1. पुनः तो सरोवराच्या कांठीं शिक्षण देऊं लागला, आणि त्याच्याजवळ लोकांचा एवढा मोठा सुमदाय जमला कीं तो सरोवरांत एका मचव्यावर चढून बसला; आणि सर्व लोक सरोवराच्या कांठीं भूमीवर होते.
2. नंतर दाखले देऊन तो त्यांस पुश्कळ शिकवूं लागला आणि आपल्या शिकवणींत त्यांस म्हणाला;
3. ऐका; पाहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला;
4. तो पेरीत असतां अस झाल कीं कांहीं बीं वाटेवर पडल; त पाखरांनीं येऊन खाऊन टाकिल;
5. कांहीं खडकाळीवर पडल तेथ त्यास फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळ त लवकर उगवल;
6. मग सूर्य उगवल्यावर त्याला ऊन लागल व त्याला मूळ नव्हत म्हणून त वाळून गेल.
7. कांहीं कांटेरी झाडांमध्य पडल, मग कांटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली, म्हणून त्याला कांही पीक आले नाहीं.
8. कांही चांगल्या मातींत पडल; त उगवून व मोठ होऊन त्याला पीक आल; आणि त्याच तीसपट, साठपट, शंभरपट अस उत्पन्न आल;
9. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको.
10. तो एकांती असतां त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनीं दाखल्याविशयीं त्याला विचारिल.
11. त्यान त्यांस म्हटल, देवाच्या राज्याच रहस्य समजून घेण ह तुम्हांला दिल आहे; परंतु जे बाहेर आहेत त्यांचे सर्व दाखल्यांनीं होत;
12. यासाठीं कीं त्यांनीं ‘पाहत असतां पाहाव व त्यांस कळूं नये, आणि ऐकत असतां ऐकाव व त्यांस उमजूं नये; त्यांनीं वळूं नये व त्यांना क्षमा होऊं नये.’
13. तो त्यांस म्हणाला, हा दाखला तुम्हीं समजलां नाहीं काय? तर सर्व दाखले कसे समजाल?
15. वाटेवर वचन पेरिल जात तेथील लोक हे आहेत कीं त्यांनी ऐकल्याबरेाबर सैतान येऊन त्यांत पेरलेल वचन हिरावून घेतो.
16. तसच खडकाळीवर पेरलेले हे आहेत कीं ते वचन ऐकतांच आनंदान ग्रहण करितात;
17. तथापि त्यांमध्य मूळ नसल्यामुळ ते अल्पकाळ टिकतात; मग वचनामुळ संकट किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात.
18. कांटेरी झाडांमध्य पेरलेले हे आहेत कीं त्यांनी वचन ऐकल्यावर
19. संसाराची चिंता, द्रव्याचा मोह व इतर विशयांचा लोभ हीं त्यांजमध्य शिरुन वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निश्फळ होत.
20. चांगल्या मातींत पेरलेले हे आहेत कीं ते वचन ऐकून त स्वीकारतात; मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट अस पीक देतात.
21. आणखी त्यानंे त्यंास अस म्हटल, दिवा मापाखालीं किंवा पलंगाखालीं ठेवावा म्हणून आणितात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणितात कीं नाहीं?
22. प्रगट होणार नाहीं अस कांहीं गुप्त नाहीं, किंवा उघडें होणार नाहीं असें कांहीं झाकलेल नाहीं.
23. ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत तो ऐको.
24. आणखी त्यान त्यांस म्हटल, तुम्ही ज ऐकतां त्याविशयीं सावध राहा. ज्या मापान तुम्ही माप घालतां त्याच मापान तुमच्या पदरीं घालतील, आणि तुम्हांस अधिकहि दिल जाईल;
25. कारण ज्याला आहे त्याला दिल जाईल, व ज्याला नाहीं त्याच ज असेल त देखील त्याजपासून काढून घेतल जाईल.
26. आणखी त्यान म्हटल, देवाचे राज्य अस आहे कीं जणूं काय एकाद्या मनुश्यान बीं टाकल्यावर त्यान रात्रीं दिवसां निजाव उठाव,
27. आणि त बीं रुजाव वाढाव; पण त्याला कांही कळूं नये.
28. भूमि आपोआप पीक देते; पहिल्यान अंकुर, मग कणीस, मग कणसाांत भरलेला दाणा.
29. दाणा पिकल्यावर तो लागलाच ‘विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.’
30. आणखी त्यान म्हटल, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी, अथवा कोणत्या दाखल्यान त दर्शवाव?
31. त मोहरीच्या दाण्यासारख आहे. तो भूमींत पेरितांना जरी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्य बारीक असतो,
32. तरी पेरिल्यावर उगवून सर्व भाज्यांमध्य मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्याा फुटतात कीं ‘आकाशाच्या पाखरांस त्याच्या सावलींत वस्ती करितां येत.’
33. असे बहुत दाखले देऊन जस त्यांच्यान ऐकवल तस त्यान त्यांस वचन सांगितल;
34. आणि दाखल्यावाचंून तो त्यांच्याबरोबर बोलला नाहीं; तरी एकांती त्यान आपल्या शिश्यांस सर्व गोश्टी फोडून सांगितल्या.
35. त्याच दिवशीं संध्याकाळ झाल्यावर तो त्यांस म्हणाला, आपण पलीकडे जाऊं.
36. तेव्हां लोकसमुदायाला सोडून देऊन तो मचव्यावर होता तसच ते त्याला घेऊन गेले. त्याच्याबरोबर दुसरे मचवे होते.
37. नंतर मोठ वादळ झाल व लाटा मचव्यावर अशा उसळल्या कीं तो भरुं लागला.
38. तो वरामावर उशास घेऊन निजला होता, तेव्हां ते त्याला उठवून म्हणाले, गुरुजी, आपण बुडता याची आपणाला चिंता नाहीं काय?
39. तेव्हां त्यान उठून वा-याला दबाविल, व समुद्राला म्हटल उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदीं निवांत झाल.
40. त्यावर त्यान त्यांस म्हटल, तुम्ही कां घाबरलां? अद्यापि तुम्हांला विश्वास नाहीं काय?
41. तेव्हां ते फार भ्यााले व एकमेकांस म्हणूं लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याच ऐकतात.
|