1. मग अस झाल कीं येशून आपल्या बारा शिश्यांस नियम सांगण समाप्त केल्यावर तो त्यांच्या नगरांत शिकवावयास व उपदेश करावयास गेला.
2. योहान बंदिशाळत असतां त्यान खिस्ताच्या कृत्यांविशयीं ऐकून आपल्या शिश्यांच्या हातीं निरोप पाठवून त्याला विचारल,
3. जे यावयाचे ते आपणच, किंवा आम्हीं दुस-याची वाट पाहावी?
4. येशून त्यांस उत्तर दिल, ज तुम्ही ऐकतां व पाहतां त योहानाला जाऊन सांगा;
5. ‘अंधळे पाहतात,’ पांगळ चालतात, कुश्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठतात, व ‘गरिबांस सुवार्ता सांगण्यांत येते;’
6. जो कोणी मजसंबंधान अडखळत नाहीं तो धन्य आहे.
7. ते जात असतां येशू लोकसमुदायांबरोबर योहानाला उल्लेखून बोलू लागलाः तुम्ही काय पाहावयास रानांत गेलां होतां? वा-यान हालविलेला बोरुं काय?
8. तर मग काय पाहावयास गेलां होतां? मऊ वस्त्र ल्यालेल्या मनुश्याला काय? पाहा, मऊ वस्त्र लेणारे राजगृहीं असतात.
9. तर मग कां गेलां होतां? संदेश्ट्याला पाहावयास काय? मी तुम्हांस सांगता, हो’ संदेश्ट्यांहून जो श्रेश्ठ त्याला.
10. पाहा, मी आपल्या दुताला तुझ्यापुढ पाठविता, तो तुझा मार्ग तुझ्यासमोर सिद्ध करील, अस ज्याविशयीं लिहिल आहे तो हाच आहे.
11. मी तुम्हांस खचीत सांगता कीं स्त्रियांपासून जन्मलेल्या माणसांमध्य बाप्तिस्मा करणारा योहान यांपेक्षां कोणी मोठा झाला नाहीं; तरी स्वर्गाच्या राज्यांत जो कनिश्ठ तो त्याजहून श्रेश्ठ आहे.
12. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसांपासून आतांपर्यंत स्वर्गाच्या राज्यावर हल्ला चालला आहे आणि जबरदस्त लोक त नेटान घेतात.
13. कारण सर्व संदेश्टे व नियमशास्त्र हीं योहानापर्यंत संदेश देत आलीं.
14. तुम्ही तो ग्रहण करण्यास मान्य असाल तर जो एलीया येणार तो हाच आहे.
15. ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको.
16. या पिढीला मी कोणाची उपमा देऊं? जीं मुल बाजारांत बसून आपल्या संवगड्यांस हाक मारुन म्हणतात,
17. आम्हीं पावा वाजविला, तरी तुम्ही नाचलां नाहीं, आम्हीं विलाप केला तरी तुम्हीं ऊर बडवून घेतले नाहींत, त्यांच्यासारखी ही पिढी आहे.
18. कारण योहान आला असून तो खातपीत नाहीं, तरी त्याला भूत लागल अस म्हणतात.
19. मनुश्याचा पुत्र आला, तो खातोपितो; तरी त्याजविशयीं म्हणतात, पाहा, खादाड व दारुबाज मनुश्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र! परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योग न्यायी ठरत.
20. नंतर ज्या नगरांमध्य त्याची पराक्रमाचीं बहुतेक कृत्ये घडलीं होतीं त्यांनीं पश्चाताप केला नाहीं म्हणून त्यांस तो असा दोश देऊं लागलाः
21. हे खोराजिना, तुला धिक्कार असो! हे बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण तुम्हांमध्य जी पराक्रमाची कृत्य घडलीं ती सोर व सीदोन यांत घडली असतीं तर त्यांनीं मागच तरट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता.
22. ह्यामुळ मी तुम्हांस सांगता कीं न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन यांस तुम्हांपेक्षां सोप जाईल.
23. हे कफर्णहूमा, ‘तूं आकाशपर्यंत चढशील काय? तूं अधोलोकापर्यंत उतरशील;’ कारण तुजमध्य जी पराक्रमाची कृत्य घडली तीं सदोमांत घडलीं असतीं तर त आजपर्यंत राहिल असत.
24. ह्यामुळ मी तुम्हांस सांगता कीं न्यायाच्या दिवशीं तुझ्यापेक्षां सदोम प्रदेशास सोपंे जाईल.
25. त्या समयीं येशू अस बोलता झालाः हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझ स्वतन करिता; कारण ज्ञानी व विचारवंत यांपासून या गोश्टी तूं गुप्त ठेवून बाळकांस प्रगट केल्या.
26. खर, हे बापा, कारण असच तुला योग्य दिसल.
27. 2माझ्या पित्यान माझ्या हातीं सर्व दिल आहे, आणि पित्यावांचून पुत्राला कोणी ओळखीत नाहीं, आणि पुत्रावांचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयास पुत्राची इच्छा असेल त्यावांचून पित्याला कोणी ओळखीत नाहीं.
28. अहो कश्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हांला विश्रांति देईन.
29. मी जो मनाचा सौम्य व लीन आह त्या माझ जूं आपणांवर घ्या व मजपासून शिका, म्हणजे ‘तुमच्या जिवांस विश्रांति मिळेल;’
30. कारण माझ जूं सोईच व माझ ओझ हलक आहे.
|