1. नंतर शब्बाथ गेल्यावर मग्दालिया मरीया, याकोबाची आई मरीया व सलोमे यांनी, तिकडे जाऊन त्याला लावण्याकरितां, सुगंधद्रव्य विकत घेतली;
2. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशीं मोठ्या प्रातःकाळीं सूर्योदयाच्या समयीं त्या कबरेजवळ आल्या.
3. तेव्हां त्या एकमेकींस म्हणत होत्या, कबरेच्या ताडावरील धाड आपल्याकरितां कोण लोटील?
4. त्यांनी वर पाहिल ता धाड एकीकडे लोटलेली आहे अस त्यांच्या दृश्टीस पडल; ती फार मोठी होती.
5. मग कबरत गेल्यावर पांढरा झगा ल्यालेल्या अशा एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेल पाहून त्या चकित झाल्या.
6. तो त्यांस म्हणाला, चकित होऊं नका; वधस्तंभावर खिळिलेल्या येशू नासरेथकाचा शोध तुम्ही करीत आहां; तो उठला आहे, येथ नाहीं; त्याला ठेविल होत ती ही जागा पाहा.
7. जा; त्याच्या शिश्यांस व पेत्राला सांगा कीं तो तुमच्यापूर्वी गालीलांत जात आहे; त्यान तुम्हांला सांगितल्याप्रमाण तो तेथ तुमच्या दृश्टीस पडेल.
8. मग त्या बाहेर निघून कंपायमान व विस्मित होत्सात्या कबरेपासून पळाल्या; त्यांनीं कोणाला कांहीं सांगितल नाहीं; कारण त्या भयभीत झाल्या होत्या.
9. आठवड्याच्या पहिल्या दिवशीं प्रातःकाळीं तो उठल्यावर, ज्या मग्दालिया मरीयतून त्यान सात भूत काढिलीं होतीं तिला त्यान प्रथम दर्शन दिल.
10. तिन जाऊन ह वर्तमान त्याजबरोबर पूर्वी असलेल्या आणि शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितल.
11. आतां तो जीवंत आहे व तिच्या दृश्टीस पडला, ह ऐकून त्यांनी त्या गोश्टीवर विश्वास ठेविला नाहीं.
12. यानंतर त्यांतील दोघे जण बाहेरगांवीं चालले असतां, त्यांस तो दुस-या रुपान प्रगट झाला.
13. त्यांनीं जाऊन वरकडांस सांगितल तरी त्यांनीं त्यांजवरहि विश्वास ठेविला नाहीं.
14. नंतर अकरा जण जेवावयास बसले असतां त्यांसहि तो प्रगट झाला; आणि ज्यांनीं त्याला उठल्यावर पाहिल होत त्यांजवर त्यांनी विश्वास ठेविला नाहीं म्हणून त्यान त्यांचा अविश्वास व अंतःकरणाच काठिण्य यांविशयीं त्यांस दोश लाविला.
15. त्यान त्यांस सांगितल कीं सर्व जगांत जाऊन संपूर्ण सृश्टीला घोशणा करा;
16. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याच तारण होईल; जो विश्वास धरीत नाहीं ता देडास योग्य ठरेल;
17. आणि विश्वास धरण्या-याबरोबर हीं चिन्हें असत जातील; ते माझ्या नामान भूत काढतील; नवनव्या भाशा बोलतील;
18. सर्प उचलतील, व कोणताहि प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांस बाधणारच नाहीं; त्यांनीं दुखणाइतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील.
19. याप्रमाण प्रभु येशू त्यांजबरोबर बोलल्यानंतर वर स्वर्गात घेतला गेला, आणि देवाच्या उजवीकडे बसला.
20. त्यांनीं निघून जाऊन, प्रभु त्यांसह कार्य करीत असतां, आणि त्यांजबरोबर असणा-या चिन्हांच्या द्वारा वचन दृढ करीत असतां, सर्वत्र घोशणा केली. आमेन.
|