;
22. कैसराला पट्टी देण ह आम्हांस योग्य आहे कीं नाहीं?
23. तो त्यांचे कपट ओळखून त्यांस म्हणाला, मला एक पावली दाखवा.
24. इजवर मुखवटा व लेख कोणाचा आहे? ते म्हणाले, कैसराचा.
25. तेव्हां त्यान त्यांस म्हटल, तर कैसराच त कैसराला व देवाच त देवाला भरुन द्या.
26. तेव्हां त्यांच्यान लोकांसमक्ष ह्या त्याच्या बोलण्यांत त्याला धरवेना; आणि त्याच्या उत्तराच आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.
27. नंतर, पुनरुत्थान नाहीं, अस म्हणणा-या सदुक्यांतून कित्येकांनीं जवळ येऊन त्याला विचारिल,
28. गुरुजी, मोशान आम्हांसाठीं अस लिहिल आहे कीं ‘कोणाएकाचा भाऊ’ स्त्री असतां ‘मेला व त्याला संतति नसली तर त्याच्या भावान त्या स्त्रीबरोबर विवाह करुन आपल्या भावाचा वंश चालवावा.’
29. असे कोणी सात भाऊ होते; त्यांच्यांतील पहिल्यान बायको केली व तो निःसंतान असा मेला.
30. मग दुस-यान व तिस-यानहि ती केली;
31. याप्रमाण सातहि निःसंतान असे मेले.
32. नंतर ती बायकोहि मेली.
33. तर पुनरुत्थानसमयीं ती त्यांच्यांतून कोणाची बायको होईल? कारण ती त्या सातांची बायको झाली होती.
34. येशून त्यांस म्हटल, या युगाचे पुत्र लग्न करुन घेतात व लग्न करुन देतात;
35. परंतु त युग व मेलेल्यांतून पुनः उठण ही प्राप्त करुन घ्यावयास जे योग्य ठरतील ते लग्न करुन घेणार नाहींंत व लग्न करुन देणार नाहींत;
36. आणि ते पुढ मरावयाचेहि नाहींत. कारण ते देवदूतांसमान आहेत, आणि पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे देवाचे पुत्र आहेत.
37. आणखी मेलेले उठतात ह मोशानहि झुडपाच्या प्रकरणांत, ‘प्रभूला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव’ अस म्हणून दर्शविल आहे;
38. तो मृतांचा देव नव्हे, तर जीवंतांचा आहे; त्याला सर्वच जीवंत आहेत.
39. तेव्हां शास्न्न्यांतील कित्येकांनीं म्हटल, गुरुजी, ठीक बोललां;
40. मग ते त्याला आणखी प्रष्न करावयास धजले नाहींत.
41. त्यावर त्यान त्यांस म्हटल, खिस्त दाविदाचा पुत्र आहे अस कस म्हणतात?
42. कारण दावीद स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकांत म्हणतो, परमेश्वरान माझ्या प्रभूला सांगितल,
43. मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांच आसन करीन तोपर्यंत माझ्या उजवीकडे बैस.
44. दावीद त्याला प्रभु अस म्हणतो, मर मग तो त्याचा पुत्र कसा आहे?
45. तेव्हां सर्व लोक ऐकत असतां त्यान आपल्या शिश्यांस म्हटल,
46. शास्न्न्यांसंबंधान सावध असा, त्यांस लांबलांब झगे घालून फिरावयास पाहिजे; बाजारांत नमस्कार, सभास्थानांत श्रेश्ठ आसन व जेवणावळींत श्रेश्ठ स्थान हीं त्यांना आवडतात;
47. ते विधवांचीं घर खाऊन टाकितात, आणि ढागान लांबलांब प्रार्थना करितात; त्यांस अधिक दंड होईल.
|