1. आणखी त्यान त्यांस म्हटल, मी तुम्हांस खचीत सांगता कीं येथ राहणा-यांतील कांहीं अस आहेत कीं देवाच राज्य पराक्रमान आलेल पाहत तोपर्यंत त्यांस मरणाचा अनुभव येणारच नाहीं.
2. मग सहा दिवसानंतर येशून पेत्र, याकोब व योहान यांस आपणाबरोबर एका उंच पर्वतावर एकीकडे नेल; तेथ त्यांच्यादेखतां त्याच रुप पालटल;
3. त्याची वस्त्र इतकीं पांढरी चकचकीत झालीं कीं तितकीं पांढरीं करील असा कोणी परीट पृथ्वीवर नाहीं.
4. तेव्हां मोशासह एलीया त्यांच्या दृश्टीस पडला; ते येशूबरोबर संभाशण करीत होते.
5. तेव्हां पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथ असाव ह बर आहे; तर आम्ही तीन मंडप करुं; आपणासाठीं एक, मोशासाठीं एक व एलीयासाठीं एक.
6. कारण काय बोलावयाच ह त्याला सुचल नाहीं; ते भयभीत झाले.
7. तेव्हां मेघ येऊन त्यांजवर छाया पडली; आणि मेघांतून अशी वाणी झालीं कीं हा माझा प्रिय पुत्र आहे, याच तुम्ही ऐका.
8. मग त्यांनीं एकाएकी सभोवत पाहिले ता केवळ येशूशिवाय त्यांच्याजवळ आणखी कोणी त्यांच्या दृश्टीस पडल नाहीं.
9. नंतर ते डागरावरुन उतरत असतां त्यांन त्यांस आज्ञा केली कीं, तुम्हीं ज पाहिल त मनुश्याचा पुत्र मेलेल्यांतून पुनः उठेपर्यंत कोणाला कळवूं नका.
10. ही गोश्ट मनांत धरुन मेलेल्यांतून पुनः उठण म्हणजे काय याविशयीं ते आपसांत विचार करुं लागले.
11. मग त्यांनीं त्याला विचारल, एलीया प्रथम आला पाहिजे, अस शास्त्री म्हणतात ह कस?
12. त्यान त्यांस उत्तर दिल कीं ‘एलिया प्रथम येऊन सर्व कांही यथास्थित करितो’ ह खर; तरी मनुश्याच्या पुत्राविशयीं अस कस लिहिल आहे कीं त्यान फार दुःख भोगाव व तुच्छ मानिल जाव?
13. मी तुम्हांस सांगता कीं एलीया आला आहे, आणि त्याजविशयीं लिहिल्याप्रमाण त्यांनीं मनास वाटल तस त्याला केल.
14. नंतर ते शिश्यांजवळ आले ता त्यांच्याभावतीं लोकसमुदाय आहे व त्यांजबरेाबर शास्त्री संवाद करीत आहेत अस त्यांनीं पाहिल.
15. तेव्हां त्याला पाहतांच सर्व लोक फार चकित झाले व धावत जाऊन त्यांनी त्याला नमस्कार केला.
16. मग त्यान त्यांस विचारिल, तुम्ही यांजशी काय संवाद करितां?
17. लोकसमुदायांतील एकान उत्तर दिल, हे गुरु, मी आपणाकडे आपल्या मुलाला घेऊन आला, याला मुका आत्मा लागला आहे.
18. याला जेथ कोठ तो धरिता तेथ आपटतो, आणि हा ताडाला फेस आणून दांत कडकडां खातो व क्षीण होतो; त्याला काढाव म्हणून मी आपल्या शिश्यांस सांगितल, परंतु त्यांना त्याला काढतां येईना.
19. त्यान त्याला उत्तर दिल कीं अहाहा! विश्वासहीन पिढी, मी तुम्हांबरोबर कोठवर असूं? कोठवर तुमच सहन करुं? त्याला मजकडे आणा.
20. त्यांनीं त्याला त्याजकडे आणिल, तेव्हां आत्म्यान त्याला पाहतांच त्याला पिळून टाकिल आणि तो जमिनीवर पडून ताडाला फेस आणून लोळूं लागला.
21. तेव्हां त्यान त्याच्या बापाला विचारिल कीं अस याला होऊन किती काळ झाला? त्यान म्हटल, ह बाळपणापासून आहे.
22. त्यान याचा घात करण्याकरितां याला बहुत वेळां विस्तवांत व पाण्यांतहि टाकिले; आपल्यान कांहीं करवेल तर आम्हांवर करुणा करुन आम्हांला साहाय् य करा.
23. येशू त्याला म्हणाला, माझ्यान करवेल! विश्वास धरणा-याला सर्व कांहीं साध्य आहे.
24. तेव्हांच मुलाचा बाप (डोळîांत आसव आणून) मोठ्यान म्हणाला, मी विश्वास धरिता; माझा अविश्वास काढून टाकण्यास मला साहाय् य करा.
25. त्या वेळीं लोकसमुदाय धावत तिकडे येत आहे अस पाहून येशून अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हटल, अरे मुक्याबहि-या आत्म्या, याच्यांतून नीघ व पुनः कधीं याच्यांत शिरुं नको अशी मी तुला आज्ञा करिता.
26. तेव्हां तो ओरडून व त्याला फार पिळून निघाला; आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला, अस बहुतेक लोक बोलूं लागले;
27. पण येशून त्याचा हात धरुन त्याला उठविल; व तो उभा राहिला.
28. तो घरांत गेल्यावर त्याच्या शिश्यांनीं त्याला एकांतीं विचारिल कीं आमच्यान त्याला कां काढवल नाहीं?
29. तो त्यांस म्हणाला, ही जात प्राथनेवांचून (व उपासावांचून) दुस-या कशानंेहि निघत नाहीं.
30. नंतर ते तेथून निघून गालीलामधून चालले होते; आणि ह कोणास कळूं नये, अशी त्याची इच्छा होती.
31. तो आपल्या शिश्यांस शिकवीत होता; तो त्यांस म्हणाला कीं मनुश्याचा पुत्र मनुश्यांच्या हातीं दिला जात आहे; ते त्याला जिव मारितील; आणि जिव मारिल्यानंतर तो तिस-या दिवशी पुनः उठेल;
32. परंतु ह्या बोलण्याचा अर्थ ते समजले नाहींत व त्याला विचारण्याची त्यांस भीति वाटली.
33. पुढ ते कफर्णहूमांत आले; आणि तो घरांत असतां त्यान त्यांस विचारिल, तुम्ही वाटत काय संवाद करीत होतां?
34. ते उगेच राहिले, कारण सर्वांत मोठा कोण याविशयीं त्यांनीं वाटत आपसांत वादविवाद केला होता.
35. नंतर तो खालीं बसला आणि आपल्या बारा शिश्यांस बोलावून त्यांस म्हणाला, आपण पहिल व्हाव अस कोणाच्या मनांत असल्यास त्यान सर्वांत शेवटल व सर्वांचा सेवक अस व्हाव.
36. मग त्यान एका बाळकांस उचलून घेऊन त्यांच्या मध्य ठेविल व त्याला कंवटाळून धरुन त्यांस म्हटल,
37. जो कोणी माझ्या नामान अशा बाळकांपैकीं एकाला स्वीकारितो तो मला स्वीकरितो, व जो कोणी मला स्वीकारतो, तो मला नाहीं तर ज्यान मला पाठविल त्याला स्वीकारितो.
38. योहानान त्याला म्हटल, गुरुजी, कोणीएकाला आपल्या नामान भूत काढितांना आम्हीं पाहिल, तेव्हां त्याला आम्हीं मना केल, कारण तो आमचा अनुयायी नव्हता.
39. येशू म्हणाला, त्याला मना करुं नका, कारण जो माझ्या नामान अöुत कृत्य करील व लागलीच माझी निंदा करील असा कोणी नाहीं.
40. जो आपल्याला प्रतिकूळ नाहीं तो आपल्याला अनुकूळ आहे.
41. तुम्ही खिस्ताच म्हणून जो कोणी तुम्हांस पाण्याचा प्याला प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाहीं ह मी तुम्हांला खचीत सांगता.
42. मजवर विश्वास ठेवणा-या या लहानांतील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळîांत मोठ्या जात्याची तळी बांधून त्यास समुद्रांत टाकाव ह त्याल बर.
43. तुझ्या हातान तुला अडखळविल तर तो तोडून टाक; दोन हात असून नरकांत म्हणजे न विझणा-या अग्नींत (जेथ ‘त्यांचा किडा मरत नाहीं व अग्नि विझत नाहीं’ तेथ) जाव, यापेक्षां व्यंग होऊन जीवनांत जाव ह तुला बर.
45. तुझा पाय तुला अडखळवितो तर तो तोडून टाक; दोन पाय असून (जेथ ‘त्यांचा किडा मरत नाहीं व अग्नि विझत नाहीं’ अशा) नरकांत टाकिल जाव, यापेक्षां पंगू होऊन जीवनांत जाव ह तुला बर.
47. तुझा डोळा तुला अडखळवितो तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथ ‘त्यांचा किडा मरत नाहीं व अग्नि विझत नाहीं,’ अशा नरकांत टाकिल जाव, यापेक्षां एकडोळîा होऊन देवाच्या राज्यांत जाव ह तुला बर.
49. प्रत्येक मनुश्य अग्नीन शुद्ध केला जाईल (व प्रत्येक बलिदान मिठान खारट करितील).
50. मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपणाच गेला तर तो कशान आणाल? तुम्ही आपणांत मीठ असूं द्या व एकमेकांबरोबर शांतीन राहा.
|