1. नंतर अस झाल कीं हे बोलण समाप्त केल्यावर येशू गालीलाहून निघून यार्देनेच्या पलीकडे यहूदीया प्रांतांत गेला.
2. तेव्हां लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागून गेले; त्यांस त्यान तेथ बर केल.
3. नंतर परुशी त्याजकडे येऊन त्याची परीक्षा पाहण्याकरितां म्हणाले, बायकोला कोणत्याहि कारणावरुन टाकण ह योग्य काय?
4. त्यान उत्तर दिल, ह तुमच्या वाचण्यांत आल नाहीं काय कीं ज्यान मनुश्य उत्पन्न केलीं, त्यान ‘तीं’ प्रारंभापासून ‘नरनारी अशीं उत्पन्न केली,’
5. व म्हटल, ‘याकरितां पुरुश आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील, आणि तीं दोघ एकदेह होतील’?
6. ह्यामुळ तीं पुढ दोन नव्हत तर एकदेह अशीं आहेत. यास्तव देवान ज जोडिल आहे त मनुश्यान तोडूं नये.
7. ते त्याला म्हणाले, तर ‘सूटपत्र देऊन तिला टाकाव’ अशी आज्ञा मोशान कां दिली?
8. त्यान त्यांस म्हटल, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळ मोशान तुम्हांस आपल्या बायका टाकूं दिल्या; तरी प्रारंभापासून अस नव्हत.
9. मी तुम्हांस सांगता कीं, जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचाराच्या कारणावांचून टाकून दुसरी करितो तो व्यभिचार करितो; आणि जो कोणी अशा टाकिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करितो तोहि व्यभिचार करितो.
10. शिश्य त्याला म्हणाले, बायकोच्या संबंधान पुरुशाची गोश्ट अशी असली तर लग्नच न केलेल बर.
11. त्यान त्यांस म्हटल, ह वचन सर्वांच्यान स्वीकारवत नाहीं; ज्यांस ह दान दिल आहे ते स्वीकारितात.
12. कारण आईच्या उदरापासून जन्मलेले असे नपुंसक आहेत, मनुश्यांनीं केलेले असेहि नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठीं ज्यांनीं आपणांस नपुंसक करुन घेतल असे नपंुसक आहेत. ज्याच्यान ह स्वीकारवत तो स्वीकारो.
13. नंतर त्यान बाळकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून त्याच्याजवळ त्यांस आणिल; परंतु शिश्यांनीं आणणा-यांस दटाविल.
14. येशून म्हटल, बाळकांस मजकडे येऊं द्या, त्यांस मना करुं नका, कारण स्वर्गाच राज्य असल्याचच आहे.
15. मग त्यांजवर हात ठेविल्यावर तो तेथून गेला.
16. नंतर, पाहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन मिळाव म्हणून मीं कोणत चांगल कार्य करावं?
17. त्यान त्याला म्हटल, मला चांगल्याविशयीं कां विचारितोस? चांगला असा एकच आहे; तरी तूं जीवनांत प्रवेश करुं पाहतोस तर देवाच्या आज्ञा पाळ.
18. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशून म्हटल, ‘मनुश्यहत्या करुं नको, व्यभिचार करुं नको, चोरी करुं नको, खोटी साक्ष देऊं नको,
19. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर,’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजा-यावर प्रीति कर.’
20. तो तरुण त्याला म्हणाला, मीं ह अवघ पाळिल आहे; माझ्या ठायीं अजून काय उण आहे?
21. येशून त्याला म्हटल, पूर्ण होऊं पाहतोस तर जा, आपली मालमत्ता विकून दरिद्रîांस दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामाग ये;
22. पण ही गोश्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुश्कळशी होती.
23. तेव्हां येशून आपल्या शिश्यांस म्हटल, मीं तुम्हांस खचीत सांगता, स्वर्गाच्या राज्यांत धनवानाचा प्रवेश होण कठीण आहे.
24. आणखी तुम्हांस सांगता, देवाच्या राज्यांत धनवानाचा प्रवेश होण यांपेक्षां उंटाला सुईच्या नेढ्यांतून जाण सोप आहे.
25. ह ऐकून शिश्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोण तरेल?
26. येशून त्यांजकडे न्याहाळून पाहून म्हटल, ह मनुश्याला अशक्य आहे, ‘देवाला तर सर्व शक्य आहे.’
27. तेव्हां पेत्रान त्याला म्हटल पाहा, आम्हीं सर्व सोडून आपल्यामाग आला आहा, तर आम्हांस काय मिळणार आहे?
28. येशून त्यांस म्हटल, मी तुम्हांस खचीत सांगता, पुनरुत्पत्तींत मनुश्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हां माझ्यामाग चालत आलेले तुम्हीहि बारा राजासनांवर बसून इस्त्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.
29. आणखी ज्या कोणीं घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुल किंवा शेत माझ्या नामाकरितां सोडिलीं आहेत, त्याला शंभरपट मिळून सार्वकालिक जीवन ह वतन मिळेल,
30. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, अस पुश्कळ जणांच होईल.
|