1. मग त्यान दृश्टि वर करुन जे धनवान् आपलीं दान मंदिराच्या भांडारांत टाकीत होते त्यांस पाहिल.
2. त्यान एका दरिद्री विधवेलाहि दोन टोल्या तेथ टाकितांना पाहिल,
3. तेव्हां तो म्हणाला, मी तुम्हांस खर सांगता, या दरीद्री विधवेन सर्वांपेक्षां अधिक टाकिल;
4. कारण त्या सर्वांनीं आपल्या समृद्धींतून दानांत टाकिल; हिन तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकिली.
5. मंदिर उत्तम पाशाणांनी व अर्पणांनीं कस सुशोभित केलेल आहे, अस कित्येक बोलत असतां त्यान म्हटल,
6. ह ज तुम्ही पाहतां त्यातला पाडला जाणार नाहीं असा दगडावर दगड राहणार नाहीं, असे दिवस येतील.
7. तेव्हां त्यांनीं त्याला विचारिल, गुरुजी, या गोश्टी केव्हां होतील, आणि ज्या काळीं या गोश्टी घडणार त्या काळाच काय चिन्ह?
8. तो म्हणाला, तुम्हीं फसूं नये म्हणून जपा; कारण माझ्या नामान पुश्कळ लोक येऊन मीच तो आह, आणि तो काळ जवळ आला आहे, अस म्हणतील; त्यांच्यामाग लागूं नका.
9. लढाया व दंगे यांविशयीं तुम्ही ऐकाल तेव्हां घाबरुं नका; कारण या गोश्टी प्रथम ‘होण अवश्य आहे, तरी इतक्यान शेवट होत नाहीं.
10. तेव्हां त्यान त्यांस म्हटल, ‘राश्ट्रावर राश्ट्र व राज्यावर राज्य उठेल;’
11. मोठे भूमिकंप, जागोजागीं दुश्काळ व म-या होतील, आणि भयंकर उत्पात व मोठीं चिन्ह आकाशांतून होतील;
12. परंतु ह सर्व होण्याअगोदर ते तुम्हांवर हात टाकितील व तुमचा छळ करितील; तुम्हांस सभास्थान व बंदिशाळा यांच्या स्वाधीन करितील; आणि राजे व अधिकारी यांजपुढ माझ्या नामामुळ नेतील.
13. ह तुम्हांस साक्ष देण्यास कारण होईल.
14. यास्तव उत्तर कस द्याव याविशयीं पूर्वी विचार न करण्याचा निर्धार मनांत ठेवा;
15. कारण मी तुम्हांस अशी वाचा व बुद्धि देईन कीं ती अडविल्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणी शत्रू समर्थ होणार नाहींत.
16. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हांस धरुन देतील; तुमच्यांतील कित्येकांस जिव मारवितील;
17. आणि माझ्या नामामुळ सर्व लोक तुमचा द्वेश करितील;
18. तरी तुमच्या मस्तकाच्या एका केसाचाहि नाश होणार नाहीं.
19. तुम्ही आपल्या धीरान आपले जीव मिळवाल.
20. ह्यावर यरुशलेमास सैन्यांचा वेढा पडत आहे अस पाहाल तेव्हां त्याचा विध्वंस जवळ आला आहे अस समजा.
21. त्या समयीं जे यहूदीयांत असतील त्यांनीं डागरांत पळून जाव, व जे शिवारांत असतील त्यांनीं त्यांत येऊं नये.
22. कारण सर्व लिहिलेल्या गोश्टी पूर्ण होण्यासाठीं हे ‘सूड घेण्याचे दिवस’ आहेत.
23. त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या स्तन पाजणा-या असतील त्यांचे दुःख फारच होणार ! कारण देशावर मोठ संकट येईल व या लोकांवर क्रोध होईल.
24. ते तरवारीच्या धारेन पडतील, त्यांस बंदिवान करुन सर्व राश्ट्रांमध्य नेतील, आणि विदेश्यांचे काळ पूर्ण होत तापर्यंत ‘विदेशी लोक यरुशलेमास पायांखालीं तुडवितील.’
25. तेव्हां सूर्य, चंद्र व तारे यांत चिन्ह होतील आणि ‘समुद्र व लाटा यांच्या गर्जनेन’ ‘राश्ट्रे’ पृथ्वीवर घाबरीं होऊन पेचांत पडतील;
26. भयान व जगावर येणा-या गोश्टींची वाट पाहण्यान मनुश्य मूर्च्छित होतील; ‘आकाशांतील बळ डळमळतील.’
27. त्या काळीं लोक ‘मनुश्याच्या पुत्राला’ परक्रमान व मोठ्या वैभवान ‘मेघारुढ होऊन येतांना’ पाहतील.
28. या गोश्टींस आरंभ होऊं लागेल तेव्हां नीट उभे राहा, आणि आपलीं डोकीं वर करा; कारण तुमची मुक्तता समीप आली आहे.
29. त्यान त्यांस दाखला सांगितला: अंजीर व सर्व झाड पाहा;
30. तीं फुटूं लागलीं म्हणजे तुम्ही त पाहून आपणच ओळखतां कीं आतां उन्हाळा जवळ आला आहे.
31. तसच या गोश्टी होतांना पाहाल तेव्हां देवाच राज्य जवळ आल आहे अस समजा.
32. मी तुम्हांस खचीत सांगता कीं सर्व गोश्टी पूर्ण होत तोपर्यंत ही पिढी नाहींशी होणार नाहीं.
33. आकाश व पृथ्वी नाहींतशी होतील; परंतु माझीं वचन नाहींतशीं होणारच नाहींत.
34. तुम्ही आपणांस संभाळा, नाहींतर कदाचित् गुंगी, दारुबाजी व संसाराच्या चिंता यांनीं तुमचीं अंतःकरण जड होऊन तो दिवस ‘पाशाप्रमाण’ अकस्मात् तुम्हांवर येईल;
35. कारण तो अवघ्या पृथ्वीतलावर ‘राहणा-या सर्व लोकांवर’ तसाच येईल.
36. तुम्हीं तर या सर्व होणा-या गोश्टी चुकवावयास व मनुश्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हाव म्हणून सर्व प्रसंगीं प्रार्थना करीत जागृत राहा.
37. तो दिवसा मंदिरांत शिक्षण देत असे आणि रात्रीस बाहेर जाऊन जैतूनांचा डागर ह्या नांवाच्या डागरावर राहत असे.
38. सर्व लोक त्याच श्रवण करावयास मोठ्या पहाटेस त्याजकडे मंदिरांत येत.
|